
समिंद्री म्हणजे सुपरस्टार सईचे लक्षवेधी लुक्स
सई म्हणजे मराठीच नाही तर सध्या हिंदी इंडस्ट्रीवरही राज्य करतेय. नुकत्याच रिलीज झालेल्या मानवत मर्डर्सचे सई सध्या प्रमोशन करतेय आणि या प्रमोशनदरम्यान तिचे लुक व्हायरल होत आहेत. समुद्राशी संबंधित असणारे नाव समिंद्री ही भूमिका सई या सिरीजमध्ये साकारत आहे. तर तिने अनेक फोटो सिरीजदेखील सध्या पाण्यात केल्याचे दिसून येत आहे.
सईने नुकतेच पुन्हा एकदा फोटोशूट केले असून तिचा फ्लुरोसन ग्रीन रंगातील हा अवतार चाहत्यांना खूपच भावलाय. तिचा हा क्लासी आणि हॉट लुक पाहून चाहते घायाळ झालेले दिसून येत आहे. तिचा हा लुक नक्की कसा आहे याचे डिकोडिंग करूया (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
फ्लुरोसन ग्रीन बॉडीकॉन ड्रेस
सईचा परफेक्ट फिगर फिटेड ड्रेस
सईने अगदी फिगर फिटेड असा फ्लुरोसन ग्रीन बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे आणि यामध्ये ती एखाद्या हॉलीवूड हिरॉईनपेक्षा कमी दिसत नाहीये. तिचे हे फोटोशूट खूपच क्लासी आणि आकर्षक दिसून येत आहे. सईची फॅशन ही नेहमीच वाखाणण्याजोगी असते आणि पुन्हा एकदा तिने हे दाखवून दिले आहे.
पाण्यातील अदा
ग्लॅम आणि ब्युटीफूल बोल्ड लुक
सईने पाण्यात बसून वेगवेगळ्या पोझ देत आपल्या अदा दाखवल्या आहेत. तर यासह तिने हेअरस्टाईल करताना केस मोकळे ठेवले आहेत. केसांना मधून भांग पाडला आहे आणि थोडासा वेव्ही कर्ल लुक देत ही स्टाईल अधिक स्टायलिश दिसेल याची काळजी घेतली आहे. कोणत्याही पार्टीसाठी तुम्ही सईचा हा लुक नक्कीच कॅरी करू शकता
बॅकलेस
बॅकलेस ड्रेसची फॅशन
सईचा हा फ्लुरोसन ग्रीन ड्रेस फारच रिव्हिलिंग असून बॅकलेस आहे आणि तिने यावेळी तिच्या पाठीवर टॅटूही दाखवला आहे. तर तिच्या अदांनी चाहत्यांना अक्षरशः घाम फुटला आहे. तिला या फोटोंवर भरपूर कमेंट्स मिळताना दिसून येत आहे. सईचा हा लुक हृदय घायाळ करणारा आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
हेदेखील वाचा – चर्चा बोल्ड अँड ब्युटीफुल सई ताम्हाणकरच्या नव्या फोटो शुटची!
ग्लॅमरस सई
सईने पाण्यात लावली आग
सईने पाण्यात झोपून दिलेल्या या पोझमध्ये तिचा ग्लॅमरस लुक अधिक उठावदार आणि मनमोहक दिसून येत आहे. तिचे ब्राऊन शेड डोळे तर चाहत्यांच्या काळजात नक्कीच घर करत आहेत आणि त्यात तिच्या अदांनी चारचाँद लावले आहेत असं म्हणायला हवं. सईचा हा लुक अत्यंत ग्लॅमरस दिसतोय.
मिनिमल मेकअप
मिनिमल मेकअप लुकमध्ये सईच्या अदा
सईने या फोटोशूटमध्ये मिनिमल मेकअप केला असून फाऊंडेशन, कन्सिलर, ब्राऊन आयशॅडो, ब्राऊन लायनर आणि मस्कारा लावला आहे. तर आयब्रो डार्क केले असून गालावरील हायलायटर अधिक उठावदार दिसतंय. तिने पिंक न्यूड शेड लिपस्टिकचा वापर करत हा लुक पूर्ण केलाय आणि तिचा हा मेकअप तिच्या सौंदर्यात भर घालतोय.
गोल्डन ज्वेलरी
क्लासी ज्वेलरी लुक
सईने या संपूर्ण ड्रेससह क्लासिक अशा गोल्डन ज्वेलरीचा वापर केलाय. मॉडर्न अशी ही ज्वेलरी कमाल दिसतेय. दोन्ही हातात तिने जाडसर ब्रेसलेट्स घातले असून हातात जाडसर अशी गोल्डन अंगठी घातली आहे. तुम्हीही एखाद्या पार्टीसाठी कसा लुक करावा यासाठी शोध घेत असाल तर सईचा हा लुक परफेक्ट आहे.