सतत लागणाऱ्या उचकीमुळे जीव कासावीस होतो? उचकी थांबवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
उचकी लागणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. पण बऱ्याचदा जेवल्यानंतर किंवा कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच उचकी लागते. खूप काही केल्यानंतर सुद्धा उचकी थांबत नाही. उचकी लागल्यानंतर ती लवकर थांबत नाही. जास्त वेळ उचकी टिकून राहिल्यानंतर जीव कासवीसा होतो. याशिवाय डोकेदुखी आणि छातीमध्ये वेदना होतात. शरीरात निर्माण झालेल्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे सुद्धा उचकी लागते. अतिशय सामान्य वाटणारी उचकी काहींच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरते. त्यामुळे उचकी लागल्यानंतर पाणी पिण्याचा किंवा साखर खाण्याचा सल्ला दिला जातो. पण काहीवेळा पाणी पिऊन सुद्धा उचकी जात नाही. वारंवार लागणारी उचकी डेली रुटीनमध्ये अनेक अडथळे निर्माण करते.(फोटो सौजन्य – istock)
घरातील आजी किंवा इतर मोठी माणसं उचकी थांबवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय सांगतात. पाणी पिणे, श्वास रोखून धरणे, काहीतरी गोड पदार्थ खाणे इत्यादी अनेक उपाय सांगितले जातात. पण तरीसुद्धा उचकी थांबत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वारंवार लागणारी उचकी थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास तुमची उचकी क्षणार्धात थांबेल आणि आराम मिळेल. कायमच आरोग्यासंबंधित समस्या उद्भवल्यानंतर बाजारातील गोळ्या औषधांचे सेवन कारण्याऐवजी घरगुती उपाय करून आराम मिळवावा. यामुळे क्षणार्धात फरक दिसून येतो.
वारंवार उचकी लागत असेल तर लिंबाच्या फोडीवर मीठ टाकून चोखायला सुरुवात करा. यामुळे तुमची उचकी लगेच थांबेल. लिंबूमधील आंबटपणा मिठाची चव डायाफ्रामला शांत करण्यास मदत करते. यामुळे शरीरावर लगेच सकारात्मक परिणाम दिसून येतात. हा उपाय लहान मुलांना उचकी लागल्यानंतर सुद्धा करू शकता.
उचकी लागल्यानंतर थंड पाण्याचे सेवन करावे. थंड पाण्याच्या सेवनामुळे उचकी लगेच थांबते आणि आराम मिळतो. थंड पाण्याचे सेवन केल्यामुळे घशाचे स्यूनांना आराम मिळतो आणि उचकी थांबते. थंड पाणी पिताना हळूहळू प्यावे. खूप पटापट पाणी प्यायल्यामुळे ठसका लागण्याची शक्यता असते.याशिवाय उचकी लागल्यानंतर साखर खावी. तुम्हाला जर खूप जास्त वेगाने उचकी लागली असेल तर तोंडात टाकलेली साखर हळूहळू चोखुन खावी. पण मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी हा उपाय अजिबात करू नये.
उचकी म्हणजे काय?
उचकी (Hiccups) या डायफ्रामच्या अनैच्छिक आकुंचनामुळे होणाऱ्या आवाजाच्या लहरी आहेत. उचकी येण्याची सामान्य कारणे मसालेदार अन्न, जलद जेवण, आणि काही विशिष्ट औषधे असू शकतात.
उचकीची कारणे:
डायफ्रामच्या आकुंचनामुळे उचकी येते. मसालेदार पदार्थ खाणे, जलद जेवणे, आणि कार्बोनेटेड पेये पिणे यामुळे उचकी येऊ शकते. छातीत जळजळ, किंवा स्वादुपिंडाचा दाह (pancreatitis) यांसारख्या पचनासंबंधीच्या समस्यांमुळेही उचकी येऊ शकते.
उचकी थांबवण्याचे उपाय:
पाणी पिणे किंवा साखर घालून पाणी पिणे उचकी थांबवण्यासाठी एक चांगला उपाय आहे. दीर्घकाळ श्वास रोखून धरल्यास डायफ्रामचे आकुंचन कमी होते आणि उचकी थांबते.