
औषधांशिवाय कमी होईल वाढलेले वजन! 'या' पद्धतीने करा मिक्स धान्यांच्या भाकरीचे सेवन, शुगर राहील नियंत्रणात
वजन वाढण्याची कारणे?
मिक्स धान्यांच्या भाकरीचे फायदे?
साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय?
Weight Loss: भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये वाढलेल्या वजनाने असंख्य रुग्ण त्रस्त आहेत. धावपळीची जीवनशैली आणि चुकीच्या आहारापद्धतीमुळे वजन वाढण्यासोबतच रक्तातील साखर सुद्धा वाढते. पोटावर साचून राहिलेली चरबी शरीरासाठी अतिशय घातक आहे. यामुळे टाईप-२ मधुमेहाचा धोका दुप्पट वाढतो. रोजच्या जेवणात खाल्लेले पदार्थ शरीरावर थेट परिणाम करतात. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर इतर अवयावांसुद्दा ईजा पोहचते. पोटावर साचून राहीलेली चरबी कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. महागड्या सप्लिमेंट, व्यायाम, आहारात बदल, तासंतास उपाशी राहणे, गोळ्यांचे सेवन करुन वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.(फोटो सौजन्य – istock)
पोटावर वाढलेल्या चरबीमुळे शरीराला गंभीर आजांराची लागण सुद्धा होऊ शकते. टाईप-२ मधुमेहाचा धोका वाढल्यानंतर दिसून येणाऱ्या लक्षाणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात गव्हाची चपाती आवडीने खाल्ली जाते. पण गव्हाची चपाती पचायला जड असते आणि ग्लॅसेमिक इंडेक्स जास्त असल्यामुळे मधुमेह असलेल्यानी चपाती खाणे टाळावे. गव्हाची चपाती खाल्ल्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढते. त्यामुळे कायम निरोगी राहण्यासाठी मिक्स धान्याचे भाकरीचे सेवन करावे. यामुळे वाढलेले वजन आणि हाय शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. रोजच्या जेवणात नियमित एक भाकरी खाल्ल्यास पोटसुद्धा भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही.
मल्टीग्रेन भाकरी मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल. या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटीन्स आणि अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात मल्टीग्रेन भाकरीचा समावेश करावा. यामुळे दीर्घकाळ पोटसुद्धा भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. नाचणीमध्ये असलेल्या कॅल्शियम आणि ज्वारीतील फायबरमुळे पचन स्लो होते. जेवणानंतर रक्तातील साखर अचानक वाढण्याचा धोका टाळण्यासाठी पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या भाकरीचे सेवन करावे. जवसातील ओमेगा-३ आणि लिग्नॅन्स शरीरातील मेटाबॉलिझम वाढवून वजन वेगाने कमी करण्यास मदत करतात. यासोबतच आहारात रव्या पालेभाज्या, फळे, भरपूर पाणी, नियमित व्यायम करणे सुद्धा आवश्यक आहे.
Ans: मिक्स धान्यांमध्ये फायबर आणि इतर पोषक घटक असू शकतात. योग्य प्रमाणात आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून भाकरी खाल्ल्यास वजन व्यवस्थापनाला मदत होऊ शकते.
Ans: फायबरयुक्त संपूर्ण धान्यांचा आहार रक्तातील साखरेच्या व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरू शकतो. मात्र मधुमेह असलेल्या व्यक्तींनी भाकरीचे प्रमाण आणि संपूर्ण आहार डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ठरवावा.
Ans: भाकरीसोबत भरपूर भाज्या, डाळी किंवा कडधान्ये आणि प्रथिनांचा स्रोत यांचा समावेश करून संतुलित जेवण तयार करता येते. भाकरीचे प्रमाण आपल्या गरजेनुसार ठेवणे महत्त्वाचे आहे.