चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कायमच्या होतील नष्ट! त्वचा कायमच तरुण ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
सर्वच महिलांना कायमच सुंदर आणि तरुण त्वचा हवी असते. त्वचा कायमच तरुण राहावी म्हणून अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी स्किन केअर रुटीनमध्ये बदल केला जातो, तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम लावल्या जातात. पणतरीसुद्धा त्वचा सुंदर दिसत नाही. वातावरणात होणारे बदल, आहारातील बदल, पाण्याची कमतरता आणि शरीरात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता त्वचेवर सुद्धा गंभीर परिणाम करते. तरुण वयात त्वचा अतिशय निस्तेज आणि सुकलेली वाटते. त्यामुळे त्वचेला वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे जास्त आवश्यक आहे. त्वचा कायमच तुकतुकीत आणि चमकदार ठेवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या सीरम किंवा लोशनचा वापर केला जातो. पण यामध्ये असलेली हानिकारक केमिकल त्वचा काही काळापुरती सुंदर ठेवतात.(फोटो सौजन्य – istock)
Dermatology क्षेत्रात वाढतोय AI तंत्रज्ञानाचा वापर, योग्य की धोकादायक; तज्ज्ञांचा सल्ला
सुंदर त्वचेसाठी महिला पार्लरमध्ये जाऊन फेशिअल किंवा क्लीनअप करून घेतात. पण यामुळे त्वचेवर फारसा फरक दिसून येत नाही. त्वचा कायमच तरुण राहावी म्हणून जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचा कायमच तरुण ठेवण्यासाठी काही सोप्या आणि महत्वपूर्ण टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि हायड्रेट राहते. दैनंदिन आयुष्यातील छोटे मोठे बदल त्वचेमध्ये मोठा परिणाम दिसून येतो.
त्वचा कायमच तरुण राहावी असे प्रत्येक महिलेले वाटते. त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा कायमच वापर केला जातो. त्वचा कायमच मुलायम आणि तरुण ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे पाणी प्यायल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि स्वच्छ राहते.शरीर डिटॉक्स केल्यामुळे चेहऱ्यावर कोणतेही पिंपल्स किंवा फोड येत नाहीत. भरपूर पाणी प्यायल्यामुळे शरीर शुद्ध राहते आणि त्वचेवर ग्लो कायम टिकून राहतो.
रोजच्या आहारात वेगवेगळ्या फळांचे सेवन करावे. हंगामी फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. फळांमध्ये विटामिन सी, ॲण्टीऑक्सिडंट्स आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे त्वचेवरील सौंदर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी फळांचे सेवन करावे. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फळे खायला खूप जास्त आवडतात.
कायमच निरोगी राहण्यासाठी आहारात तेलकट, तुपकट, जंकफूड, जास्त मीठ असलेले पदार्थ अजिबात खाऊ नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल आणि चरबी वाढू लागते. आहारात ज्या दिवशी तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन कराल तेव्हा भरपूर पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाईल.
वय वाढल्यानंतर शरीराला जास्त आरामाची आवश्यकता असते. त्यामुळे नियमित ७ ते ८ तासांची शांत झोप घ्यावी. झोप पूर्ण झाल्यानंतर शरीर कायमच हेल्दी राहते आणि त्वचेवरील तारुण्य टिकून राहते. चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्वचेवर मॉईश्चराईज आणि रात्री झोपण्याआधी नाईट क्रीम लावणे आवश्यक आहे. यामुळे त्वचा नितळ आणि सुंदर दिसते.