जगातील 7 देश जिथे एकही भारतीय नाही; क्वचितच यांचे नाव कुणी ऐकले असेल
जगभरात अनेक लोक आपला देश सोडून इतर देशांमध्ये भ्रमंतीसाठी अथवा कामानिमित्त जात असतात आणि पैसे कमवण्याच्या हेतूने तिथेच स्थायिक होतात. असेच अनेक भारतीय देखील दरवर्षी कोणत्या ना कोणत्या देशात जाऊन स्थायिक होत असतात. आशियाई देशांपासून युरोप आणि अमेरिकेपर्यंत अनेक देशांमध्ये तुम्हाला भारतीय आढळून येतील. पण तुम्हाला माहिती आहे का? जगात असेही काही देश आहेत जिथे एकही भारतीय सापडणार नाही. होय, जगात असेही काही देश आहेत जिथे एकही भारतीय आढळून येणार नाही. या देशांमध्ये भारतीयांची टक्केवारी नगण्य आहे. चला या यादीत कोणकोणत्या देशांचा समावेश आहे ते जाणून घेऊया.
व्हॅटिकन सिटी
रोमच्या मध्यभागी वसलेले व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश म्हणून ओळखला जातो. हे कॅथलिक धर्माचे आध्यात्मिक केंद्र मानले जाते. दरवर्षी अनेक पर्यटक या देशाला भेट देत हातात मात्र इथे एकही भारतीय राहत नाही. येथील प्रसिद्ध ठिकाणांमध्ये सेंट पीटर बॅसिलिका आणि व्हॅटिकन संग्रहालये यांचा समावेश आहे.
सॅन मॅरिनो
इटलीच्या अपेनाइन पर्वतरांगांमध्ये सॅन मरिनो हा देश वसला आहे, हे जगातील जुन्या गणराज्यांपैकी एक आहे. हा छोटा देश तेथील भव्य इमारती, सुंदर नैसर्गिक दृश्ये आणि जुना परंपरेची ओळखला जातो. जगभरातून अनेक पर्यटक देशाला भेट द्यायला येत असतात, पण यात भारतीयांची संख्या नगण्य आहे.
बल्गेरिया
बल्गेरिया हा युरोपमधील एक अतिशय सुंदर देश आहे, जिथे तुम्हाला समुद्रकिनारे, काळा समुद्र आणि बाल्कन पर्वत पाहता येतात. पण इतके सौंदर्य आणि संस्कृती असूनही, भारतातून फार कमी लोक येथे स्थायिक झाले आहेत. तुम्ही येथे भेट देण्यासाठी जाऊ शकता पण तुम्हाला इथे एकही भारतीय आढळणार नाही.
तुवालु
तुवालू हा प्रशांत महासागराच्या कोपऱ्यात वसलेला एक अतिशय लहान आणि विरळ लोकवस्तीचा देश आहे. हे 9 प्रवाळ बेटांनी बनलेले आहे आणि त्याचे सागरी सौंदर्य अद्भुत आहे. भारतीय येथे देण्यासाठी जाऊ शकतात परंतु कोणताही भारतीय इथे स्थायिक नाही. हा देश जगापासून फार वेगळा असल्याचे सांगितले जाते.
पाकिस्तान
भारत-पाकिस्तान शेजारील देश असले तरी यांच्यात नेहमीच तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळते. जरी पाकिस्तान इतिहास आणि संस्कृतीच्या माध्यमातून भारताशी जोडले गेले असले तरी, आज तेथील भारतीय समुदाय खूपच कमी आहे. राजकीय तणावामुळे इथे भारतीयांची संख्या खूपच कमी आहे.
मुंबईतील 1BHK हून कमी किमतीत बालीत खरेदी करता येईल आलिशान वीला; इन्फ्लुएंसरने शेअर केला VIDEO
ग्रीनलँड
ग्रीनलँड हा एक अतिशय थंड आणि बर्फाळ देश आहे, जो जगातील सर्वात मोठ्या बेटांपैकी एक आहे. येथील लोकसंख्या खूपच कमी आहे आणि हवामान बरेच थंड आहे. भारतीय लोक इथे भेट देण्यासाठी येत असले तरी, कोणताही भारतीय ग्रीनलँडमध्ये कायमचा राहत नाही. येथे राहणाऱ्या भारतीयांची संख्या जवळजवळ शून्य आहे.
उत्तर कोरिया
उत्तर कोरिया हा जगातील अन्य देशांतून बराच वेगळा देश आहे. इथे एकाच पक्षाची हुकूमशाही चालते. हा देश त्याच्या कडक निर्बंधांसाठी, बंद सीमांसाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शासन व्यवस्थेसाठी ओळखला जातो. इथे पर्यटकांची संख्या कमी पाहायला मिळते आणि त्यातच इथे कायमचे कोणताही भारतीय राहत नाही.