
लिव्हरमध्ये अडकलेला सर्व कचरा आपोपाप पडेल बाहेर, आचार्य बाळकृष्णांनी सांगितला उपाय; फॅटी लिव्हरसाठी ठरेल रामबाण
लिव्हर म्हणजे यकृत! आणि यकृत आपल्या शरीरातील फार महत्वाचा घटक आहे. यकृताविना आपले शरीर कार्य करू शकत नाही कारण यकृत शरीरातील घाण आणि टॉक्सिन बाहेर काढण्याचे कार्य करतो. जर ही रसायने शरीराच्या बाहेरच पडली नाहीत तर शरीरात दुर्घटक इतके वाढतील की याचा परिणाम जिव्हारीही होऊ शकतो. त्यात यकृत हा शरीरातील सर्वात मोठा घटक आहे. अन्नातून मिळणारे फॅट तसेच इतर सर्व पोषक तत्वांचे पचन करण्याचे काम यकृत करतो. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे कामही यकृतच करतो. तसेच शरिरातील अतिशय पोषक तत्वांपैकी एका प्रोटीन एन्झाईम या घटकाची निर्मितीही यकृतच करतो. जर यकृत खराब झालाच तरी त्या शरीराला फार काही आजारांचा सामना करावा लागतो, या आजारांमध्ये हेपेटायटिस, सिरॉसिस, यकृत कर्करोग (Liver Cancer) तसेच फॅटी लिव्हर या आजारांचा समावेश आहे.
यकृता संबंधित त्रास असेल तर हळद फार उपयुक्त ठरते. हळदीचे बरेच फायदे आहेत, जे यकृतासाठी फायद्याचे आहेत. हळदीमधील काही घटक यकृताला स्वच्छ ठेवतात. टॉक्सिन्स बाहेर काढून यकृत निरोगी करतात. जर शरीराला काही सूज आली असेल तर ती कमी करण्याचे कामही हळद अगदी चोख पणे करते. लिव्हरची कार्यक्षमता सुधारली जाते. तसेच शरीरातील महत्वाच्या घटकांपैकी एक लिव्हर एन्झाईम संतुलित राहतं. दररोज हळदीचे सेवन केले तर फ्री रॅडिकल्समुळे शरीरावर तसेच महत्वाचे म्हणजे यकृतावर होणारे नुकसान टाळता येऊ शकते. या हळदीच्या फायद्यामुळेच स्वतः डॉक्टरही हळद खाण्याचा सल्ला देत असतात. अनेक रुग्णांनी या औषधी वनस्पतीचा फायदा पुरेपूर घेतला आहे.
जर हळद योग्य प्रमाणात घेतलात तर त्याचा काहीच दुष्परिणाम असा नाहीये. पचन सुधारते. डिटॉक्स प्रक्रिया वेगाने वाढते. यकृत हलका राहतो तसेच स्वच्छ राहतो. सक्रिय राहतो आणि फॅटी लिव्हरचा धोका टाळता येऊ शकतो. आचार्य बाळकृष्ण यांनी यावर उपाय सांगितला आहे. १ छोटा चमचा हळद घ्या आणि ते दुधात मिसळा आणि रोज रात्री या पेयाचे सेवन करा. पण हे करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कारण जर हळद प्रमाचा बाहेर खाल्ली तर त्याचे दुष्परिणामही आहेत.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.