IRCTC Tour Package: केरळच्या मोहक प्रवासाची सुवर्णसंधी; जाणून घ्या IRCTC चे 'लक्झ एस्केप' पॅकेज ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
IRCTC ने केरळसाठी खास “लक्झ एस्केप” पॅकेज जाहीर केले आहे.
६ रात्री, ७ दिवसांचा हा टूर पॅकेज मुन्नार, थेक्कडी, अलेप्पी, त्रिवेंद्रम आणि कोची या ठिकाणांचा समावेश करतो.
पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, जेवण आणि सर्व सुविधा एका परवडणाऱ्या दरात समाविष्ट आहेत.
IRCTC Tour Package : सुट्ट्यांचा मोसम आला की आपल्यापैकी अनेक जण कुटुंबासोबत प्रवासाची योजना आखतात. पण, प्रवास(travel) म्हणजे केवळ आनंद नव्हे, तर खर्चाचीही मोठी चिंता मनात असते. विशेषत: जर प्रवास दूरचा असेल आणि त्यात संपूर्ण कुटुंब सहभागी होत असेल, तर बजेट डोकं दुखवणारा विषय ठरतो. पण आता या चिंतेला पूर्णविराम मिळणार आहे. कारण IRCTC तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खास, परवडणारे आणि आलिशान “केरळ लक्झ एस्केप” पॅकेज.
केरळला “God’s Own Country” म्हटले जाते आणि ते खरे का ते पाहिल्यावरच कळते. हिरव्यागार पर्वतरांगा, मुन्नारची चहा बागायती, थेक्कडीचे जंगल व वन्यजीव, अलेप्पीचे बॅकवॉटर, त्रिवेंद्रमचे मंदिरसंस्कृती आणि कोचीचे ऐतिहासिक आकर्षण हे सर्व एका प्रवासात अनुभवण्याची संधी IRCTC तुम्हाला देत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Cheap International Travel: भारतातून फक्त 10,000 रुपयांत करता येईल ‘या’ सुंदर देशाची सहल; वाचा कसे?
या टूरची सुरुवात ११ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार असून पॅकेजचा कालावधी ६ रात्री व ७ दिवस इतका आहे. या प्रवासात समाविष्ट स्थळे आहेत मुन्नार, थेक्कडी, अलेप्पी, त्रिवेंद्रम आणि कोची. प्रवासाची सुरुवात गुवाहाटीहून विमानाने होईल.
जोडीदार (दुहेरी प्रवास): प्रति व्यक्ती ₹५९,१५०
तीन जण (तिहेरी प्रवास): प्रति व्यक्ती ₹५६,५१०
एकटे प्रवासी: प्रति व्यक्ती ₹७६,५१०
यातील सर्वात खास बाब म्हणजे या पॅकेजमध्ये विमान प्रवास, राहण्याची व्यवस्था, हॉटेलमधील जेवण आणि इतर सर्व आवश्यक सुविधा समाविष्ट आहेत. म्हणजेच प्रवासादरम्यान अतिरिक्त खर्चाची चिंता न करता तुम्ही सुट्टीचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.
या पॅकेजमध्ये समाविष्ट हॉटेल्स ही उच्च दर्जाची असून प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आरामदायी निवासाची सुविधा मिळेल. प्रवासादरम्यान दिले जाणारे जेवण स्थानिक चव आणि पर्यटकांच्या गरजांचा मिलाफ असेल.
मुन्नार – धुक्याच्या कुशीत वसलेले चहाचे मळे.
थेक्कडी – पेरियार लेक व वन्यजीव सफारी.
अलेप्पी – हाउसबोटमध्ये बॅकवॉटरचा आनंद.
त्रिवेंद्रम – श्री पद्मनाभस्वामी मंदिर व सांस्कृतिक वारसा.
कोची – डच पॅलेस, चायनीज फिशिंग नेट्स व ऐतिहासिक बंदर.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Travel Visa Restrictions : कोणत्या देशांमध्ये पर्यटकांच्या आगमनावर आहे बंदी; जाणून घ्या का घेण्यात आला ‘हा’ निर्णय?
IRCTC चे हे पॅकेज बुक करण्यासाठी तुम्हाला फक्त त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर www.irctctourism.com भेट द्यावी लागेल. ऑनलाइन प्रक्रियेद्वारे बुकिंग अतिशय सोपे आणि जलद आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात सुट्टीचा खरा आनंद घेण्यासाठी उत्तम ठिकाण शोधणे सोपे नाही. पण IRCTC चे हे केरळ “लक्झ एस्केप” पॅकेज म्हणजे खर्च न वाढवता आलिशान प्रवासाचा अनुभव घेण्याची एक सुवर्णसंधी आहे. मग वाट कसली पाहताय? बॅग्स भरा आणि निसर्गरम्य केरळच्या प्रवासासाठी सज्ज व्हा.