च्युईंगम खाण्याचे फायदे आणि तोटे
लहान मुलांसह मोठ्यांना च्युईंगम खायला खूप आवडत. सतत बाहेर जाताना किंवा इतर वेळी अनेकांच्या तोंडात च्युईंगम असते. बाजारात वेगवेगळ्या फ्लेवरचे च्युईंगम मिळतात. पण सतत च्युईंगम खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल ना. चला तर जाणून घेऊया सविस्तर. च्युईंगम खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरीसुद्धा सतत च्युईंगम खाल्ल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजार होण्याची शक्यता असते. सुरुवातीला च्युईंगम खाताना गोड लागते मात्र 2 मिनिटांनी त्यांचे रबर आणि चिकट पदार्थामध्ये रूपांतर होते. त्यामुळे च्युईंगम खाणे आरोग्यासाठी घातक असल्याचे, एका अभ्यासात समोर आले आहे. आज आम्ही तुम्हाला च्युईंगम खाल्ल्यामुळे आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: दुधासोबत या 5 गोष्टी चुकूनही खाऊ नका
सतत च्युईंगम चिघळत राहिल्यामुळे मेंदूवरील ताण कमी होण्यास मदत होते. च्युईंगम चघळणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सतत च्युईंगम चघळत राहिल्यामुळे मेंदूमधील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. तसेच यामुळे मेंदूवर निर्माण झालेला ताण कमी होऊन मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
अनेकांना माउथफ्रेशनर म्हणून च्युईंगम खाण्याची सवय असते. च्युईंगममध्ये साखर नसल्यामुळे अनेक लोक च्युईंगमचे सेवन करतात. च्युईंगमचे सेवन केल्यामुळे मौखिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तसेच हिरड्यांचे आजार उद्भवत नाहीत. च्युईंगम चघळल्याने तोंडात तयार झालेली लाळ तोंडामधील हानिकारक घटक दूर करण्यासाठी मदत करते. त्यामुळे तोंडाचे आजार होत नाहीत.
सतत च्युईंगम खात राहिल्यामुळे जबड्याचे स्नायू दुखावले जातात. च्युईंगम खाल्यामुळे आरोग्याला जेवढे फायदे होतात, त्याच्या पेक्षा जास्त च्युईंगम खाल्ल्याने शरीराचे नुकसान होते. सतत च्युईंगम खात राहिल्यामुळे जबड्याच्या स्नायुंना थकवा येऊ शकतो.
हे देखील वाचा: ‘या’ 5 फुड्सच्या सेवनाने तुमचा मेंदू होईल सुपरफास्ट, आजच करा आहारात समाविष्ट
च्युईंगम खाल्यामुळे मेंदूवरील ताण कमी होतो, मात्र मेंदू दुखण्यास सुरुवात होते. त्यामुळे सतत च्युईंगम खाऊ नये. शरीराच्या सर्व नसा मेंदूला जोडलेल्या असतात. ज्यामुळे शरीराचे कार्य सुरळीत चालू राहते. पण मेंदूच्या नसांना त्रास झाल्यानंतर मेंदू दुखणे, कपाळाच्या नसा दुखणे, कपाळात तीव्र वेदना होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. च्युईंगम सतत खात राहिल्यामुळे कान दुखणे, पदार्थ गिळण्यास त्रास होणे इत्यादी समस्या उद्भवतात.