
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत
काही अभ्यासांनुसार कोरफडीतील जैवसक्रिय घटक शरीरातील ग्लुकोजच्या वापराची प्रक्रिया सुधारण्यास मदत करू शकतात. त्यामुळे कोरफडीच्या रसचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी काही प्रमाणात नियंत्रित ठेवण्यास मदत मिळू शकते. मात्र यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.
अँटीऑक्सिडंट गुणधर्म
कोरफड अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत होऊ शकते. हे गुणधर्म ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यात मदत करु शकतात.
पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त
मर्यादित प्रमाणात घेतल्यास कोरफडीचा रस पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकतो. चांगली पचनसंस्था शरीराच्या एकूण आरोग्यासाठी महत्त्वाची मानली जाते.
वजन नियंत्रणासाठी मदत
मधुमेह असलेल्या अनेक रुग्णांसाठी वजन नियंत्रण महत्त्वाचे असते. संतुलित आहार आणि व्यायामासोबत योग्य प्रमाणात कोरफडीचा वापर केल्यास चयापचय सुधारण्यास मदत मिळू शकते.
कोरफडीचा रस स्वतःहून सुरू करू नये. मधुमेहाची औषधे किंवा इन्सुलिन घेत असाल तर कोरफडीमुळे रक्तातील साखर अधिक कमी होण्याचा धोका वाढू शकतो. तसेच काही लोकांना पोटदुखी, अतिसार सारखा दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोरफडीच्या रसचे सेवन करु नका
कोरफडीचा ज्यूस हा निरोगी जीवनशैलीचा एक चांगला पर्याय असू शकतो, मात्र तो मधुमेहावरील उपचारांचा पर्याय नाही. नियमित रक्तातील साखरेची तपासणी, डॉक्टरांनी सांगितलेली औषधे, संतुलित आहार आणि व्यायाम यांनाच प्राधान्य द्यावे. कोणतेही हर्बल पेय किंवा आहार सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
झोप न येणे, चिडचिड आणि सतत थकवा? हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय ठरतील फायदेशीर