(फोटो सौजन्य: Pinterest)
महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, अशात गरजेच्या असलेल्या अनेक गोष्टी खरेदी करणं सामान्यांना कठीण झाले आहे. यातीलच एक म्हणजे घर! आपल्याकडे स्वतःच आलिशान घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते मात्र आजच्या युगात घराच्या किमतीही इतक्या अफाट झाल्या आहेत की लोकांना एक घर घेणेही परवडत नाहीये. त्यातही मुंबईत एक 1BHK जरी घ्यायचं म्हटलं तर आपल्याला कोट्यवधी रुपये मोजावे लागतात. ही भीषण परिस्थिती लोकांना आपले स्वतःचे घर घेण्यापासून वंचित ठेवते.
5 वर्षांनंतर अखेर या तारखेपासून सुरु होणार Kailash Mansarovar Yatra; संपूर्ण माहिती जाणून घ्या
इंडोनेशियातील बाली हे अशा पर्यटन स्थळांपैकी एक आहे जिथे जगभरातून पर्यटक भेट देण्यासाठी येतात. येथे काही अतिशय मनमोहक समुद्रकिनारे आहेत, जिथे तुम्ही आरामात आनंद घेऊ शकता. अलिकडेच, ‘इश्क विश्क’ फेम आणि माजी एमटीव्ही होस्ट शहनाज ट्रेझरीवाला म्हणाली, ‘मुंबईतील माझ्या एका बेडरूमच्या अपार्टमेंटचे भाडे मी बालीतील व्हिलापेक्षा जास्त देते’. तिने याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जो आता व्हायरल झाला आहे, यात कोणकोणत्या गोष्टी सांगण्यात आल्या, चला जाणून घेऊया.
मुंबईतील फ्लॅटहुन कमी किमतीत मिळेल आलिशान वीला
शहनाजने सांगितले की, बालीमध्ये राहण्याचा खर्च मुंबईपेक्षा खूपच कमी आहे. बालीमध्ये तुम्ही मुंबई, लंडन किंवा लॉस एंजेलिस मधील 1BHK पेक्षा समान किंवा कमी किमतीत स्विमिंग पूल असलेल्या व्हिलामध्ये आरामात राहू शकता. मोठ्या शहरांमध्ये अन्न आणि वाहतुकीचे दर गगनाला भिडत असताना, शहनाज ट्रेझरीवाला यांनी सांगितले की, बालीमध्ये अन्न आणि वाहतुकीच्या सुविधा स्वस्त आहेत. इतकेच नाही तर, तुम्ही तुमच्या शरीराला आराम देण्यासाठी आणि उच्च दर्जाचे जीवन जगण्यासाठी येथे आरामदायी मसाज देखील घेऊ शकता.
शहनाजने सांगितले की, रिमोट वर्क करणाऱ्यांसाठी बाली हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्हाला नेहमीच वाय-फायची सुविधा असेल आणि कालांतराने, बाली उद्योजकता आणि डिजिटल निर्मात्यांसाठी एक जागतिक केंद्र बनले आहे. जिथे तुम्हाला रिमोट वर्कसाठी अनेक पर्याय देखील मिळतील. शहनाजने पुढे सांगितले की, पर्यटनाव्यतिरिक्त, बाली हे एक वेलनेस कॅपिटल देखील आहे. मोठ्या शहरांमध्ये लोकांना प्रदूषणाचा सामना करावा लागत असताना, तर बालीमध्ये तुम्ही स्वच्छ नैसर्गिक हवा मिळवू शकता. यासोबतच, तुम्ही स्वतःला आराम देण्यासाठी येथे साउंड हीलिंग देखील घेऊ शकता. शहरातील गजबटाला कंटाळलेली अनेक लोक मोठ्या संख्येने बालीला भेट देत असतात.
150 वर्ष जुनं हे शिवमंदिर पाण्याखाली वसलंय, महादेव दरवर्षी फक्त शिवरात्रीलाच देतात दर्शन!
व्हिडिओत असेही सांगण्यात आले की, बाली हे एक असे ठिकाण आहे जिथे स्वप्नातील जीवन घडविण्यासाठी लोकांनी आपल्या नोकऱ्या सोडल्या आहेत. भारतीयांना येथे येण्यासाठी इंडोनेशियाचा व्हिसा सहज मिळू शकतो. इथल्या नैसर्गिक सौंदर्यात एक उत्तम वेळ घालवता येऊ शकतो. इथे जगातील सर्वोत्तम समुद्रकिनारे असल्याचे सांगितले जाते, तुम्ही या ठिकाणाला भेट देऊन येथील नवनवीन समुद्रकिनारे एक्सप्लोर करू शकता.