महागडे हेअर डाय लावणे कायमचे जाल विसरून! 'या' पद्धतीने घरीच तयार करा कढीपत्त्याच्या पानांचा हेअर मास्क
Hair Care Tips: धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम केसांवर सुद्धा लगेच दिसून येतो. केस पांढरे होणे, केस तुटणे तर काहीवेळा टाळूवर इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. केसांच्या मुळांना आवश्यक पोषण न मिळाल्यामुळे केस कमकुवत होऊन जातात. केस गळणे, केस तुटणे, केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर केअरचा वापर केला जातो. पण वारंवार केमिकल युक्त हेअर केअर केसांना लावल्यामुळे केसांच्या वाढीवर परिणाम दिसू लागतो आणि केस खूप जास्त कोरडे आणि निस्तेज होतात. वयाच्या तिशीनंतर किंवा तरुण वयात केस पांढरे झाल्यास ते काळे करण्यासाठी हेअर डाय, मेहेंदी लावली जाते. मेहेंदी लावल्यानंतर आठवडाभर केस काळेभोर दिसतात. पण पुन्हा एकदा केस पांढरे होऊन केस खूप जास्त कोरडे आणि डल दिसतात.(फोटो सौजन्य – istock)
पांढऱ्या केसांवर कायमच महागडा हेअर डाय लावण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा. प्रत्येक स्वयंपाक घरात कढीपत्त्याची पाने उपलब्ध असतात. कढीपत्त्याच्या पानांचा वापर जेवणातील विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे केसांच्या वाढीसाठी आणि केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी तुम्ही कढीपत्त्याच्या पानांचा हेअर मास्क बनवून केसांवर लावू शकता. यामुळे तरुण वयात केस पांढरे होणार नाहीत आणि केसांची नैसर्गिक चमक कायम टिकून राहील. घरगुती उपाय केल्यानंतर पहिल्याच वापरात फारसा बदल दिसून येत नाही. वारंवार वापर केल्यानंतर खराब झालेली केसांची गुणवत्ता सुधारते आणि पांढरे केस काळे होत नाहीत.
हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढीपत्त्याची पाने स्वच्छ करून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात कढीपत्त्याची पाने आणि पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट गाळून घ्या. त्यानंतर त्यात कोरफड जेल, खोबरेल तेल मिक्स करून घ्या. तयार केलेला हेअर मास्क केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे लावून घ्या आणि हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे टाळूवरील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल आणि पांढरे केस काळे होतील. हेअर मास्क ५ ते १० मिनिटं ठेवल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाका.
कढीपत्त्याच्या पानांमध्ये असलेले गुणकारी घटक केस मुळांपासून मजबूत करण्यास मदत करतात. या पानांमध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडेंट्स असते, ज्यामुळे पांढरे केस काळे होण्यास मदत होते. केस पांढरे होण्यास अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. अनुवंशिकता, वाढते वय, तणाव किंवा शरीरात काही विशिष्ट पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम केसांवर लगेच दिसून येतो. केसांचा नैसर्गिक काळा रंग कमी झाल्यानंतर केस पांढरे दिसू लागतात. केसांचे पिगमेंट कमी झाल्यानंतर ते पुन्हा काळे होणे अतिशय अवघड आहे. त्यामुळे योग्य हेअर केअर रुटीन फॉलो करून केसांची काळजी घ्यावी.
Ans: कढीपत्त्यात विविध वनस्पतीजन्य घटक आणि antioxidants आढळतात. त्यामुळे तो घरगुती हेअर केअर रुटीनचा भाग म्हणून वापरता येऊ शकतो. मात्र केस गळणे किंवा पांढरे केस यावर तो निश्चित उपचार आहे, असे म्हणता येत नाही.
Ans: कढीपत्त्याचा मास्क लावल्याने पांढरे केस पुन्हा नैसर्गिकरित्या काळे होतात, याचे ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. पांढरे केस झाकण्यासाठी हेअर डाय किंवा इतर कॉस्मेटिक पर्याय वापरावे लागू शकतात.
Ans: आठवड्यातून एकदा वापरून पाहता येतो. टाळूवर खाज, लालसरपणा किंवा जळजळ जाणवल्यास वापर थांबवावा.






