५० व्या वयानंतर बाळाला जन्म देणे शक्य आहे का?
आई होणं ही जगातील अतिशय सुखद आणि आनंद देणारी भावना आहे. बाळाला जन्म देणे हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा क्षण आहे. या दिवसांमध्ये महिलांच्या शरीरात सतत काहींना काही बदल होतात. साधारणता वयाच्या 25 ते 35 वर्षांपर्यंत बाळाला जन्म देता येतो. मात्र वय वाढल्यानंतर गर्भधारणेच्या प्रक्रियेमध्ये अनेक शारीरिक अडथळे निर्माण होतात. मात्र या सर्व अडचणींचा सामना करता इथिओपियातील तिग्रेमध्ये 76 वर्षीय महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. वयाच्या 76 व्या वर्षी बाळाला जन्म देणे हे ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. एम्बेयटे मेधिन हे बाळाला जन्म देणाऱ्या आईचे नाव आहे. 76 वर्षीय महिला गर्भवती कशी राहिली? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत.(फोटो सौजन्य – iStock)
एपिलेप्सी म्हणजे नेमकं काय? मेंदूसंबंधित गंभीर आजार झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे
मात्र यावर एम्बेयटे मेधिनने सेगलेट शो नावाच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या स्पष्टीकरणात सांगितले आहे की, एक वर्षांआधी भारतातील एका रुग्णालयातील डॉक्टरांच्या मदतीने इन विट्रो फर्टिलायझेशनद्वारे गर्भधारणा राहिल्याचे तिने सांगितले आहे. तिने मेकेले येथील रुग्णालयात बाळाला जन्म दिला.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला 50 व्या वयानंतर बाळाला जन्म देणे शक्य आहे का? आयव्हीएफ शस्त्रक्रिया कोणत्या वयात करू शकतो? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
महिलांच्या शरीरात वयाच्या प्रत्येक टप्प्यात सतत काहींना काही बदल होत असतात. या बदलांकडे महिला दुर्लक्ष करतात. पण असे न करता डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा. वयाच्या 35 शी नंतर मुलं जन्माला घालणे अतिशय कठीण होऊन जाते. कारण शरीरात होणारे बदल या गोष्टींसाठी कारणीभूत ठरतात. मासिक पाळीच्या चक्रात होणारे बदल, चुकीची जीवनशैली आणि पोषक तत्वांचा अभाव निर्माण झाल्यानंतर गर्भधारणेच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. मात्र वाय वाढल्यानंतर सुद्धा इन विट्रो फर्टिलायझेश शस्त्रक्रियेद्वारे तुम्ही मुलं जन्माला घालू शकता. पण या प्रक्रियेमध्ये सुद्धा अनेक अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. आयव्हीएफ शस्त्रक्रिया 35 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या महिलांच्यामध्ये प्रामुख्याने यशस्वी ठरते तर 35 वयापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांवर 60 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरण्याची शक्यता असते. 50 व्या वर्षात गर्भधारणा झाल्यानंतर प्रसूतीसंबंधित जास्त जोखीम असते, ज्यामुळे बऱ्याचदा डॉक्टरांना सिझेरियन प्रसूती करावी लागते.
वाढलेले वय,महिलांच्या शरीरात सतत होणारे बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, उशिरा लग्न इत्यादी अनेक गोष्टींमुळे मुलं जन्माला घालण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. या अडथळण्याचा सामना महिलांसह पुरुषांना देखील करावा लागतो. जगभरात वंध्यत्वाच्या समस्येचं सामना अनेक जोडप्याना करावा लागत आहे. सर्वच महिलांना आई होण्याचे सुख अनुभवायचे असते, मात्र यामध्ये अनेक अडथळे काही वेळा निर्माण होतात. मात्र हल्ली विज्ञानात होणाऱ्या प्रगतीमुळे नैसर्गिकरित्या मुलं न झाल्यास आयव्हीएफद्वारे मुलं जन्माला घातले जाते.
किडनी लिव्हर होईल डिटॉक्स! उपाशी पोटी नियमित करा पाण्याचे सेवन, शरीराला होतील कमालीचे फायदे
आयव्हीएफ म्हणजे शुक्राणू आणि अंडे टेस्ट ट्यूबमध्ये मिक्स करून बाळाची प्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया काहीवेळा यशस्वी ठरते तर काहीवेळा यामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. याशिवाय आयव्हीएफ महिलांच्या वय आणि शारीरिक आरोग्यावर अवलंबून असते. नैसर्गिकरित्या गर्भधारणा न झाल्यास आयव्हीएफचा प्रयत्न करू शकता.