
पोटावर वाढलेली चरबी झपाट्याने होईल कमी! स्वयंपाक घरातील 'या' चिमूटभर मसाल्याचा नियमित करा वापर
वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. महागडे डाएट, आहारातील बदल, तासनतास व्यायाम, डिटॉक्स पेय इत्यादी अनेक गोष्टी फॉलो केल्या जातात. पण तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडते. शरीरावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी सोशल मीडियावर दाखवले जाणारे अनेक वेगवेगळे उपाय केले जाते. मात्र हे उपाय केल्यामुळे काहीवेळा शरीरावर विचित्र आणि जीवघेणे परिणाम दिसून येतात. रोजच्या आहारात सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे पोटावर चरबीचा घेर वाढू लागतो. चरबीचा घेर वाढल्यानंतर कपडे घालताना किंवा कपडे विकत घेताना महिला खूप जास्त विचार करतात.(फोटो सौजन्य – istock)
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा मेडिकलमध्ये उपलब्ध असलेल्या गोळ्या औषधांचे किंवा वेगवेगळ्या सप्लिमेंट्सचे सेवन करतात. पण वारंवार हानिकारक सप्लिमेंटचे सेवन केल्यामुळे किडनी निकामी होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या मसाल्याचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या मसाल्याच्या वापरामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल आणि मेटाबॉलिज्म सुधारण्यास मदत होईल.
प्रत्येक स्वयंपाक घरात काळीमिरी असतेच, काळीमिरीचा वापर घरातील लाल तिखट मसाला बनवण्यासोबतच गरम मसाला बनवण्यासाठी केला जातो. काळीमिरी चवीला अतिशय असते. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली काळीमिरी संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे. काळीमिरीमध्ये पिपेरिन नावाचा घटक आढळून येतो. ज्यामुळे शरीरातील कॅलरीज वेगाने बर्न होतात. त्यामुळे नियमित काळीमीरीचे सेवन केल्यास महिनाभरात पोटावर वाढलेला चरबीचा थर कमी होईल.
बाजारात काळीमिरी पावडर सहज उपलब्ध होते. सकाळी उठल्यानंतर ग्रीन टी किंवा ब्लॅक टी चे सेवन करताना त्यात काळीमिरी पावडर टाकावी. काळीमिरी पावडर टाकून बनवलेल्या चहाचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घाण आणि पोटावर वाढलेला चरबी थर कमी होईल. याशिवाय कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि काळीमिरी पावडर मिक्स करून प्यायल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल. तसेच जेवणात सूप किंवा सॅलड खाताना तुम्ही काळीमिरी पावडर टाकून खाऊ शकता. काळीमीरीचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी काळीमीरीचे सेवन करावे.
बेली फॅट म्हणजे काय?
बेली फॅट म्हणजे पोटाच्या आणि ओटीपोटाच्या भागात साठलेली अतिरिक्त चरबी.
बेली फॅट कमी करण्यासाठी घरगुती उपाय काय आहेत?
दिवसभर पुरेसे पाणी प्यायल्याने पचन सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया सुधारते.
बेली फॅट कमी करण्यासाठी काय खावे?
फळे, भाज्या, शेंगा आणि संपूर्ण धान्य खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते.पालक आणि कोबी यांसारख्या भाज्या पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात.आहारात प्रथिने वाढवल्याने भूक कमी लागते आणि स्नायूंची वाढ होण्यास मदत होते.