उपाशी पोटी नियमित करा पाण्याचे सेवन
जीवन जगण्यासाठी शरीराला पाण्याची आवशक्यता असते. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. दैनंदिन आहारात भरपूर पाण्याचे सेवन करावे. नियमित 7 ते 8 ग्लास पाण्याचे सेवन केल्यास शरीरात अनेक सकारत्मक बदल दिसून येतात. पाण्याचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जातो. जेवणातील पदार्थ बनवताना, धुणी भांडी इत्यादी अनेक गोष्टींसाठी पाण्याचा वापर केला जातो. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले हानिकारक घटक बाहेर पडून जातात, ज्यामुळे शरीर स्वच्छ होते. शरीरात असणाऱ्या प्रत्येक पेशींसाठी पाणी आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
नियमित भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक घामावाटे आणि लघवीवाटे बाहेर पडून जातात. यामुळे किडनी आणि लिव्हर डिटॉक्स होते. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे किडनीचे कार्य बिघडते. रक्त शुद्ध करण्याच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे किडनी स्वच्छ करण्यासाठी सकाळी झोपेतून उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्याचे किंवा थंड पाण्याचे सेवन करावे. किडनी आणि लिव्हरचे कार्य बिघडू नये म्हणून पाण्याचे सेवन करावे.
तेलकट किंवा तिखट पदार्थांच्या सेवनामुळे पचनक्रिया बिघडते. अपचन, गॅस किंवा ऍसिडिटी होण्याची शक्यता असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे जेवलेले अन्नपदार्थ सहज पचन होतात. याशिवाय पचनाच्या समस्येमुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. ज्यामुळे त्वचा आणि शरीर स्वच्छ होते.
शरीराचे मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. उपाशी पोटी एक ग्लास पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म बूस्ट होतात. यामुळे शरीरात कॅलरीज कमी होऊन पोटात होणारी जळजळ कमी होऊन जाते. याशिवाय वाढलेले वजन कमी करण्यासाठी सुद्धा पाणी पिऊ शकता.
शरीर डिहाड्रेट झाल्यानंतर शरीरातील पाणी कमी होते. उपाशी पोटी पाण्याचे सेवन केल्यामुळे डोकेदुखी, अंगदुखी, हृदयाचे आजार, वाढलेले वजन, अस्थमा, टीबी, किडनी आणि लघवी इत्यादी संबंधित आजार बरे होतात. या आजारांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी उपाशी पोटी शक्य होईल तेवढे पाणी प्यावे.
रात्रीच्या वेळी दात कशामुळे दुखतात? दातांचे दुखणे वाढल्यास ‘हे’ घरगुती उपाय करून तात्काळ मिळेल आराम
वाढत्या उन्हामुळे अनेकांना डिहायड्रेशनची समस्या उद्भवू लागते. चक्कर येणे, कमजोरी जाणवणे, वजन कमी होणे इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याचे सेवन केल्यामुळे त्वचा देखील सुंदर आणि देखणी राहते. त्यामुळे जेवल्यानंतर किंवा इतर वेळी मध्ये भरपूर पाणी प्यावे.