केस गळून टक्कल पडेल अशी भीती वाटते? मग फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
सर्वच महिला आणि मुलींना चमकदार, सुंदर केस हवे असतात. केस मजबूत आणि मऊ दिसण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. पण वारंवार चुकीच्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केसांची मूळ अतिशय कमकुवत होतात. सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट आणि हेअर ट्रीटमेंट केल्या जातात. पण कालांतराने त्वचा आणि केसांचे खूप जास्त नुकसान होते. केस अतिशय कोरडे होऊन जातात. केस मऊ आणि चमकदार दिसण्यासाठी केसांना वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे केस केसांच्या मुळांवर अतिरिक्त तेल जमा होण्यास सुरुवात होते. ज्यामुळे केसांमध्ये कोंडा होणे, केस खूप जास्त गळणे किंवा केसांची वाढ थांबणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात.(फोटो सौजन्य – istock)
तरुण वयात केसांसंबधित खूप जास्त समस्या उद्भवतात. प्रदूषण, चुकीचा आहार, ताणतणाव, हार्मोनल बदल, केमिकलयुक्त शाम्पू इत्यादी अनेक गोष्टींमुळे केस गळण्यास सुरुवात होते. पण केसांच्या समस्यांकडे सतत दुर्लक्ष केल्यामुळे केसांमध्ये टक्कल पडते आणि केसांचा लुक पूर्णपणे खराब होऊन जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांची योग्य पद्धतीने काळजी घेण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यामुळे केसांची मूळ मजबूत होतात आणि केसांची वाढ होते.
वारंवार केस सुंदर करणाऱ्यासाठी केल्या जाणाऱ्या केमिकल ट्रीटमेंट कमी करणे आवश्यक आहे. सतत केमिकल शॅम्पू आणि हेअर केअर प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केस कमकुवत होतात. केसांच्या निरोगी वाढीसाठी कायमच घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे केसांची नैसर्गिक चमक दीर्घकाळ टिकून राहते. यासाठी आठवड्यातून दोनदा केसांना तेलाने मसाज करावा. मसाज केल्यामुळे केसांमधील रक्तभिसरण सुधारते आणि केस मऊ होण्यास मदत होते. केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी टाळूवर मसाज करणे आवश्यक आहे. यासाठी भृंगराज, आवळा किंवा नारळ इत्यादी नैसर्गिक तेलांचा वापर करावा.
नियमित योगासने आणि व्यायाम केल्यामुळे मानसिक तणाव कमी होतो. मानसिक तणाव वाढल्यानंतर अचानक केस गळतात. टाळूवरील रक्तभिसरण सुधारण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाने मालिश करावी. यामुळे केसांना नैसर्गिकरित्या पोषण मिळते. केस कायमच हेल्दी राहण्यासाठी पोषण आहार घेणे आवश्यक आहे. आहारात आवळा, लोह, प्रथिने, ओमेगा- ३ फॅटी ऍसिड असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.