कॉफी, साऊथ इंडियन पदार्थांसह भारतीय एअरपोर्टवर प्रवासी 'हे' पदार्थ खाणे अधिक पसंत करतात
आज विमानतळ हे फक्त प्रवासाचे साधन राहिलेले नाहीत, तर ते आता गजबजलेली, चैतन्यपूर्ण केंद्रे बनले आहेत. इथे प्रवासी फक्त विमानाची वाट पाहत नाहीत, तर विविध प्रकारच्या जेवणाचा आनंदही घेतात. याच संदर्भात ट्रॅव्हल रिटेल ऑर्गनायझेशन (IRHPL) यांनी केलेल्या एका अभ्यासात समोर आले की, भारतीय विमानतळांवर प्रवासी कोणते पदार्थ जास्त पसंत करतात आणि त्यांच्या खरेदीच्या सवयी कशा बदलल्या आहेत.
IRCTC Tour Package: केरळच्या मोहक प्रवासाची सुवर्णसंधी; जाणून घ्या IRCTC चे ‘लक्झ एस्केप’ पॅकेज
दक्षिण भारतीय जेवण सर्वाधिक लोकप्रिय
IRHPL च्या या इनसाईट्सनुसार, भारतातील विमानतळांवर दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांना सर्वाधिक पसंती मिळते. विशेषतः इडली, डोसा, सांबार, फिल्टर कॉफी यांची मागणी प्रवाशांमध्ये जास्त असते. त्यानंतर उत्तर भारतीय पदार्थ जसे की पनीर डिशेस, पराठे, राजमा-चावल आदींना पसंती दिली जाते.
ग्रॅब-एंड-गो पर्यायांना जास्त महत्त्व
विमानतळावर वेळ महत्त्वाचा असल्याने, बहुतेक प्रवासी “ग्रॅब-एंड-गो” म्हणजे पटकन घेऊन जाण्यायोग्य पदार्थांना प्राधान्य देतात. रिपोर्टनुसार, विमानतळावरील खाद्यपदार्थ व पेयांवरील एकूण खर्चापैकी ५०-६०% खर्च हे याच झटपट खरेदीच्या पर्यायांवर होतो. तर बसून खाण्याच्या पर्यायांवर फक्त २५-३५% खर्च होतो. म्हणजेच प्रवाशांसाठी गती आणि सुविधा या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत.
पेयांचे प्रमाण सर्वाधिक
स्टडीमध्ये एक विशेष बाब पुढे आली आहे की, विमानतळांवर प्रवासी सर्वाधिक पेय पदार्थांचा आनंद घेतात. सुमारे ७०% खरेदी पेय पदार्थांवरच होते. यात कॉफी, चहा, फ्रेश ज्यूसपासून ते अल्कोहोलिक बेव्हरेजेसपर्यंत सर्वांचा समावेश आहे. यामुळे पेय पदार्थांची मागणी ही इतर सर्व पर्यायांपेक्षा जास्त असल्याचे दिसते.
प्रीमियम अनुभवासाठी प्रवासी तयार
विमानतळावरील वातावरण प्रीमियम असते आणि प्रवासी सुविधा मिळावी यासाठी अतिरिक्त पैसे द्यायलाही तयार असतात. स्टडीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, प्रवासी क्वालिटी फूड आणि उत्कृष्ट पेय पदार्थांसाठी जास्त पैसे मोजायला हरकत मानत नाहीत. मात्र त्याचवेळी, ऑपरेटरसुद्धा प्रवाशांच्या बजेटचा विचार करून, प्रीमियम अनुभव देताना दरांवर संतुलन राखतात.
या अभ्यासातून हे स्पष्ट होते की भारतीय विमानतळांवर प्रवाशांच्या खाद्यसंस्कृतीत दक्षिण भारतीय पदार्थांचे वर्चस्व आहे. झटपट व सोयीस्कर पर्यायांना प्राधान्य दिले जात असून, पेय पदार्थांचा वापर सर्वाधिक आहे. तसेच, दर्जेदार सुविधा आणि प्रीमियम अनुभवासाठी प्रवासी थोडा अधिक खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे विमानतळ आज फक्त प्रवासाचे ठिकाण न राहता, खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू बनले आहेत.