मराठी इंडस्ट्रीमधील अत्यंत आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या येणाऱ्या आगामी प्रोजेक्ट मध्ये व्यस्त आहे. अभिनेत्री आता तिची नुकतीच प्रदर्शित होणारी सिरीज ‘मानवत मर्डर्स’ घेऊन येणार आहे. ही सिरीज येत्या ४ ऑक्टोबरला सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री सई ताम्हाणकरचे या सिरीजमध्ये अत्यंत्य वेगळे पात्र प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. या मालिकेत तिच्यासह अनेक कलाकार दिसणार आहेत. याचदरम्यान, अभिनेत्रीने सोशल मीडियावर नुतकेच तिचे काही ताजे फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये ती खूप आकर्षित दिसत आहे. अभिनेत्री सतत सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहित असते.
सईचे नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो पहाच. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
सईने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची चर्चा आता चाहत्यांमध्ये रंगली आहे. तिने खूप अप्रतिम ड्रेस परिधान केला असून चाहत्यांचे संपूर्ण लक्ष तिच्याकडे वेधले गेले आहे.
सईने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला असून, तिच्या या गाऊनवर लाल, निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेषा आहेत. या कॉलरफूल ड्रेसमध्ये सई खूप मोहक दिसत आहे.
सईने या कॉलरफूल गाऊनवर अत्यंत साधा आणि रेखील मेकअप केला आहे. आयलायनर, मस्कारा, काजळ, गुलाबी ब्लुश आणि लाल लिपस्टिकचा वापरकरून अभिनेत्रीने तिचा हा ग्लॅमर लुक पूर्ण केला आहे.
तसेच, सईने या ड्रेसवरील सौंदर्य आणखी फुलावे म्हणून, गोल्डन दागिन्यांचा वापर केला आहे. तिने कानात मोठे झुमके आणि हातात मोठ्या बंगल्या घातल्या आहेत. तसेच या अभिनेत्रीने या सगळ्यासह तिचे सुंदर कुरळे केस मोकळे सोडले आहेत.
सईने या शेअर केलेल्या फोटोमध्ये वेगवेगळ्या अदा दाखवून आपले फोटोशूट पूर्ण केले आहे. सईच्या प्रत्येक फोटोमध्ये ब्लॅकग्राऊंड खूप आकर्षित दिसत आहे. आणि खाली पाणी असल्यामुळे ती पाण्यात आहे असे भासवत आहे.
सईच्या या फोटोला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. "सईने पाण्यात लावली आग" असे लिहून चाहते तिच्या वर कंमेंटचा वर्षाव करत आहे.