Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Spinal Fracture : 75 वर्षीय महिलेच्या पाठदुखीमागे ऑस्टिओपोरोसिसमुळे मणक्याचे फ्रॅक्चर; बलून किफोप्लास्टीने मिळाला तातडीचा आराम

Spinal Fracture : ठाण्यात ७५ वर्षीय महिलेच्या वर्षभरापासून सुरू असलेल्या पाठदुखीचे कारण ऑस्टिओपोरोसिसमुळे L2 मणक्याला झालेला व्हर्टिब्रल कॉम्प्रेशन फ्रॅक्चर असल्याचे निदान झाले. किम्स हॉस्पिटल्स, ठाणे येथील स्पाइन सर्जन डॉ. अमोघ झावर यांच्या मार्गदर्शनाखाली बलून किफोप्लास्टी ही मिनिमली इन्व्हेसिव्ह प्रक्रिया करण्यात आली.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 07, 2026 | 06:33 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • बलून किफोप्लास्टी ही आधुनिक स्पाइन सर्जरी  
  • सामान्य वेदना म्हणून दुर्लक्षित करू नये  
  • खराब झालेल्या मणक्याला स्थिरता देऊन तातडीची समस्या दूर करता येते 
Spinal Fracture : किरकोळ वाटणाऱ्या एका पडण्याच्या घटनेनंतर ७५ वर्षीय महिलेला जवळपास वर्षभर मधल्या आणि खालच्या पाठीच्या भागात सतत वेदना होत होत्या. कोणतीही मोठी दुखापत झालेली नसतानाही त्यांच्या वेदना कायम राहिल्या आणि त्याचा परिणाम दैनंदिन जिवनावर होत होता. त्याच्या कामांवर होत होता.

ज्येष्ठ व्यक्तींमध्ये किरकोळ पडल्यानंतर पाठदुखी दीर्घकाळ कायम राहते. त्यामागे मणक्याच्या हाडाला झालेले व्हर्टिब्रल कॉम्प्रेशन फ्रॅक्चर असण्याची शक्यता असते. विशेषतः ऑस्टिओपोरोसिसमुळे हाडे कमजोर होतात. तर हाडे कमजोर असल्यास धोका देखील अधिक असतो.

पुढील तपासण्या आणि इमेजिंगनंतर रुग्णाच्या L2 मणक्यामध्ये ऑस्टिओपोरोसिसमुळे झालेला व्हर्टिब्रल कॉम्प्रेशन फ्रॅक्चर (OVCF) असल्याचे आढळून आले आहेत. मणक्याची हाडे कमजोर झाल्यामुळे ती दबली गेली किंवा त्यांची उंची कमी झाली की व्हर्टिब्रल कॉम्प्रेशन फ्रॅक्चर होऊ शकते. या मध्ये ऑस्टिओपोरोसिस हे यामागील सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे. निरोगी मणक्याला इजा न पोहोचवणाऱ्या तुलनेने किरकोळ दुखापतीनंतरही अशी फ्रॅक्चर होऊ शकतात. रुग्णाची तपासणी किम्स हॉस्पिटल्स मध्ये झाली. ठाणे येथील कन्सल्टंट स्पाइन सर्जरी तज्ज्ञ डॉ. अमोघ झावर यांनी केली. त्यांनी फ्रॅक्चर झालेल्या मणक्याला स्थिरता देण्यासाठी मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे.

बलून किफोप्लास्टी ही आधुनिक स्पाइन सर्जरी

रुग्णावर बलून किफोप्लास्टी (Balloon Kyphoplasty) ही आधुनिक स्पाइन सर्जरी करण्यात आली. या तंत्राचा उद्देश फ्रॅक्चर झालेल्या मणक्याला स्थिरता देण्यासोबतच कमी झालेली मणक्याची काही उंची पुन्हा मिळवण्यास मदत करणे हा आहे. या प्रक्रियेदरम्यान त्वचेवरून एक छोटासा मार्ग तयार करून फ्रॅक्चर झालेल्या मणक्यामध्ये विशेष प्रकारचा बलून घातला जातो. हा बलून काळजीपूर्वक फुगवून जागा तयार केली जाते आणि मणक्याचा आकार पूर्ववत करण्यास मदत केली जाते. आवश्यक सुधारणा झाल्यानंतर बलून काढला जातो आणि मणक्याला स्थिरता देण्यासाठी वैद्यकीय बोन सिमेंट भरले जाते.

