
हिवाळ्यात 'या' पद्धतीने करा ताज्या आवळ्याचे सेवन! गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर
थंडीत कोणत्या पदार्थांचे सेवन करावे?
रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी कोणते फळ खावे?
आवळा खाण्याचे फायदे?
राज्यासह संपूर्ण देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी. संतुलित आहार, भरपूर पाण्याचे सेवन, शारीरिक हालचाली, कमीत कमी ताण घेतल्यास सर्वच ऋतूंमध्ये शरीर कायमच निरोगी राहील. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं तुरट चवीचा आवळा खायला खूप जास्त आवडतो. आवळ्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आवळ्याचे लोणचं, आवळ्याची आमटी, आवळ्याचं मुरंबा इत्यादी अनेक पदार्थ बनवले हातात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आवळ्याचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होते. आवळ्याला नैसर्गिक टॉनिक मानले जाते. सर्वच ऋतूंमध्ये वेगवेगळ्या पद्धतीत आवळ्याचे सेवन केले जाते.(फोटो सौजन्य – istock)
कॉस्मेटिक्स, क्रीम्स आणि डिओड्रंट्समधील केमिकल्समुळे वाढतोय त्वचा कर्करोगाचा धोका, वेळीच व्हा सावध
कच्चा आवळा चवीसोबत शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरते. रक्तात वाढलेली साखर, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात आवळ्याची पावडर मिक्स करून प्यावी. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होते. लहान मुलांना आवळा खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांसाठी आवळ्याची कोशिंबीर बनवू शकता. आवळा कोशिंबीर बनवण्यासाठी किसलेल्या आवळ्यामध्ये आलं, खडीसाखर, मध आणि काळीमिरी पावडर आणि जिऱ्याची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा. या पद्धतीने बनवलेली आवळ्याची कोशिंबीर चवीला अतिशय सुंदर लागते.
आवळ्यापासून बनवला जाणारा अतिशय प्रसिद्ध पदार्थ म्हणजे मोरावळा. हा एक गोड पदार्थ आहे. चवीला गोड लागणारा पदार्थ आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आणि गुणकारी ठरतो. साखरेचा पाक करून त्यात आवळे भिजत ठेवा. ४ ते ५ दिवसानानंतर आवळे पाकामध्ये छान मुरले जातील. तसेच आवळ्यापासून तुम्ही आवळा कँडी, चटणी इत्यादी पदार्थ बनवून रोजच्या आहारात सेवन करू शकता. आवळ्यापासून बनवलेल्या पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश केल्यास शरीराला अनेक फायदे होतात आणि तुम्ही कायमच निरोगी राहता.
शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात आवळ्याचा समावेश करावा. फायबर युक्त आवळ्याचे नियमित सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्यासोबत शरीराची पचनक्रिया सुद्धा सुधारेल. यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स, कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस, पोटॅशियम आणि अमिनो आम्ल इत्यादी अनेक घटक आढळून येतात. शरीराच्या पेशींचे कार्य सुधारण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे. थंडीच्या दिवसांमध्ये आवळ्याचे सेवन करणे शरीरासाठी वरदान मानले जाते. यामध्ये असलेल्या विटामिन सी मुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासोबतच शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला बळ आणि ऊर्जा देण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे.