Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heart Attack च्या 5 मिनिट्स आधी दिसतात 8 लक्षणं, त्वरीत करा 4 काम नाहीतर यमराज घेईल प्राण

२०२२ मध्ये भारतात हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंमध्ये मोठी वाढ झाली, मागील वर्षी २८,४१३ च्या तुलनेत ३२,४५७ जणांची नोंद झाली, म्हणजेच १२.५% ची वाढ झाली. लक्षणे वेळेत समजून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 19, 2025 | 04:29 PM
हार्ट अटॅकची नक्की लक्षणे काय आहेत (फोटो सौजन्य - iStock)

हार्ट अटॅकची नक्की लक्षणे काय आहेत (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

हृदयापर्यंत रक्त पोहोचवणाऱ्या कोणत्याही धमन्यांमध्ये अचानक अडथळा निर्माण झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो. यामुळे हृदयाला ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळत नाहीत, ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंना नुकसान होऊ लागते. वेळेवर उपचार न मिळाल्यास हृदयविकाराचा झटका प्राणघातक ठरू शकतो ही सामान्य माहिती आपल्या सगळ्यांनाच आहे. 

तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जर हृदयविकाराची लक्षणे योग्य वेळी ओळखली गेली तर मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो. म्हणूनच हृदयविकाराची लक्षणे ओळखणे खूप महत्वाचे आहे. हृदयविकाराचा झटका ही एक आपत्कालीन स्थिती आहे परंतु जर त्याची लक्षणे वेळेवर ओळखली गेली तर जीव वाचवता येतो.

काय सांगतात तज्ज्ञ

‘कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिक’चे संचालक कपिल त्यागी यांच्या मते, हृदयविकाराची लक्षणे योग्य वेळी ओळखली जात नाहीत. तथापि, काही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की हृदयविकाराची लक्षणे एक महिना आधीच दिसू लागतात. जर एखाद्याला हृदयविकाराचा झटका येणार असेल तर काही लक्षणे पाच किंवा काही मिनिटे आधीदेखील दिसू शकतात. या स्थितीत, काही उपाय करून रुग्णाचा जीव वाचवता येतो आणि ही लक्षणे नक्की कोणती आहेत याबाबत आपण माहिती करून घेऊया 

Heart Attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात 3 गंभीर लक्षणं, काय करावे घ्या जाणून

अचानक घाम येणे

अचानक घाम येऊन त्रास होणे

तुम्हाला विनाकारण थंडावा असणारा घाम येऊ शकतो. विशेषतः कपाळावर, मानेवर किंवा तळहातावर चिकट किंवा थंड घाम येऊ शकतो. याशिवाय, तुम्हाला जबडा, मान, पाठ किंवा हातांमध्ये, विशेषतः डाव्या हातात वेदना जाणवू शकतात. ही वेदना छातीपासून इतर कोणत्याही भागात पसरू शकते. असे लक्षण दिसत असल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवावे 

श्वास घ्यायला त्रास 

हृदयविकाराच्या आधी तुम्हाला छातीत घट्टपणा, जळजळ किंवा जडपणा जाणवू शकतो. छातीवर काहीतरी ओझे असल्यासारखे वाटू शकते. वेदना सतत वाढत जातात आणि थांबत नाहीत. याशिवाय, तुम्हाला कोणतीही हालचाल केलेली नसतसानाही श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तुम्हाला पुरेशी हवा मिळत नसल्यासारखे वाटू शकते.

मळमळ आणि बेचैनी

हार्ट अटॅकच्या आधी तुम्हाला मळमळ जाणवू शकते. तुम्हाला गॅस किंवा आम्लयुक्त त्रासासारखे वाटू शकते. अचानक अस्वस्थपणा येणे आणि चिंताग्रस्त वाटू शकते. हे मृत्यूच्या भीतीमुळेदेखील असू शकते. याशिवाय तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो आणि बेशुद्ध पडल्यासारखे वाटू शकते. 

