Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चमचाभर बडीशेप केसांवर करेल जादू! कमी खर्चात घरीच तयार करा केमिकल फ्री नॅचरल हेअरडाय, केसांवर येईल चमक

पांढरे केस काळे करण्यासाठी कोणत्याही केमिकल युक्त हेअर डायचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावे. आज आम्ही तुम्हाला बडीशेप हेअर डाय बनवण्याची कृती सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 29, 2026 | 10:28 AM
चमचाभर बडीशेप केसांवर करेल जादू! कमी खर्चात घरीच तयार करा केमिकल फ्री नॅचरल हेअरडाय, केसांवर येईल चमक

चमचाभर बडीशेप केसांवर करेल जादू! कमी खर्चात घरीच तयार करा केमिकल फ्री नॅचरल हेअरडाय, केसांवर येईल चमक

Follow Us
Close
Follow Us:

हल्ली तरुण वयात केस पांढरे होणे, केस तुटणे किंवा केसांमध्ये कोंडा होणे या अतिशय सामान्य समस्या आहेत. केस पांढरे झाल्यानंतर ते पुन्हा एकदा काळे आणि चमकदार करण्यासाठी महिला काहींना काही करतात. कधी हेअर डाय लावला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेले केमिकल युक्त हेअर कलर लावून केस काळे किंवा लाल केले जातात. पण वारंवार केमिकल युक्त हेअर डाय करणे केसांच्या वाढीसाठी अजिबात चांगले नाही. यामुळे केसांच्या मुळांना हानी पोहचण्याची शक्यता असते. बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर डायमध्ये अमोनिया सारख्या घातक केमिकलचा वापर केला जातो. हे केमिकल केसांचे गंभीर नुकसान करतात. त्यामुळे केस पांढरे झाल्यानंतर वारंवार हेअर कलर किंवा मेहेंदी लावू नये.(फोटो सौजन्य – istock)

केसांचे सौंदर्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी नियमित खा ‘हा’ पौष्टिक लाडू, महिनाभरात होतील गुडघ्यापर्यंत लांबलचक केस

पांढऱ्या केसांवर महिन्यातून एकदा किंवा दोनदा मेहेंदी लावली जाते. पण मेहेंदी लावल्यामुळे केस कोरडे होऊन जातात. केसांची नैसर्गिक चमक कमी झाल्यानंतर केस अतिशय निस्तेज वाटू लागतात. त्यामुळे कायमच केसांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय करावेत. आज आम्ही तुम्हाला चमचाभर बडीशेपचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये हेअर डाय बनवण्याची कृती सांगणार आहोत. या पद्धतीने तयार केलेला हेअर डाय केस अतिशय चमकदार आणि काळेभोर करण्यास मदत करतो. बडीशेपचा वापर केवळ पचनक्रिया सुधारण्यासाठीच नाहीतर केसांसाठी सुद्धा केला जातो.

बडीशेपपासून हेअर डाय बनवण्याची सोपी कृती:

बडीशेप हेअर डाय बनवण्यासाठी सर्वप्रथम, बडीशेप पाण्यात पूर्णपणे भिजत ठेवा. रात्रभर बडीशेप भिजल्यानंतर त्यातील जास्तीचे पाणी काढून टाका. त्यानंतर सुती कपड्यावर बडीशेप सुकवण्यासाठी ठेवा. कढई गरम करून त्यात सुकलेली बडीशेप मंद आचेवर पूर्णपणे काळी होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर काळी झालेली बडीशेप थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाका आणि बारीक वाटून पावडर तयार करा. तयार केलेली बडीशेप पावडर तीन महिने व्यवस्थित टिकून राहते. वाटीमध्ये बडीशेप पावडर घेऊन त्यात एलोवेरा जेल मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट काहीवेळ तशीच ठेवा आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर ब्रशच्या सहाय्याने केसांवर तयार केलेले मिश्रण लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ करून घ्या. १ ते २ तास बडीशेपची पेस्ट केसांवर तशीच ठेवावी.

Dark Circles: डोळ्यांभोवती वाढलेल्या डार्क सर्कल्समुळे त्वचा खूप जास्त निस्तेज दिसते? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम

बडीशेप हेअर डाय लावण्याचे फायदे:

बडीशेप केवळ पचनक्रियेसाठीच नाहीतर संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय महत्वाची आहे. यामध्ये अमोनिया किंवा पॅराबेन्ससारखे घातक घटक अजिबात आढळून येत नाहीत. यामुळे हेअर डाय लावल्यानंतर डोळ्यांमध्ये किंवा त्वचेमध्ये कोणतीही जळजळ होत नाही. बडीशेपमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि पोषक घटक आढळून येतात, ज्यामुळे केसांच्या मुळांना भरपूर पोषण मिळते आणि केसांची झपाट्याने वाढ होण्यास मदत होते. बडीशेपमध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे टाळूवर वाढलेले इन्फेक्शन आणि कोंडा कमी होण्यास मदत होते. हेअर डाय लावल्यामुळे केसांना केवळ काळा रंगच नाही केसांच्या मुळांना आतून पोषण मिळते आणि केस चमकदार होतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: A spoonful of fennel will do magic on your hair make chemical free natural hair dye at home at low cost shine on your hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 10:28 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

तुमचेही केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत का? हे 6 संकेत सांगतात… केसांत जास्त झालंय ब्लीचचं प्रमाण
1

तुमचेही केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत का? हे 6 संकेत सांगतात… केसांत जास्त झालंय ब्लीचचं प्रमाण

Curry Leaves: वेटलॉस ते ब्लड शुगर कंट्रोल; कढीपत्ता आरोग्यासाठी वरदान, वाचा अद्भुत फायदे
2

Curry Leaves: वेटलॉस ते ब्लड शुगर कंट्रोल; कढीपत्ता आरोग्यासाठी वरदान, वाचा अद्भुत फायदे

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ
3

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ

Hair Care Tips: १० रुपयांमध्ये केस होतील चमकदार आणि काळेभोर! घरीच सोप्या पद्धतीमध्ये तयार करा नॅचरल रिठा शाम्पू
4

Hair Care Tips: १० रुपयांमध्ये केस होतील चमकदार आणि काळेभोर! घरीच सोप्या पद्धतीमध्ये तयार करा नॅचरल रिठा शाम्पू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.