दिलीप जोशीने कसे केले वजन कमी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
गेले अनेक वर्ष ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही शोमध्ये जेठालालची भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशीला कोण ओळखत नाही? घराघरात पोहचलेला जेठालाल सर्वांचाच आवडता आहे. पण अलिकडेच तो वजन कमी करण्याच्या त्याच्या जबरदस्त परिवर्तनामुळे चर्चेत आहे. महत्त्वाचे म्हणजे एखाद्या व्यक्तीने कोणताही डाएट प्लॅन किंवा कसरत न करता ४५ दिवसांत १६ किलो वजन कमी केले तर तुम्हाला धक्का बसेल का?
दिलीप जोशी यांनी तेच केले आहे. वजन कमी करण्यासाठी दिलीपने कोणतेही फॅन्सी डाएट स्वीकारले नाही किंवा जिममध्ये घाम गाळला नाही. त्याने फक्त एक गोष्ट त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवली आणि तीच त्याच्या आयुष्याचा फिटनेस मंत्र बनली. चला जाणून घेऊया दिलीप जोशी यांचे वजन कमी करण्याचे रहस्य. Mashable India ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी खुलासा केला होता (फोटो सौजन्य – Instagram/iStock)
फक्त एक सवय ठरली उत्तम
दिलीप जोशी यांनी कोणत्याही पोषणतज्ज्ञ किंवा जिम प्रशिक्षकाची मदत घेतली नाही. वजन कमी करण्याची त्यांची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक होती. त्यांनी त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत फक्त एक सोपी पण प्रभावी गोष्ट समाविष्ट केली, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दिलीप जोशीने दररोज वेगाने चालायला सुरुवात केली. ही एकमेव गोष्ट होती ज्यामुळे त्यांना त्यांचे वजन नियंत्रित करण्यास मदत झाली.
४५ मिनिटांचे जलद चालणे गेम चेंजर
दिलीप जोशीने सांगितल्याप्रमाणे दररोज ४५ मिनिटे वेगाने चालायला सुरुवात केली असल्याचे सांगितले. त्याच्यानुसार, वजन कमी करण्यासाठी त्याने कोणताही विशेष आहार किंवा शारीरिक प्रशिक्षण घेतले नाही. फक्त रोजच्या साध्या चालण्याने त्याने बरेच वजन कमी केले. दररोज चालणे हा त्याचा एकमेव फिटनेस दिनक्रम होता. तो इतका प्रभावी होता की त्याने ४५ दिवसांत १६ किलो वजन कमी केले.
काय सांगता? केवळ पाणी पिऊन होऊ शकते 10 किलो वजन कमी, 15 दिवसात दिसेल परिणाम
एकही दिवस वगळला नाही
वजन कमी करण्याच्या संपूर्ण प्रवासात दिलीपने एकही दिवस ब्रेक घेतला नाही. तो म्हणतो की जेव्हा तुम्हाला मनापासून काही करायचे असेल तेव्हा कोणतेही अडथळे येत नाहीत. जर तुम्ही सर्व परिस्थितीत तंदुरुस्त राहण्याचा निर्णय घेतला तर तुम्ही ते सहजपणे करू शकता. दिलीप जोशीने वजन कमी करण्यासाठी असाही निर्णय घेतला की त्याला सर्व परिस्थितीत चालावे लागेल, मग तो दिवसभर हवामान काहीही असो किंवा तो कितीही व्यस्त असला तरीही त्याने ते पाळले आणि वजन कमी केले.
Weight Loss: रोज 1-1 किलो वजन होईल कमी, Baba Ramdev यांनी पोट सपाट करण्यासाठी दिला जबरदस्त उपाय
स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला
दिलीपला जेव्हा विचारले गेले की त्याने त्याच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवले आहे का, तेव्हा त्याचे उत्तर होते ‘मी कोणताही विशेष आहार घेतला नाही’. तसंच त्याने सांगितले की तो जास्त खाणे टाळू लागला आणि खाण्यात थोडा संतुलन राखू लागला. पण कोणताही कोणताही पदार्थ खायचा नाही वगैरे असे त्याने काहीही केले नाही. जेव्हा त्याचे अलीकडील फोटो समोर आले तेव्हा चाहते त्याच्यातील बदल पाहून थक्क झाले.
दिलीप जोशी यांची वजन कमी करण्याची कहाणी अशा लोकांसाठी प्रेरणादायी आहे ज्यांना असे वाटते की फक्त जिम आणि डाएटनेच फिटनेस मिळवता येतो. जर तुम्ही दररोज स्वतःसाठी ४५ मिनिटे काढू शकलात आणि थोडीशी आयुष्यात आणि सवयीत शिस्त आणू शकलात तर तुम्हीही लठ्ठपणापासून तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर येऊ शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.