Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lungs Cancer झाल्यानंतर पायांमध्ये दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, वेळीच सावध होऊन घ्या योग्य ते औषध उपचार

फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्यानंतर पायांमध्ये अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 08, 2025 | 11:08 AM
Lungs Cancer झाल्यानंतर पायांमध्ये दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे

Lungs Cancer झाल्यानंतर पायांमध्ये दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे

Follow Us
Close
Follow Us:
  • फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीराच्या कोणत्या अवयवात वेदना होतात? 
  • फुफ्फुसाच्या कर्करोगाची कारणे?
  • फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे? 
कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचे नाव ऐकल्यानंतर साऱ्यांच्या पायाखालील जमीन सरकते. शरीराच्या कोणत्याही अवयवाला कॅन्सरची लागण होऊ शकते. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येतो. शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. पण या बदलांकडे दुर्लक्ष केले जाते. असे न करता तातडीने औषध उपचार केल्यास गंभीर आजारांची शरीराला लागण होणार नाही.कॅन्सरची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात अतिशय सामान्य बदल दिसतात. मात्र कालांतराने हे बदल आणखीनच गंभीर होतात. फुफ्फस शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. यामुळे श्वास घेणे आणि श्वास सोडणे ही प्रक्रिया अतिशय जलद होते. पण फुफ्फुसांच्या कॅन्सरची लागण झाल्यास पायांमध्ये अनेक तीव्र लक्षणे दिसू लागतात. आज आम्ही तुम्हाला फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्यानंतर पायांमध्ये कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
लिव्हरमध्ये उष्णता वाढल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, घरगुती उपाय करून घ्या आरोग्याची काळजी

पाय, घोटे आणि पंजे सूजणे:

बऱ्याचशा पाय दुखणे किंवा पायांमध्ये वेदना वाढल्यानंतर सामान्य समजून दुर्लक्ष केले जाते. फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात द्रव पदार्थ तसेच साचून राहतात. यामुळे शरीराच्या खालच्या अवयवांना सूज येणे किंवा जडपणा जाणवू लागतो. फुफ्फुसांमध्ये वाढलेल्या ट्यूमरमुळे रक्तवाहिन्या किंवा लिम्फ नलिकांमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. केमोथेरपीच्या साइड इफेक्टमुळे पायांना किंवा पंज्याना सूज येण्याची शक्यता असते.

पायात वेदना, लालसरपणा आणि ताप जाणवणे:

फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे डीप व्हेन थ्रॉम्बोसिसचा धोका वाढून संपूर्ण शरीराला हानी पोहचते. पायांच्या आतील भागात रक्ताच्या गुठळ्या होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे पायांमध्ये वेदना किंवा लालसरपणा दिसून येतो. रक्तात वाढलेल्या गुठळ्या फुफ्फुसांपर्यंत पोहचल्यानंतर कोणत्याही क्षणी मृत्यू होऊ शकतो. पायांमध्ये वाढलेल्या लालसरपणामुळे काहीवेळा थंडी ताप सुद्धा येतो.

पायांमध्ये जळजळ जाणवणे:

कॅन्सर झाल्यानंतर केमोथेरपी उपचार पद्धत केली जाते. याचा परिणाम मज्जातंतूंवर होऊन शरीराच्या कोणत्याही अवयवात वेदना जाणवू लागतात. यामुळे  ‘पेरिफेरल न्युरोपॅथी’ सारख्या समस्या उद्भवू शकतात. हात पाय सुन्न पडणे, जळजळ होणे किंवा सुई टोचल्यासारख्या वेदना जाणवू लागतात . शरीराला ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्यामुळे त्वचेच्या रंगात अनेक बदल दिसून येतात. यामुळे त्वचा काळी निळी होऊन रक्तभिसरणात अडथळे निर्माण होतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: फुफ्फुसाचा कर्करोग म्हणजे काय?

    Ans: फुफ्फुसाचा कर्करोग म्हणजे फुफ्फुसांमधील असामान्य पेशींची अनियंत्रित वाढ होणे.

  • Que: फुफ्फुसाच्या कर्करोगाची कारणे कोणती आहेत?

    Ans: फुफ्फुसाच्या कर्करोगाचे हे सर्वात मोठे कारण आहे. तंबाखूच्या धुरामध्ये कर्करोग निर्माण करणारे अनेक विषारी पदार्थ असतात.

  • Que: फुफ्फुसाचा कर्करोग किती सामान्य आहे?

    Ans: फुफ्फुसाचा कर्करोग हा जगातील सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे.

Web Title: After lungs cancer these horrible symptoms appear in the legs lungs cancer symptoms signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 11:08 AM

Topics:  

  • cancer
  • Health Care Tips
  • lung cancer

संबंधित बातम्या

महिलांसाठी मोफत कर्करोग शिबिरांचे आयोजन! १,००० महिलांची एआय-समर्थित iBreastExam उपकरणाद्वारे तपासणी
1

महिलांसाठी मोफत कर्करोग शिबिरांचे आयोजन! १,००० महिलांची एआय-समर्थित iBreastExam उपकरणाद्वारे तपासणी

World Cancer Awareness Month: प्रदूषण आणि सेकंडहँड स्मोकमुळे महिलांमध्ये वाढतेय फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण
2

World Cancer Awareness Month: प्रदूषण आणि सेकंडहँड स्मोकमुळे महिलांमध्ये वाढतेय फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण

थंडीत हाडांच्या जुनाट वेदनांमुळे सतत कंबर दुखते? वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ प्रभावी उपाय, सर्वच ऋतूंमध्ये राहाल फिट
3

थंडीत हाडांच्या जुनाट वेदनांमुळे सतत कंबर दुखते? वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ प्रभावी उपाय, सर्वच ऋतूंमध्ये राहाल फिट

”खूप भीती वाटते…” दीपिका कक्करची कर्करोगाशी झुंज, पती शोएब इब्राहिमने शेअर केले हेल्थ अपडेट
4

”खूप भीती वाटते…” दीपिका कक्करची कर्करोगाशी झुंज, पती शोएब इब्राहिमने शेअर केले हेल्थ अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.