हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात कोणती लक्षणे दिसतात
मागील काही वर्षांमध्ये हार्ट अटॅक येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम गंभीर रित्या शरीरावर दिसून आल्यामुळे हृद्यविकारांसारखे गंभीर आजार उद्भवू लागले आहेत. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर संपूर्ण शरीराचे चक्र बदलून जाते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप, सतत काम करत राहणे, तेलकट तिखट पदार्थांचे सेवन करणे इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. काही वर्षांआधी हृदयविकाराचा झटका वृद्ध आणि वयस्कर लोकांना येत होता. मात्र हल्लीच्या तरुण पिढीमध्ये हृद्यविकाराकचा झटका येणे सामान्य झाले आहे. वयाच्या 20 व्या वर्षीसुद्धा हार्ट अटॅक येऊ लागल्यामुळे सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे.
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात अनेक वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. हार्ट अटॅक आल्यानंतर हृदयाच्या स्नायूंच्या एक किंवा अधिक भागांचा ऑक्सिजन पुरवठा कमी होऊन जातो. हार्ट अटॅक आल्यानंतर छातीतच दुखते असते अनेकांना वाटत. पण असे नाही. हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात अनेक वेगवेगळी लक्षणे जाणवू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास काहीवेळा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात कोणती लक्षणे दिसतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: पोटातील जंतांच्या त्रासाने त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, पोट होईल स्वच्छ
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी मान आणि पाठ दुखण्यास सुरुवात होते. ही लक्षणे दिसू लागल्यानंतर लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी. हृदयविकार होण्याआधी मान आणि पाठीचे दुखणे वाढू लागते.
हृदयविकाराचा झटका येण्याआधी डाव्या हातात सतत वेदना होऊ लागतात. डाव्या हातामध्ये वेदना होण्यास सुरुवात झाल्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन औषध उपचार करावे. डाव्या हातात वेदना होत असतील तर दुर्लक्ष करू नये.
हृदयविकाराचा झटका येण्याआधी पोटात दुखण्यास सुरुवात होते. काहींना पोटाच्या वरच्या भागात वेदना होऊ लागतात. पण काही लोक गॅस किंवा असिडिटी झाली असेल असे बोलून सोडून देतात. पण पुढे जाऊन पोटदुखीसह श्वासोच्छवास, उलट्या आणि मळमळ इत्यादी लक्षणे जाणवू लागल्यास दुर्लक्ष करू नये.
हे देखील वाचा: व्याघ्रासनामुळे शरीराला मिळतात हे 5 फायदे
हृदयविकाराचा झटका येण्याआधी तोंडाच्या जबड्यात तीव्र वेदना होऊ लागतात. पण काहींना वाटते दातांची समस्या उद्भवली असेल. पण असे नसून हृदयविकाराची लक्षणे आहेत. अशी कोणतीही लक्षणे जाणवू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.