
Ayurvedic Remedies: आयुर्वेदिक उपायांनी करा डोळ्यांभोवती वाढलेला काळेपणा दूर! रात्री झोपण्याआधी लावा 'हा' खास घरगुती लेप
Ayurvedic Remedies: धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, तासनतास मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. या समस्यांमुळे त्वचा निस्तेज आणि डल होऊन जाते. डोळ्यांभोवती वाढलेल्या काळेपणामुळे चेहऱ्यावरील तेज कमी होऊन जाते आणि त्वचा खूप जास्त निस्तेज दिसते. चेहरा निस्तेज, थकलेला आणि वयस्कर दिसू लागल्यानंतर तो पुन्हा एकदा चमकदार करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो तर कधी स्किन ट्रीटमेंट करून डोळ्यांभोवती वाढलेला काळेपणा कमी केला जातो.(फोटो सौजन्य – AI)
skincare tips: चुकीच्या सवयी मुळे येतायत चेहऱ्यावर पिंपल्स,कारण व लक्षणं काय?
डोळ्यांखालील त्वचा अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते. त्यामुळे कोणत्याही स्किन प्रॉडक्टचा वापर करताना योग्य ती खबरदारी घेऊन नंतरच वापर करावा. अन्यथा डोळ्यांना हानी पोहचू शकते. आज आम्ही तुम्हाला डोळ्यांभोवती वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी घरगुती लेप तयार करण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा लेप त्वचेवरील काळे डाग कमी करण्यासोबतच त्वचा उजळदार करण्यास सुद्धा मदत करते. महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्सचा किंवा क्रीम्सचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावे. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेच्या समस्या हळूहळू कमी होतात आणि चेहरा उजळदार दिसतो.
डोळ्यांखालील निस्तेज झालेली त्वचा उजळदार करण्यासाठी जायफळ आणि मुलेठीचा वापर करावा. प्राचीन काळापासून ते आतापर्यंत त्वचेच्या असंख्य समस्या कमी करण्यासाठी जायफळ आणि मुलेठीचा वापर केला जातो. या दोन पदार्थांमध्ये असलेले घटक त्वचेला पोषण देतात आणि चेहऱ्यावरील सूज कमी करण्यास मदत करतात. डोळ्यांखालील नाजूक त्वचेला आराम देण्यासाठी आणि त्वचा उजळदार करण्यासाठी आयुर्वेदिक घटकांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा.
लेप तयार करण्यासाठी सर्वप्रथम, जायफळ आणि मुलेठीची पावडर घेऊन त्यात गुलाबपाणी किंवा कच्चे दूध मिक्स करावे. घट्टसर पेस्ट तयार केल्यानंतर मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. कोणताही लेप त्वचेवर लावण्याआधी त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतरच लेप त्वचेवर लावावा. पाण्याने त्वचा स्वच्छ करून झाल्यानंतर कॉटनच्या कपड्याने त्वचा पुसून घ्या. तयार केलेला लेप डोळ्यांभोवती आणि काळ्या डागांवर लावून ठेवा. १५ ते २० मिनिटं झाल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून टाका.
त्वचा धुतल्यानंतर कोरडी करा आणि डोळ्यांखालील त्वचेवर तुम्हाला सूट होणारे मॉइश्चरायझर किंवा ऑलिव्ह ऑइल लावा. यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा डोळ्यांखाली आयुर्वेदिक घटकांनी समृद्ध असलेला लेप लावल्यास डोळ्यांखाली त्वचा उजळदार होईल. याशिवाय डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ७ ते ८ तासांची शांत झोप आणि भरपूर पाणी पिणे फार आवश्यक आहे. शांत झोप घेतल्यामुळे डोळ्यांखालील त्वचा चांगली राहण्यास मदत होते.
Ans: अपुरी झोप, आनुवंशिकता, वाढते वय, अॅलर्जी, डोळे वारंवार चोळणे, डिहायड्रेशन आणि त्वचेतील रंगद्रव्य वाढणे यामुळे डोळ्यांभोवती काळेपणा दिसू शकतो.
Ans: काही पारंपरिक उपायांमध्ये कोरफडीचा गर किंवा थंडावा देणारे नैसर्गिक घटक वापरले जातात. मात्र, हे उपाय काळी वर्तुळे पूर्णपणे दूर करतात, याचा ठोस वैज्ञानिक पुरावा मर्यादित आहे.
Ans: त्वचेला अनुकूल आणि सौम्य मॉइश्चरायझिंग उत्पादन वापरल्यास कोरडेपणा कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, डोळ्यांच्या अगदी जवळ घरगुती लेप लावणे टाळावे.