
पदार्थ कशा पद्धतीने उकडवावे पूर्ण माहिती (फोटो सौजन्य - iStock)
बटाटा कसे उकडवून घ्याल
बटाटा भाजी वा भरीत किंवा दम आलू बनवण्यासाठी बटाटे उकडून घ्यावे लागतात. तथापि, बटाटे उकडून घेण्यासाठी ते कधीही उकळत्या पाण्यात घालू नका. बटाटे उकडून घेण्यासाठी नेहमी थंड पाण्यात उकळून सुरुवात करणे योग्य आहे. हळूहळू पाणी गरम केल्याने आतून आणि बाहेरून बटाटे योग्य पद्धतीने शिजतात. बटाटे बाहेरून चिकट होत नाहीत आणि आतून कच्चे राहत नाहीत.
डोसा सारखा तव्याला चिकटतोय? मग या टिप्स फॉलो करा आणि तयार करा पातळ-कुरकुरीत डोसा
अंडी उकडण्याची योग्य पद्धत
तुम्ही दररोज अंडी खाता. अनेकदा, उकडून घेताना अंडी फुटतात. हे चुकीच्या उकळीमुळे असू शकते. अंडी व्यवस्थित उकडवून घेण्यापूर्वी नेहमी थंड पाण्यात ठेवा. यामुळे अंडी फुटण्यापासून रोखली जाईल आणि अंड्यातील पिवळ बलक व्यवस्थित शिजले आहे याची खात्री होईल. पाणी हळूहळू गरम होत असताना, अंड्याचे कवच फुटणार नाहीत. अंड्याचा पांढरा आणि पिवळा भागदेखील व्यवस्थित शिजेल.
पास्ता आणि मॅकरोनी कसे उकळवाल
पास्ता, मॅकरोनी आणि नूडल्सदेखील सध्या लोकप्रिय पदार्थ आहे. हे पदार्थ तयार करण्यासाठी, तुम्ही प्रथम एका भांड्यात पाणी उकळायला आणावे. पास्ता आणि नूडल्स थंड पाण्यात उकळल्याने ते खराब होऊ शकतात. गरम पाण्यात पास्ता उकळल्याने ते कडक आणि चिकट होण्यापासून रोखले जाते. त्यामुळे पास्ता आणि मॅकरोनी वा नुडल्स हे नेहमी गरम पाण्यात उकडून घ्यावे.
फ्लॉवरची भाजी
तुम्ही हिवाळ्यात फ्लॉवरची भाजी भरपूर प्रमाणात खाल्ली असेल. तथापि, ते जंतूयुक्त असू शकते, म्हणून वापरण्यापूर्वी ते गरम पाण्यात थोडे उकळले पाहिजे. कधी कधी फ्लॉवरमध्ये किडे लपलेले असतात. तुम्ही ब्रोकोलीदेखील त्याच प्रकारे उकडून घेतली पाहिजे. भाज्या ब्लँच करण्यासाठी किंवा उकळण्यासाठी नेहमी गरम पाण्याचा वापर करा. यामुळे भाज्या जास्त काळ शिजवून घेण्याची गरज नाहीशी होते आणि सर्व पोषक तत्वे टिकून राहतात.
पहा व्हिडिओ