इंग्लंडकडून भारताचा पराभव (फोटो- ट्विटर)
मध्यांतरापर्यंत २-१ अशी आघाडी घेतल्यानंतरही भारतीय संघाला उत्तरार्धात ही पकड कायम ठेवता आली नाही. या पराभवामुळे हॉकी वर्ल्ड कपच्या इतिहासात इंग्लंडविरुद्ध विजय मिळवण्याची भारताची ३२ वर्षांची प्रतीक्षा कायम राहिली आहे. पहिल्या क्वार्टरमध्ये निक बांडुरकने गोल करत इंग्लंडला १-० अशी सुरुवातीची आघाडी मिळवून दिली. भारताला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.
दुसऱ्या डावात कर्णधार हरमनप्रीत सिंगने कॉर्नरवर गोल करत इंग्लंडची बरोबरी केली. त्यानंतर दिलप्रीत सिंगने मैदानी गोल करत भारताला २-१ आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुन्हा इंग्लंडचा संघ ३-२ असा आघाडीवर गेला. त्यानंतर भारताला आघाडी मिळवणे कठीण गेले.भारतीय संघाला १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या पूल सामन्यात विजय मिळवणे अत्यंत आवश्यक आहे.
Hockey World Cup 2026: टीम इंडियाची विजयी गर्जना! वेल्सला नमवत वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात
| घटक | भारत | इंग्लंड |
| अंतिम निकाल | २ | ४ |
| गोल करणारे | हरमनप्रीत सिंग, दिलप्रीत सिंग | निक बांडुरक (२), स्टुअर्ट रशमेयर, हेन्री क्रॉफ्ट |
बातमी अपडेट होत आहे…