आजच्या काळात हृदयविकाराचा झटका तरुणांना आपल्या विळख्यात घेत आहे. बदललेली लाइफस्टाइल, कोणत्याही वेळी खाणंपिणे, व्यायाम न करणे यामुळे मोठ्या प्रमाणात तरूणांना हार्ट अटॅक येताना दिसू येत आहे. मात्र हा हार्ट अटॅक एका झटक्यात येत नाही तर त्यापूर्वी काही दिवस, महिने याचे संकेत शरीराला मिळत असतात. हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे ओळखून हृदयविकार रोखता येतो. हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत आणि हृदयविकाराचा झटका आल्यास काय करावे याबाबत अधिक माहिती आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया (फोटो सौजन्य - iStock)
हृदयविकाराचा झटका अचानक येत नाही तर त्याआधी शरीराला त्याचे काही संकेत मिळत असतात. तज्ज्ञ हार्ट स्पेशालिस्ट डॉ. कुमार संजीव यांनी याबाबात अधिक माहिती दिली आहे
जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा छातीत दाब, घट्टपणा आणि जळजळ जाणवते. छातीत दुखणे काही मिनिटे टिकते. ही वेदना वारंवार येऊ शकते आणि जाऊ शकते. शरीराला खूप घाम येतो
हृदयविकाराचा झटका आल्यावर श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. श्वास घेण्यास त्रास होण्यासोबतच घाबरण्याची, अस्वस्थतेची आणि विचित्र त्रासाची भावनादेखील असू शकते
हृदयविकाराच्या वेळी, केवळ छातीतच नाही तर शरीराच्या अन्य काही भागांमध्येदेखील वेदना जाणवू शकतात. छातीतील वेदना या आपला डावा हात, पाठ, मान आणि जबड्यात पसरू शकतात. हृदयविकाराच्या वेदना सौम्यतेने सुरू होतात आणि हळूहळू तीव्र होतात. पाठ किंवा जबड्यातही वेदना होऊ शकतात
जर तुम्हाला हृदयविकाराची लक्षणे जाणवत असतील तर घाबरू नका, तर रुग्णवाहिका बोलवा आणि शक्य तितक्या लवकर डॉक्टरकडे जा. वैद्यकीय आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून बोलावून घ्या
जर रुग्ण बेशुद्ध झाला असेल तर त्याला सीपीआर देणे सुरू करा. वैद्यकीय आपत्कालीन क्रमांकावर कॉल करा आणि वेळीच जीव वाचवा