मोड आलेले कडधान्य खाण्याचे फायदे
शरीरामध्ये रक्ताची किंवा पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. अशावेळी डॉक्टर भिजवलेले कडधान्य, फळे, ड्रायफूट खाण्याचा सल्ला देतात. या सर्व पदार्थांमध्ये असलेले पोषक घटक आरोग्यासाठी गुणकारी आहेत. त्यामुळे निरोगी जीवनशैली जगण्यासाठी रोजच्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करावा. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात, जे खाल्ल्याने शरीरसंबंधित समस्या कमी होऊन आरोग्य सुधारते. मल्टीविटामिनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात मोड आलेल्या कढधान्यांचा समावेश करावा. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मोड आलेली कडधान्य खाल्ल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
मोड आलेली कडधान्य कच्ची खाण्याचा सल्ला दिला जातो. पण कच्ची कडधान्य खाल्ल्यामुळे अनेकांना त्रास होतो. अशावेळी तुम्ही कढधान्य अर्धवट शिजवून त्यात तुम्हाला हवे असलेले मसाले टाकून खाऊ शकता. यामुळे कोणताही त्रास होणार नाही. मोड असलेल्या कडधान्यांमध्ये दालचिनी, वेलची, सेलेरी आणि लसूण इत्यादी मसाले घालून खाल्ल्यास त्याची चव सुद्धा सुंदर लागते. (फोटो सौजन्य-istock)
मोड आलेले कडधान्य खाण्याचे फायदे
मोड आलेल्या कडधान्यांमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, झिंक आणि अँटी-ऑक्सिडंट्स तसेच विटामिन ए, बी, सी आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळून येतात. शरीरातील कमी झालेली ऊर्जा आणि मल्टीविटामिनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कडधान्यांचा समावेश करावा. पोषक तत्वांनी समृद्ध असलेली कडधान्य आरोग्यसाठी खूप फायदेशीर आहेत.
हे देखील वाचा: तुम्ही तुमच्या जेवणात भेसळयुक्त हळद वापरत तर नाही ना? जाणून घ्या
रोजच्या आहारात मसूर, चणे, सोयाबीन, मूग, राजमा इत्यादी कडधान्यांचा समावेश करावा. शाहाकारी जेवण जेवणाऱ्या व्यक्तींसाठी मोड आलेली कडधान्य हा एक उत्तम पर्याय आहे. स्नायूंच्या दुरुस्तीसाठी, वाढीसाठी, मेंदूच्या विकासासाठी मोड आलेली कडधान्य खावीत.
मोड आलेले कडधान्य खाण्याचे फायदे
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करावा. मूग, मटकी, राजमा इत्यादी कडधान्य नियमित खावीत. कमी कॅलरी आणि भरपूर पोषक घटक आणि उच्च फायबर मोड आलेल्या कडधान्यांमध्ये असते.
हे देखील वाचा: शरीरच नाही तर मेंदूही आतून कमकुवत करते विटामिन बी12 ची कमतरता, 4 शाकाहारी पदार्थ खावेच
मोड आलेल्या कडधान्यांमध्ये फायबर आणि प्रथिने, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून संपूर्ण हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोजच्या आहारात मोड आलेले कडधान्य खावेत.