वयानुसार संतुलित आहार
संतुलित आहारामध्ये आपल्या शरीराच्या कार्यासाठी आणि वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. संतुलित आहारामुळे शरीराला आवश्यक असलेल्या उर्जेची गरज पूर्ण होतेच. तसेच शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पौष्टिक कमतरता यांची ही गरज पूर्ण हाेते. कारण त्यामध्ये शरीराला आवश्यक असलेल्या पोषक तत्वे जसे कर्बोदके, प्रथिने, चरबी, जीवनसत्त्वे, खनिजे आणि पाणी यांचा समावेश असताे.
याविषयी याविषयी बोलताना पुणे येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्य आहारतज्ज्ञ संजय कुमार मिश्रा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. संतुलित आहारासह शरीराची नियमित हालचाल करणे, याेग्य वजन राखणे यामुळे एकूणच आपले आरोग्य आणि शक्ती कायम राहते. प्रौढांमध्ये निरोगी आहार घेण्यामुळे चांगली प्रतिकार शक्ती तयार होते. त्याचबराेबर हृदय व रक्तवाहिन्या संबंधी रोग, टाइप 2 मधुमेह, विशिष्ट कर्करोग यांचाही धोकाही कमी होतो. तसेच शारिरीक आघात आणि रोगांपासून त्वरीत बरे देखील हाेण्यास मदत हाेते. वयानुसार विशिष्ट पोषणाची गरज असते कसे ते आपण जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
बाल्यावस्था (0 ते 6 महिने)
पहिले सहा महिने आईचे दूधच पूर्णान्न
बाळाला आईच्या दुधामध्ये 6 महिन्यांपर्यंत आवश्यक असलेली सर्व पोषक तत्वे, ऊर्जा आणि द्रव असतात. सहा महिन्यापर्यंत लहान बाळांना फक्त स्तनपान करण्याची शिफारस केली जाते. एखाद्या विशेष किंवा दुर्मिळ प्रकरणात जेव्हा आई बाळाला दूध पाजण्याच्या स्थितीत नसते तेव्हा त्याला पूरक आहार किंवा फॉर्म्युला फीड देऊ शकतो. परंतु फॉर्म्युला फीड हा आईच्या दुधाला मात्र पर्याय ठरू शकत नाही.
सहा महिन्यानंतर हळूहळू 1 वर्षापर्यंत बाळाला आईच्या दुधासह पातळ किंवा चावून खाता येउ शकताे असा आहार घ्या आणि नंतर ताे पुढेही सुरू ठेवा. स्तनपान हे 2 वर्षांपर्यंत चालू ठेवता येते. जसजसे ते हळूहळू कमी होत जाते, तसतसे बाळाला संतुलित जीवनसत्व आणि खनिजयुक्त आहार द्यावा. ज्यामध्ये साध्या शिजवलेल्या डाळी आणि मसूर, दूध, दही, पनीर, अंडी, मासे, हिरव्या भाज्या, विविध प्रकारची तृणधान्ये असलेली फळे यांचा समावेश हाेताे. जास्त साखर किंवा मीठ असलेले पदार्थ टाळावे अशी शिफारस केली जाते.
लहान मुले
लहान मुलांचे डाएट
एकदा मुलाने घन पदार्थही खायला सुरुवात केली की, त्यांना विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची ओळख करून दिली पाहिजे. कारण, या वयात ते सामान्यतः पूरक आहार घेउ शकतात. मुलांची वाढ आणि त्यांच्या शारीरिक हालचालींचा विचार करता त्यांना त्यानुसार अन्न दिले पाहिजे. जेणेकरून त्यांची प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांची आवश्यकता पूर्ण होईल. त्यांच्या आहारात तृणधान्ये, (गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, इ.) कडधान्ये आणि शेंगा फळे आणि भाज्या आणि दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यासारख्या सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश असावा.
किशोर आणि तरुणावस्था
तरूण वयात काय खावे
या वयात, शारीरिक हालचालींना प्राधान्य दिले पाहिजे. यामध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम अशा संतुलित आहाराचा समावेश केला पाहिजे. तसेच, आहारातील चरबी आणि मीठयुक्त पदार्थ प्रतिबंधित केले पाहिजेत.
हेदेखील वाचा – स्तनपान करताय! मग,आहारात हे खाल्ल्यास बाळाचं पोषण चांगलं होणारच !
ज्येष्ठ नागरीक
वयानुसार आहार घेणे आवश्यक
या वयोगटातील व्यक्तींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्यांचे आरोग्य आबाधित राखण्यासाठी आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. रोजच्या दिनचर्येत शारीरिक व्यायामाचा समावेश करणे आवश्यक आहे. तसेच, दूध, दही, अंडी, मासे, शेंगदाणे आणि तेलबिया यांसारख्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी उर्जेपेक्षा अधिक पोषक तत्वांनी समृद्ध असलेले अन्न घ्यावे. मजबूत हाडांसाठी दररोज सूर्यप्रकाशात काही मिनिटे (सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान) फिरावे जेणेकरून व्हिटॅमिन डी शरीरात शाेषले गले पाहिजे.
संतुलित आहार हे कुपोषण, लठ्ठपणा आणि इतर चयापचय विकारांपासून बचाव करण्यासाठी एक ढाल म्हणून काम करते. म्हणूनच वयाची पर्वा न करता संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीला प्राधान्य देणे हे प्रत्येकाच्या निराेगी आयुष्यासाठी आवश्यक आहे.