Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरातील सर्व घाण पडेल बाहेर, अ‍ॅसिडिटीचा त्रासही होईल दूर; फक्त ‘या’ पांढऱ्या फळाचे सेवन करा

जर तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठता, छातीत जळजळ किंवा पचनाच्या समस्या जाणवत असतील तर उन्हाळ्यातील एक हंगामी फळ तुमच्यासाठी कोणत्या अमृताहून कमी नाही. हे फळ शरीराला थंडावा देण्यासोबतच पचनशक्ती वाढविण्यास मदत करते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 13, 2025 | 08:15 PM
शरीरातील सर्व घाण पडेल बाहेर, अ‍ॅसिडिटीचा त्रासही होईल दूर; फक्त 'या' पांढऱ्या फळाचे सेवन करा

शरीरातील सर्व घाण पडेल बाहेर, अ‍ॅसिडिटीचा त्रासही होईल दूर; फक्त 'या' पांढऱ्या फळाचे सेवन करा

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळ्याच्या हंगामात तापमान फार वाढते ज्याचा आपल्या शरीरावर चुकीचा परिणाम होत असतो. तीव्र तापमानामुळे बद्धकोष्ठता, गॅस, आम्लता आणि छातीत जळजळ होणे अशा समस्या उद्भवू लागतात. यामुळे केवळ अस्वथताच नाही तर संपूर्ण दिवस आपला मड ऑफ राहतो आणि कोणत्याही कामात मन लागत नाही. उन्हाळ्यात अशी अनेक फळे बाजारात येतात, जी शरीराला थंडावा देण्याचे काम करतात आणि यातीलच एक म्हणजे ताडगोळा!

‘या’ लोकांनी चुकूनही करू नका हेअर ट्रान्सप्लांट, ट्रीटमेंटनंतर होऊ शकतो मृत्यू, वेळच व्हा सावध

मेट्रो हॉस्पिटल फरीदाबादचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी संचालक डॉ. विशाल खुराणा यांच्या मते, ताडगोळा हे एक हंगामी फळ आहे जे उन्हाळ्यात शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी ओळखले जाते. त्यामध्ये असलेले नैसर्गिक हायड्रेशन, फायबर आणि इलेक्ट्रोलाइट्स केवळ तहान भागवत नाहीत तर एक मजबूत पचनसंस्था देखील तयार करतात. संशोधन असे सूचित करते की, ताडगोळ्याचे नियमित सेवन केल्याने आतड्यांची हालचाल सुलभ होते आणि आतडे आतून स्वछ राहण्यास मदत होते.

ज्यांना वारंवार बद्धकोष्ठता किंवा आम्लपित्तचा त्रास होतो त्यांच्यासाठी ताडगोळा एक नैसर्गी औषधाप्रमाने काम करते. याची गोड चव आणि सॉफ्ट टेक्श्चर अनेकांना खायला फार आवडतो आणि मुख्य म्हणजे याचा आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. ताडगोळा खाल्ल्याने किंवा त्याचे सरबत बनवून प्यायल्याने शरीराला ताजेपणा आणि आराम मिळतो. उन्हाळ्यात ते सेवन करणे हा एक घरगुती आणि प्रभावी उपाय आहे जो पोटाच्या समस्यांपासून आराम देऊ शकतो.

ताडगोळा ज्याला इंग्रजीत आइस अ‍ॅपल ,म्हटले जाते, हे उन्हाळ्यात आढळणारे एक अत्यंत थंड आणि हायड्रेटिंग फळ आहे, हे ताडाच्या झाडापासून मिळते. यात भरपूर प्रमाणात पाणी असते आणि ते शरीराला थंडावा देण्याचे काम करते. त्यात पोटॅशियम, फायबर, ग्लुकोज आणि आवश्यक खनिजे असतात, जे डिहायड्रेशन रोखण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतात. उन्हाळ्यात ताडगोळा खाल्ल्याने पोट हलके राहते आणि शरीराची आतील उष्णता नियंत्रित राहण्यास मदत होते.

बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मिळेल आराम

बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे जी बहुतेकदा पचन समस्या आणि फायबरच्या कमतरतेमुळे होते. ताडगोळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे मल मऊ करते आणि आतड्यांची हालचाल सुधारते. हे फळ नैसर्गिक रेचक म्हणून काम करते आणि आतड्यांची हालचाल सुलभ करते. याचे नियमित सेवन केल्याने पोट साफ होते आणि जडपणा जाणवत नाही. विशेष म्हणजे ते पोटालाही थंडावा देते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेसह जळजळ आणि आम्लपित्तची समस्या देखील कमी होते.

अ‍ॅसिडिटीवर मिळेल आराम

जेव्हा तीव्र मसाल्यांमुळे किंवा अनियमित खाण्याच्या सवयींमुळे छातीत जळजळ आणि आम्लतेची समस्या असते, तेव्हा ताडगोळा एक नैसर्गिक उपाय बनते. त्याचा थंड आणि सॉफ्ट टेक्श्चर पोटातील उष्णता शांत करतो. ते अतिरिक्त आम्ल संतुलित करते. जर तुम्ही दररोज सकाळी किंवा दुपारी एका ताडगोळ्याचे सेवन केले तर तुम्हाला अ‍ॅसिडिटीच्या समस्येत फरक जाणवेल. हे थंडगार फळ शरीराला थंड ठेवते आणि पचन सुधारण्यास मदत करते.

वयाच्या तिशीमध्ये केस पांढरे झाले आहेत? केस काळे करण्यासाठी तीळाच्या तेलात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, करून पहा सोपा उपाय

कोणी सावधगिरी बाळगावी?

ताडगोळा शरीरासाठी फायदेशीर असला तरी काही लोकांनी याचे सेवन करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. ज्या लोकांचे शरीर थंडीबद्दल अत्यंत संवेदनशील असते किंवा ज्यांना वारंवार सर्दी होते त्यांनी ते मर्यादित प्रमाणात सेवन करावे. मधुमेह रुग्णांनीही त्याचा गोडवा लक्षात घेऊन त्याचे सेवन करावे. तसेच, लहान मुलांना आणि वृद्धांना देण्यापूर्वी ते ताजे असल्याची खात्री करा कारण ते लवकर खराब होते. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी किंवा पोटदुखी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ताडगोळ्याचे सेवन करा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: All the dirt of the body will come out these summer fruit is very helpful for acidity and gut health lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle tips
  • Summer Food

संबंधित बातम्या

Gandhi Jayanti: गांधीजींचे 6 नियम, फिटनेस-एनर्जी आणि आरोग्याचे उत्तम समीकरण; आजापासून रहाल दहा हात दूर
1

Gandhi Jayanti: गांधीजींचे 6 नियम, फिटनेस-एनर्जी आणि आरोग्याचे उत्तम समीकरण; आजापासून रहाल दहा हात दूर

सर्पदंशावर हाफकीन महामंडळाच्या लसीचा प्रभावी उतारा, जनजागृती मोहीम
2

सर्पदंशावर हाफकीन महामंडळाच्या लसीचा प्रभावी उतारा, जनजागृती मोहीम

शरीरातून नष्ट होतेय मांस शिल्लक राहतोय सांगाडा? Vitamin B12 च्या कमतरतेची 4 लक्षणे दिसताच खा 10 पदार्थ, वाढेल स्टॅमिना
3

शरीरातून नष्ट होतेय मांस शिल्लक राहतोय सांगाडा? Vitamin B12 च्या कमतरतेची 4 लक्षणे दिसताच खा 10 पदार्थ, वाढेल स्टॅमिना

प्रेगनेंसी नंतरच्या Stretch Marks ने हैराण झालात? मग आता टेन्शन सोडा आणि या घरगुती उपायांचा वापर करा
4

प्रेगनेंसी नंतरच्या Stretch Marks ने हैराण झालात? मग आता टेन्शन सोडा आणि या घरगुती उपायांचा वापर करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.