जर ही लक्षणे 5 मिनिटांपेक्षा जास्त काळ राहिली तर आपत्कालीन मदत घ्या. लक्षात ठेवा की प्रत्येक हृदयविकाराचा झटका सारखा नसतो. काही लोकांना छातीत दुखण्याशिवाय झटका येऊ शकतो, विशेषतः महिला, वृद्ध आणि मधुमेही रुग्ण यांना ही भीती अधिक असते 

हार्ट अटॅक येण्याआधी शरीराच्या ‘या’ भागांमध्ये होतात जीवघेण्या वेदना,दुर्लक्ष केल्यास उद्भवतात गंभीर समस्या

लहान सवयी महत्त्वाच्या 

कोलेस्ट्रॉल हे हृदयविकाराचे एकमेव कारण नाही. काही दैनंदिन सवयी हृदयाच्या आरोग्यालाही हानी पोहोचवू शकतात. कमी झोप, बसून वेळ घालवणे आणि सतत ताणतणाव या सर्वांचा हळूहळू हृदयावर परिणाम होतो. म्हणून, तुम्ही तुमच्या या छोट्या सवयींकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्यात वेळीच सुधारणा केली पाहिजे. 

स्ट्रेच करा आणि झोप घ्या 

जेवल्यानंतर चाला आणि काळजी घ्या

जेवणानंतर सावधगिरीने श्वास घेण्याचा सराव करा, रोज हळूवार चाला. जेवणानंतर थोडे चालणे केवळ पचन सुधारण्यास मदत करत नाही तर जळजळ कमी करते, रक्तातील साखर नियंत्रित ठेवते, हृदयरोगांचा धोका कमी करते. जर तुम्ही दररोज १० मिनिटे चाललात तर ही सवय एक मजबूत संरक्षणात्मक कवच बनते. 

तुम्हाला माहिती आहे का की कमी झोपेमुळे हृदयरोगाचा धोका २००% वाढतो? झोप केवळ विश्रांतीच देत नाही तर शरीराची दुरुस्ती देखील करते. झोपेचा अभाव ताण, रक्तदाब आणि जळजळ वाढवतो. दररोज ७ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे. याशिवाय सकाळचा सूर्यप्रकाश तुमच्या शरीराचे घड्याळदेखील सेट करतो.

वजन नियंत्रणात ठेवा 

वजनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे

जर तुम्ही प्लास्टिकमध्ये अन्न गरम केले किंवा साठवले तर तुम्ही हळूहळू स्वतःला विष देत आहात हे लक्षात घ्या. प्लास्टिकमधून बाहेर पडणारे रसायन शरीरातील हार्मोन्समध्ये व्यत्यय आणतात आणि जळजळ वाढवतात. ही दोन्ही हृदयरोगाची कारणे आहेत. प्लास्टिकऐवजी स्टील किंवा काच वापरा. ​​

वेळोवेळी फिल्टर केलेले पाणी प्या. वाढत्या वजनामुळे हृदयावर ताण येतो. पोट आणि कंबरेवर जमा झालेली चरबी धोकादायक ठरू शकते. थोडेसे वजन कमी केल्यानेही मोठा फरक पडू शकतो. हृदयविकाराचा झटका अचानक येत नाही. तो तुमच्या रोजच्या सवयींमुळे तयार होतो. पण चांगली गोष्ट म्हणजे चांगल्या रोजच्या सवयींमुळे प्रतिबंधदेखील शक्य आहे.

Web Title: 8 symptoms before 5 minutes of heart attack how to reduce risk easily 4 tips by experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 04:29 PM

Topics:  

  • Health News
  • heart attack awareness
  • heart attack reason

संबंधित बातम्या

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान
1

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान

World Mosquito Day : 2025 मध्ये का वाढला आहे डासांचा धोका? जाणून घ्या उपाय आणि प्रतिबंध
2

World Mosquito Day : 2025 मध्ये का वाढला आहे डासांचा धोका? जाणून घ्या उपाय आणि प्रतिबंध

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
3

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

सावधान! हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ भयानक लक्षणे, दुर्लक्ष केल्यास अचानक होईल मृत्यू
4

सावधान! हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ भयानक लक्षणे, दुर्लक्ष केल्यास अचानक होईल मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.