आजच्या धावत्या जीवनशैलीमुळे(lifestyle) आणि खाण्यापिण्यामुळे (unhealthyfood) अनेक आजार (lifestyle diseases) जडले आहेत. काही चुकीच्या सवयी देखील यासाठी कारणीभूत आहेत, जसं की जेवणानंतर लगेच झोपणे. अनेकांना जेवण झाल्यावर लगेच झोपायला आवडते. जेवल्यानंतर लगेच झोपण्याची चूक कोणीही करू नये. जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल किंवा आजारांपासून दूर राहायचे असेल तर जेवल्यानंतर लगेच झोपण्याऐवजी काही पावले चालण्याची सवय लावा.(walk for few steps)

पूर्वीच्या काळी जेवणानंतर फेरफटका मारण्याची पद्धत होती. त्याला शतपावली म्हटलं जायचं. ही शतपावली का बरं केली जात असावी असा तुम्ही कधी विचार केला आहे का? वास्तविक, अन्न खाल्ल्यानंतर चालणे किंवा फिरणे यामुळे पचनक्रिया सुधारते आणि तुमचे आरोग्यही चांगले राहते. आयुर्वेद जेवणानंतर चालण्याच्या क्रियेवरही भर देतो. आयुर्वेदानुसार खाल्ल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने किमान 100 पावलं म्हणजे शतपावली घालावी. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
[read_also content=” वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थ खास शाकाहारींसाठी !!! https://www.navarashtra.com/lifestyle/protein-food-for-vegetarians-nrms-403065/”]
जेवण झाल्यावर शतपावली का करावी?
उत्तम पचन: आयुर्वेदानुसार, अन्न खाल्ल्यानंतर फेरफटका मारल्याने पचनक्रिया जलद होते, म्हणजेच तुम्ही जे खाल्ले आहे ते लवकर पचते. चालण्याने अन्न पटकन पचण्यास मदत तर होतेच, शिवाय पोषकद्रव्ये जलदपणे शोषून घेणेही सोपे होते. चालण्याने अपचन, पोटदुखी आणि पोटफुगीचा त्रास होत नाही.
मेटाबॉलिझम वाढते: जेवणानंतर चालल्याने चयापचय (metabolism) गतिमान करते, जे पोषक त्वरीत शोषण्यास आणि अन्न लवकर पचण्यास मदत करते. यामुळे तुमचे आरोग्यही चांगले राहते आणि वजनही नियंत्रणात राहते.

रक्तातील साखरेचं नियंत्रण: अन्न खाल्ल्यानंतर चालण्याची सवय तुमच्या रक्तातील साखरेची पातळी (blood sugar control) स्थिर ठेवण्याचे काम करते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही प्रत्येक जेवणानंतर चालायला हवे.
वजन नियंत्रणात राहील: जेवणानंतर चालल्यास अन्न लवकर पचते. यामुळे तुमच्या पोटावर जास्त भार पडत नाही. कॅलरीज बर्न होतात, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

चांगली झोप : जेवणानंतर फेरफटका मारल्याने लवकर आणि चांगली झोप लागते. कारण चालण्याने अन्न लवकर पचते, त्यामुळे झोपताना त्रास होत नाही आणि तुम्हाला हलके वाटते.