
कोरफड लावताना केलेल्या 'या' चुकांमुळे होऊ शकते त्वचेचे गंभीर नुकसान, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत
Aloe Vera Benefits: सर्वच महिलांना आपली त्वचा कायमच सुंदर आणि देखणी हवी असते. यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. पण वातावरणात होणार बदल, मानसिक तणाव, पोषक घटकांचा अभाव, मासिक पाळीच्या समस्या इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर बाजारात उपब्लध असलेल्या महागड्या स्किन केअरचा वापर केला जातो. पण त्याऐवजी कोरफडीचा वापर करावा. कोरफड जेलचा वापर त्वचा आणि केसांसाठी सुद्धा केला जातो. कोरफड जेलमध्ये असलेले गुणकारी घटक त्वचा मऊ आणि हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. पण चुकीच्या पद्धतीने कोरफड जेलचा वापर केल्यास त्वचेच्या समस्या आणखीनच वाढू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
ताज्या कोरफडीच्या पानामध्ये पिवळसर रंगाचा चिकट द्रव असतो, ज्याला लेटेक्स असे म्हणतात. त्यामुळे कोरफडचे पान कापल्यानंतर थेट त्वचेवर किंवा केसांवर लावू नये. ताजी कोरफड वापरताना सगळ्यात आधी ती पाण्याने स्वच्छ करुन घ्यावी. त्यानंतर पिवळसर द्रव पूर्णपणे काढून टाकल्यानंतर बाहेरील हिरवी साल काढून आतला पारदर्शक गर चमचाचा मदतीने काढून घ्यावा. बाजारातील कोरफड जेल वापरण्याआधी त्यातील घटक तपासून पाहावेत.
चेहऱ्यावर कोरफड जेल लावताना पॅच टेस्ट घेणे फार आवश्यक आहे. अन्याथा चेहऱ्यावर खाज, जळजळ, लालसरपणा किंवा सूज जाणवून त्वचा विचित्र दिसेल. कोरफड जेल डोळ्यांच्या आसपास, जखमेवर लावणे टाळावे. त्वचेमध्ये वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात विटामिन ई कॅप्सूल मिक्स करुन त्वचेवर लावल्यास टॅन कमी होण्यासोबत त्वचेवरील ग्लो वाढण्यास मदत होईल आणि त्वचा हायड्रेट राहील.
कोरफड जेल केसांसाठी सुद्धा फायदेशीर आहे. केस गळणे किंवा केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी टाळूवर कोरफड जेल लावून ५ ते १० मिनिट केसांवर तसेच ठेवून द्या. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करुन सौम्य शाम्पूने केस धुवून टाका. केसांवर कोरफड जेल लावताना योग्य ती काळजी घेणे फार आवश्यक आहे. अन्यथा केसांच्या समस्या वाढू लागतात.
बऱ्याचदा कोरफड जेलचा रस काढून प्याला जातो. पण पानातील पिवळ्या लेटेक्समध्ये असलेले काही घटक जास्त प्रमाणात घेतल्यामुळे पोटदुखी, जुलाब आणि इतर समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कोरफडचा पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे. कोरफड नैसर्गिक आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीसाठी चांगली असेलच असे नाही.
Ans: अस्वच्छ किंवा थेट पानातून काढलेली कोरफड योग्य प्रकारे स्वच्छ न करता लावणे, खूप वेळ चेहऱ्यावर ठेवणे किंवा त्वचेची अॅलर्जी तपासल्याशिवाय वापरणे टाळावे.
Ans: काही लोकांना शुद्ध कोरफड जेल त्वचेवर वापरता येऊ शकते; मात्र प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. संवेदनशील त्वचा असल्यास आधी छोट्या भागावर पॅच टेस्ट करणे योग्य आहे.
Ans: होय. काही व्यक्तींना कोरफडीमुळे त्वचेवर लालसरपणा, खाज, जळजळ किंवा पुरळ येऊ शकते. अशी लक्षणे दिसल्यास वापर त्वरित थांबवावा.