Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्करोग रुग्णांच्या सेवेत परिचारिकांची भूमिका मोलाची; संभाजीनगरमध्ये ‘ऑन्कोलॉजी नर्सिंग केअर’ कार्यशाळा संपन्न

कार्यशाळेचे उ‌द्घाटन घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 05, 2026 | 04:25 PM
कर्करोग रुग्णांच्या सेवेत परिचारिकांची भूमिका मोलाची; संभाजीनगरमध्ये 'ऑन्कोलॉजी नर्सिंग केअर' कार्यशाळा संपन्न

कर्करोग रुग्णांच्या सेवेत परिचारिकांची भूमिका मोलाची; संभाजीनगरमध्ये 'ऑन्कोलॉजी नर्सिंग केअर' कार्यशाळा संपन्न

Follow Us
Follow Us:

 

  • कर्करोग रुग्णांच्या सेवेत परिचारिकांची भूमिका मोलाची
  • संभाजीनगरमध्ये ‘ऑन्कोलॉजी नर्सिंग केअर’ कार्यशाळा संपन्न
  • यांनी केले मार्गदर्शन
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयात परिचारिकांच्या व्यावसायिक कौशल्यवृद्धीसाठी व्यापक ऑन्कोलॉजी नर्सिंग केअरः प्रतिबंध ते उपशामक उपचार या विषयावर विशेष कार्यशाळा उत्साहात पार पडली. महाराष्ट्र राज्य परिचारिका (शासनमान्य) संघटनेच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेचे उद्‌घाटन आणि प्रमुख उपस्थिती

कार्यशाळेचे उ‌द्घाटन घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण जक्कल, शस्त्रक्रियागार विभागप्रमुख डॉ. अनघा वरुडकर, रुग्णालयाच्या अधिसेविका मंदाकिनी ठोकळ, महाराष्ट्र राज्य परिचर्या परिषदेच्या सदस्य अनसूया सावरगावे यांची उपस्थिती होती.

मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात वाढतो ‘या’ कॅन्सरचा धोका, वेळीच सावध होऊन ओळखा लक्षणे

यांनी केले मार्गदर्शन

कार्यक्रमाची सुरुवात परिचर्या व्यवसायाच्या आद्य प्रेरणास्थान असलेल्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमापूजनाने झाली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. शिवाजी सुळे यांनी कर्करोग रुग्णांच्या उपचारात परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. तसेच रुग्णसेवेत सहानुभूती, तांत्रिक कौशल्य आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अरविंद गायकवाड यांनी ऑन्कोलॉजी नर्सिंगमधील बदलते उपचारप्रवाह आणि परिचारिकांची जबाबदारी यावर प्रकाश टाकला.

यांची होती उपस्थिती

कार्यशाळेत सुप्रिया भगत, ऋषिकेश देवडे, अश्विनी जाधव, जयश्री पाटील, आम्रपाली शिंदे या तज्ज्ञांनी कर्करोग प्रतिबंध, उपचार प्रक्रिया, रुग्ण व्यवस्थापन आणि उपशामक उपचार यांवर व्याख्याने दिली. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने सचिन देवकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला विधाते यांनी केले, तर आभार प्रदर्शन संघटनेच्या कोषाध्यक्षा शुभांगी कडू यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

कॅन्सरच्या 40% प्रकरणांमध्ये बचाव शक्य! फक्त या 5 सवयी बदला; WHO च्या नव्या अभ्यासातून समोर आले सत्य

Web Title: Oncology nursing care workshop chhatrapati sambhajinagar cancer hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • cancer
  • Chhatrapati Sambhajinagar
  • lifestyle news

संबंधित बातम्या

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
1

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

कर्करोग आजाराने ग्रस्त मुलांच्या चेहऱ्यावर फलले हास्य, अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी ५०व्या वाढदिवसानिमित्त उपचारासाठी घेतला पुढाकार
2

कर्करोग आजाराने ग्रस्त मुलांच्या चेहऱ्यावर फलले हास्य, अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी ५०व्या वाढदिवसानिमित्त उपचारासाठी घेतला पुढाकार

Mushtaq Khan : प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन, कॅन्सरने केला घात
3

Mushtaq Khan : प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन, कॅन्सरने केला घात

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
4

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.