संपूर्ण प्रक्रिया स्थानिक भूल देऊन सुमारे ३० मिनिटांत पूर्ण करण्यात आली. सुईच्या आकाराच्या छोट्या प्रवेशमार्गातून ही प्रक्रिया करण्यात आली आणि टाके घालण्याची गरज भासली नाही. रुग्णाला त्याच दिवशी घरी जाता आले. या प्रकरणाबाबत माहिती देताना किम्स हॉस्पिटल्स ठाणे येथील कन्सल्टंट स्पाइन सर्जरी तज्ज्ञ डॉ. अमोघ झावर म्हणाले, “ऑस्टिओपोरोसिसमुळे होणारे मणक्याचे फ्रॅक्चर अनेकदा दुर्लक्षित राहू शकते, विशेषतः जेव्हा ते किरकोळ वाटणाऱ्या पडण्याच्या घटनेनंतर झालेले असते.

Mumbai News: प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून रुग्णालयात नेण्याची वेळ! आरोग्य व्यवस्थेचे धक्कादायक वास्तव

सामान्य वेदना म्हणून दुर्लक्षित करू नये

ज्येष्ठ व्यक्तीला सतत पाठदुखी होत असल्यास, ती केवळ वयामुळे होणारी सामान्य वेदना म्हणून दुर्लक्षित करू नये. या रुग्णाच्या बाबतीत इमेजिंगच्या मदतीने मणक्याचे फ्रॅक्चर ओळखता आले आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह पद्धतीने वेदनांचे मूळ कारण दूर करता आले.”

“बलून किफोप्लास्टीमुळे फ्रॅक्चर झालेल्या मणक्याला यांत्रिक स्थिरता मिळते आणि मणक्याची उंची पूर्ववत करण्यास मदत होऊ शकते. अतिशय छोट्या प्रवेशमार्गातून ही प्रक्रिया केली जात असल्याने योग्य प्रकारे निवडलेल्या रुग्णांना कमी वेळेत प्रक्रिया पूर्ण होणे आणि लवकर हालचाल सुरू करता येणे याचा फायदा होऊ शकतो. मात्र, या प्रक्रियेमुळे फ्रॅक्चरवर उपचार होतो; भविष्यात पुन्हा फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी करण्यासाठी मूळ ऑस्टिओपोरोसिसवरही उपचार करणे आवश्यक आहे.”

खराब झालेल्या मणक्याला स्थिरता देऊन तातडीची समस्या दूर करता येते

या प्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात आले. हाडांची ताकद वाढवण्यासाठी आणि भविष्यातील फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यासाठी ऑस्टिओपोरोसिसवरील वैद्यकीय उपचारही सुरू ठेवण्यात आले. डॉक्टरांच्या मते, फ्रॅक्चर होईपर्यंत ऑस्टिओपोरोसिसची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत, त्यामुळे हा आजार अनेकदा लक्षात येत  नाही. त्यामुळे ज्येष्ठ व्यक्तींमध्ये किरकोळ पडल्यानंतर अचानक किंवा सतत पाठदुखी, शरीराच्या ठेवणीत किंवा उंचीत बदल किंवा हालचाल करताना अडचणी येतात. या अडचणी जाणवत असल्यास वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे.

या प्रकरणातून ज्येष्ठ रुग्णांमध्ये मणक्याच्या फ्रॅक्चरकडे केवळ वेदना कमी करण्याच्या दृष्टीने न पाहता त्यामागील कारणावरही उपचार करण्याचे महत्त्व अधोरेखित होते. खराब झालेल्या मणक्याला स्थिरता देऊन तातडीची समस्या दूर करता येते, तर ऑस्टिओपोरोसिसवर योग्य उपचार करणे हे दीर्घकाळ मणका आणि शरीरातील इतर हाडांचे संरक्षण करण्यासाठी अत्यावश्यक आहे.

Mumbai News: अंधेरी ईएसआयसी रुग्णालय सुरू, मात्र सुविधा अपुऱ्या! पुरुष वॉर्डाची प्रतीक्षा कायम; अन्य रुग्णालयांत जाण्याची वेळ

Web Title: 75 year old woman osteoporosis spinal fracture balloon kyphoplasty thane sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • ahealth news
  • Thane Hospital

संबंधित बातम्या

Chemical Ripened Bananas: तुर्भे APMC मध्ये 1,394 किलो रासायनिक पिकवलेली केळी जप्त; ‘इथेफॉन’चा वापर, केमिकलयुक्त केळी कशी ओळखाल
1

Chemical Ripened Bananas: तुर्भे APMC मध्ये 1,394 किलो रासायनिक पिकवलेली केळी जप्त; ‘इथेफॉन’चा वापर, केमिकलयुक्त केळी कशी ओळखाल

Hypoxia Symptoms : हायपॉक्सिया’ची समस्या काय? दमा, न्यूमोनिया, हृदयविकार आणि रक्तक्षयामुळे धोका !
2

Hypoxia Symptoms : हायपॉक्सिया’ची समस्या काय? दमा, न्यूमोनिया, हृदयविकार आणि रक्तक्षयामुळे धोका !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.