Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women Health: प्रसूतीनंतर ७०% महिलांना पाठदुखीचा त्रास; उपचारास विलंब केल्यास दिर्घकालीन आजाराचा धोका

प्रसूतीनंतर खरं तर अनेकदा महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. बाळाला सांभाळण्याच्या नादात पाठदुखीच्या त्रासामध्ये वाढ झाली असल्याचे आता समोर आले आहे. नक्की काय आहे कारण?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 24, 2026 | 07:22 PM
प्रसूतीनंतर वाढली आहे महिलांची पाठदुखी (फोटो सौजन्य - iStock)

प्रसूतीनंतर वाढली आहे महिलांची पाठदुखी (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • प्रसूतीनंतर महिलांमध्ये पाठदुखीची वाढ 
  • वेदना तीव्र झाल्यावरच महिला उचलतात पावलं 
  • नवमातांमध्ये दीर्घकालीन मणक्याचे आजार होण्याची शक्यता 
प्रसूतीनंतर महिलांमध्ये पाठदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. मात्र, हा त्रास अनेकदा दुर्लक्षित केला जातो आणि वेदना तीव्र झाल्यावरच त्यावर उपचार घेतले जातात. तज्ज्ञांच्या मते, उपचारास विलंब केल्यास आणि चुकीच्या बसण्याच्या किंवा उभे राहण्याच्या सवयींमुळे नवमातांमध्ये दीर्घकालीन मणक्याचे आजार होण्याचा धोका वाढतो.

गर्भधारणेनंतर होणारी पाठदुखी ही सामान्य गोष्ट समजून अनेक महिला याकडे दुर्लक्ष करतात. हळूहळू ही वेदना वाढत जाऊन दैनंदिन जीवन, शारीरीक हालचाल आणि एकूण आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे नवमातांनी आपल्या मणक्याच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

Pregnancy मध्ये शारीरिक संबंध ठेवल्यास होते नॉर्मल डिलिव्हरी? काय आहे तथ्य, तज्ज्ञांनी केला खुलासा

काय सांगतात तज्ज्ञ

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॅास्पिटल येथील स्पाइन सर्जन डॉ. मोहित मुथा म्हणाले की, “गर्भधारणेदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक आणि हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे मणक्यावर अतिरिक्त ताण येतो. वजन वाढणे, शारीरीक मुद्रा बिघडणे आणि पोटाचे स्नायू कमकुवत होणे यामुळे शरीराचा समतोल बिघडतो आणि कंबरेवर ताण येतो. याशिवाय ‘रिलॅक्सिन’ नावाचा हार्मोन शरीरात स्रवतो, जो लिगामेंट्स आणि सांधे सैल करतो, जे प्रसूतीसाठी आवश्यक असते. मात्र, यामुळे मणका आणि पेल्विसमध्ये अस्थिरता निर्माण होऊन वेदना वाढू शकते.”

डॉ. मुथा पुढे म्हणाले की, प्रसूतीनंतर चुकीच्या पद्धतीने बाळाला उचलणे, स्तनपान करताना चुकीची शारीरीक स्थिती, पुरेशी विश्रांती न घेणे यामुळे समस्या अधिक वाढू शकते. कालांतराने या कारणांमुळे सततची वेदना, स्नायुंचा कडकपणा आणि दीर्घकालीन मणक्याचे विकार उद्भवू शकतात.

70% महिलांना होतोय त्रास 

डॉ. मुथा यांनी पुढे सांगितले की, प्रसूतीनंतर सुमारे 70 टक्के महिलांना पाठदुखीचा त्रास होतो. दर महिन्याला 25 ते 37 वयोगटातील 10 पैकी 7 महिलांना पाठीच्या वेदना, स्नायूंचा कडकपणा, वाकताना किंवा वजन उचलताना त्रास, तसेच दीर्घकाळ बसणे किंवा उभे राहणे यात अस्वस्थता अशी लक्षणं जाणवतात. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास या दीर्घकालीन वेदना, स्लिप डिस्क किंवा नर्व्हशी संबंधित आजारांमध्ये रुपांतरीत होतात, ज्यामुळे महिलांच्या दैनंदिन कामांवर आणि बाळाची काळजी घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

प्रसूतीनंतर असं बांधा पोट; ‘हा’ सोपा उपाय ठेवतो तुमचं पोट स्लिम

सामान्य झालाय हा त्रास 

पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँण्ड चिल्ड्रनचे वरिष्ठ प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद कुलट यांनी सांगितले की, प्रसूतीनंतर पाठदुखीचा त्रास सामान्यपणे आढळतो आणि तो प्रामुख्याने हार्मोन्समधील चढ-उतार, पोटाच्या स्नायूंचा कमकुवतपणा आणि गर्भधारणा व प्रसूतीदरम्यान शरीरावर येणाऱ्या अतिरिक्त ताणामुळे उद्भवतो. अनेक नवमाता बाळाला स्तनपान करताना किंवा बाळाला उचलताना योग्य शारीरीक स्थितीकडे करतात, ज्यामुळे वेदना अधिक वाढू शकते. तसेच, पुरेशी विश्रांती न मिळाल्यानेही ही समस्या गंभीर होते. अशा प्रकरणांमध्ये जवळपास २५ टक्क्यांनी वाढ झाली असून दर महिन्याला २५ ते ५५ वयोगटातील जवळपास १० पैकी १ रुग्ण किडनी स्टोनच्या समस्येसह रुग्णालयात उपचाराकरिता येतात, तर २ रुग्ण मूत्रमार्गाच्या संसर्गाच्या तक्रारींसह ओपीडीत दाखल होतात.

गर्भधारणेदरम्यान वाढलेले वजन, शारीरीक स्थितीमधील बदल, हार्मोनल बदल, चुकीची वजन उचलण्याची पद्धत आणि पोटाचे स्नायूंची कमकुवत झाल्याने मणक्यावर अतिरिक्त ताण येतो. मात्र, योग्य काळजी घेतल्यास बहुतेक महिला पूर्णपणे बऱ्या होऊन कोणत्याही दीर्घकालीन गुंतागुंतीशिवाय त्यांच्या दैनंदिन आयुष्यात परतू शकतात असेही डॉ. कुलट यांनी स्पष्ट केले.

Web Title: 70 percent of women suffer from back pain after childbirth delaying treatment poses a risk of chronic illness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 07:22 PM

Topics:  

  • Health Tips
  • pregnancy tips
  • women health

संबंधित बातम्या

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
1

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Pregnancy Sleep Problems: गर्भावस्थेचा शेवटचा टप्पा खूप महत्त्वाचा! महिलांनो, ‘या’ चुका अजिबात करू नका
2

Pregnancy Sleep Problems: गर्भावस्थेचा शेवटचा टप्पा खूप महत्त्वाचा! महिलांनो, ‘या’ चुका अजिबात करू नका

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
3

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित
4

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.