Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट… बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव

महाराष्ट्रातील निसर्गरम्य ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत असाल, तर रत्नागिरी उत्तम पर्याय ठरू शकतो. सुंदर समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तू आणि हिरवागार परिसर यामुळे कुटुंबासोबत फिरण्यासाठी हे ठिकाण खास आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 09, 2026 | 09:12 AM
बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट... बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव

बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट... बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव

Follow Us
Follow Us:
  • रत्नागिरीतील ऐतिहासिक किल्ला आणि समुद्राच्या संगमाचे सुंदर दृश्य पर्यटकांना आकर्षित करते.
  • निळाशार समुद्र, सुंदर सूर्यास्त आणि फोटोग्राफीसाठी येथील किनारे लोकप्रिय आहेत.
  • इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी प्राचीन वास्तू, संग्रहालय आणि शहराचे विहंगम दृश्य पाहण्याची संधी आहे.
सुट्टीच्या दिवशी कुटुंबासोबत कुठे फिरायला जाण्याचा बेत आखत असाल तर रत्नागिरीहून सुंदर ठिकाण तुमच्यासाठी नाही. महाराष्ट्र फिरायचं तर यात रत्नागिरीचा समावेश करायलाच हवा. आपला साधेपणा, नैसर्गिक साैंदर्य आणि रानमेव्यासाठी रत्नागिरी लोकप्रिय आहे. इथे समुद्रकिनारा, धबधबे आणि हिरवीगार वनराई पाहायला मिळते.

जर तुमच्या रोजच्या गर्दीतून निवांत मोकळा वेळ काढून तुम्हाला कोणत्या शांत ठिकाणाला भेट द्यायची असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट ठरेल. जुने वाडे आणि आजूबाजूला पसरलेले हिरवळ वातावरण मनाला सुखद अनुभव देऊन जाते. कुटुंबासोबत तुम्ही रत्नागिरीला भेट देऊ शकता.

Travel News : ट्रॅफिकमध्ये अडकलाय आणि ट्रेन सुटणार आहे? टेन्शन घेऊ नका, रेल्वे देते बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी

जयगढ किल्ला

शहरपासून साधारण ४० किलोमीटर अंतरावर जयगढ गावात हा किल्ला वसलेला आहे. १६ व्या शतकात बांधलेला हा ऐतिहासिक किल्ला येथील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे. १३ एकर परिसरात पसरलेला हा किल्ला विजापूरच्या सुलतानाने शास्त्री नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर बांधला होता. किल्ला आता पडगळीला आला असला तरी याच्या आजूबाजूचा परिसर आजही फिरण्याजोगा आहे. किल्ल्यासोबतच तुम्ही आंग्रे बंदराला आणि दीपगृहालाही भेट देऊ शकता.

आरे-वारे बीच

रत्नागिरीतील गणपतीपुळे हे ठिकाण तर सर्वांनाच ठाऊक आहे. रत्नागिरीला गेल्यावर लोक गणपतीपुळेला आवर्जून भेट देतात. इथे जातानाच रसत्यात तुम्हाला एक समुद्रकिनारा लागले. गणपतीपुळ्यापासून ८ किलोमीटर अंतरावर हे आहे. विशेष म्हणजे, आरे आणि वारे या गावांजवळ असलेले हे दोन्ही समुद्रकिनारे एकाच पर्वताच्या दोन वेगवेगळ्या बाजूंना वसलेले आहेत. इथे तुम्ही सूर्यास्ताचे सुंदर दृष्य पाहू शकता आणि समुद्रकिनारी चांगले फोटोज देखील क्लिक करु शकता.

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी

थिबाव पॅलेस

इतिहासप्रेमींसाठी हे ठिकाण मस्ट व्हिजिट आहे. २७ एकर परिसरात पसरलेला हा तीन मजली महाल ब्राह्मी शैलीत बांधलेला आहे. याच्या आजूबाजूला सुंदर बागा पाहायला मिळतात. महालाच्या आत लाकडी मजले, काचेच्या खिडक्या आणि प्राचीन शिल्पकला पाहयला मिळते. या महालाचे आता एका संग्रहालयात रुपांतर करण्यात आले आहे. इथे तुम्हाला अनेक कलावस्तू पाहायला मिळतील. थिबा पॉईंटवरून रत्नागिरीचे मनमोहक दृष्य पाहायला मिळते.

 

Web Title: Ratnagiri tourist places jaigad fort aare ware beach thibaw palace maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 09:11 AM

Topics:  

  • Maharashtra Tourism
  • Ratnagiri
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी
1

Travel News : पिंकपासून ब्लू आणि ऑरेंजपर्यंत… या ठिकाणांच्या नावात दडलीये रंजक कहाणी

Sunil Tatkare: नागरिकांच्या प्रश्नांवर दिरंगाई? सुनील तटकरे अधिकाऱ्यांवर भडकले; दिला थेट ‘हा’ इशारा
2

Sunil Tatkare: नागरिकांच्या प्रश्नांवर दिरंगाई? सुनील तटकरे अधिकाऱ्यांवर भडकले; दिला थेट ‘हा’ इशारा

Leopard CCTV Video: बिबट्याची दहशत सुरूच; देवरुखच्या साडवली परिसरातील थरारक दृश्य CCTV मध्ये, तातडीने पिंजरा लावण्याची मागणी
3

Leopard CCTV Video: बिबट्याची दहशत सुरूच; देवरुखच्या साडवली परिसरातील थरारक दृश्य CCTV मध्ये, तातडीने पिंजरा लावण्याची मागणी

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी
4

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.