गोंदिया : जास्तीत जास्त प्रसूती शासकीय संस्थांमध्ये व्हावे, यासाठी आरोग्य विभागाकडून विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. शिवाय आर्थिक मोबदलाही दिल्या जातो. यानंतरही घरीच प्रसूतीचे प्रकार सुरूच आहेत. वर्षभरात दहा हजार महिलांची प्रसूती घरीच झाली. यात गोंदिया जिल्ह्यातील ११ महिलांचा समावेश आहे. याविषयी आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे.
[read_also content=”यवतमाळात शेतकऱ्याची आत्महत्या, सततच्या नापिकीला कंटाळून संपविली जीवनयात्रा https://www.navarashtra.com/maharashtra/suicide-of-a-farmer-in-yavatmal-nraa-266128.html”]
एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात १४ लाख ५७ हजार ३५ महिलांची प्रसूती झाली. यातील १० हजार ३५ प्रसूती घरी झाल्यामुळे कुटुंब कल्याण आरोग्य सेवा अतिरिक्त संचालकांनी घरीच प्रसूती अधिक होणाऱ्या जिल्ह्यांना समज दिली आहे. शासकीय संस्थांमध्ये जास्तीत जास्त प्रसूती होण्याच्या दृष्टीने शासनाकडून जननी शिशू सुरक्षा योजना, जननी सुरक्षा योजना या कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या अंतर्गत विविध सुविधा आणि लाभ पुरविला जात असतानाही घरीच प्रसूती करण्यात येत असल्याने आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. प्रसूती शासकीय संस्थांमध्ये व्हावी, यासाठी आशा वर्कर यांनी पाठपुरावा करावा, यासाठी त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. यानंतरही प्रसूती घरीच का केल्या जातात, अशीही विचारणा करण्यात येत आहे.






