Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चमत्कारी आहे या मंदिरांचा दगड; हात लावताच सांगतो इच्छा पूर्ण होणार की नाही; सुप्रसिद्ध मंदिरांमध्ये सामील

कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील चिक्कोनहल्ली गावात एक ऐतिहासिक प्राचीन मंदिर वसले आहे. इथे एक चमत्कारी दगड आहे जो भाविकांना आपली इच्छा पूर्ण होणार की नाही याची माहिती देतो. मंदिर आणि चमत्कारी दगडाविषयी सविस्तर जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: May 30, 2025 | 08:36 AM
चमत्कारी आहे या मंदिरांचा दगड; हात लावताच सांगतो इच्छा पूर्ण होणार की नाही; सुप्रसिद्ध मंदिरांमध्ये सामील

चमत्कारी आहे या मंदिरांचा दगड; हात लावताच सांगतो इच्छा पूर्ण होणार की नाही; सुप्रसिद्ध मंदिरांमध्ये सामील

Follow Us
Close
Follow Us:

भारतात अनेक सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय अशी धार्मिक स्थळे आहेत. हिंदू धर्मात, या ठिकाणांना फार महत्त्व देण्यात आले आहे. अशात या ठिकाणी नेहमीच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. प्रत्येक ठिकाणाची आपली अशी वेगळी ओळख आणि खासियत असते ज्यासाठी ते प्रसिद्ध असते. अशात आज आम्ही तुम्हाला कर्नाटकातील एका मंदिराविषयी माहिती सांगत जे १२ व्या शतकात बांधले गेले होते. या मंदिराला धार्मिक-ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अमरगिरी श्री गुड्डाडा रंगनाथस्वामी मंदिर असे त्याचे नाव असून हे मंदिर हसन जिल्ह्यातील चन्नरायापेटा तालुक्यातील चिक्कोनहल्ली येथे वसले आहे. तामिळनाडूतून निर्वासित झाल्यानंतर मेलुकोटे येथे आलेले श्री रामानुजाचार्य त्यांच्या प्रवासादरम्यान चिक्कोनहल्ली येथे राहिले असल्याचे सांगितले जाते.\

इंग्रजांच्या काळापासून फेव्हरेट आहे भारतातील हे ठिकाण; फिरण्यासाठीचे उत्तम ठिकाण

त्या रात्री रामानुजाचार्य यांना एक विशेष आध्यात्मिक अनुभव आला. दुसऱ्या दिवशी त्याने गावकऱ्यांना सांगितले की, हे ठिकाण भगवान विष्णूंना पवित्र आहे. त्यांनी सांगितले की, येथे भगवान विष्णूची मूर्ती स्थापित केल्यानंतर त्यांची दररोज पूजा करावी. त्यांच्या सूचनांनुसार, गावकऱ्यांनी धनुष्यबाण धरलेल्या भगवान रामाची मूर्ती स्थापित केली आणि नियमित पूजा सुरू केली. मंदिराची कथा तर रंजक आहेच शिवाय इथे असलेले एक दगड देखील कोणत्या रहस्याहुन कमी नाही. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

मंदिरात कसे जावे?

हे मंदिर कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील चन्नरायपटना तालुक्यातील चिक्कोनहल्ली गावात आहे. येथे पोहोचण्यासाठी, प्रथम तुम्हाला हसन किंवा चन्नरायपटना येथे पोहोचावे लागेल, जे रस्ते आणि रेल्वेने चांगले जोडलेले आहे. जर तुम्ही बंगळुरूहून येत असाल तर तुम्हाला सुमारे १६० किमी अंतर कापावे लागेल, जे तुम्ही कार, बस किंवा ट्रेनने जाऊ शकता. इथे जाण्यासाठी ३-४ तासांचा वेळ लागेल. चन्नरायपटना किंवा हसन येथून तुम्ही टॅक्सी किंवा स्थानिक वाहनाने चिक्कोनहल्लीला पोहोचू शकता.

परकीय आक्रमणकर्त्यांपासून मंदिराचे रक्षण करण्यासाठी, गावकऱ्यांनी त्याला रंगनाथस्वामी मंदिर म्हणायला सुरुवात केली, कारण येथे आक्रमक रंगनाथाचे नाव आणि पूजा आदराने करत असत. आज, रामानुजाचार्य यांनी सांगितल्याप्रमाणे, हे मंदिर रंगनाथस्वामी मंदिराच्या नावाने प्रसिद्ध आहे. दर शनिवारी समुदायासाठी दसोहा (जेवण) असतो. रामनवमीनिमित्त रथोत्सव साजरा केला जातो. पुजारी पार्थसारथी यांच्या मते, मंदिराचे रक्षण “दोनाप्पा” नावाच्या संरक्षक देवतेने केले आहे.

या मंदिरात एक दगड आहे ज्याला फार खास मानले जाते. वास्तविक, जेव्हा रामानुजाचार्य येथे आले होते तेव्हा त्यांनी उशी म्हणून या दगडाचा वापर केला होता. या दगडाबाबत अशी मान्यता आहे की, जो कोणी या दगडावर इच्छा घेऊन बसले तर जर इच्छा पूर्ण झाली नाही तर तो डावीकडे सरकतो आणि जर इच्छा पूर्ण झाली तर तो दगड उजवीकडे झुकत राहतो. आपल्या हलण्याच्या वेगाने हा दगड नेहमीच भाविकांना आश्चर्यचकित करत असतो.

Vat Savitri 2025: कुणी 500 तर कुणी 250 वर्षे जुना… हे आहेत भारतातील सर्वात प्राचीन वटवृक्ष

मंदिराबाबत महत्त्वाच्या गोष्टी

  • दर शनिवारी मंदिरात सामुदायिक जेवण (दसोहा) दिले जाते, ज्यामध्ये सर्व भाविक सहभागी होऊ शकतात.
  • रामनवमीनिमित्त मंदिरात भव्य रथयात्रा काढली जाते. या उत्सवाचा धार्मिक आणि सांस्कृतिक आनंद तुम्ही अनुभवू शकता.
  • मंदिरातील वातावरण खूप शांत आणि आध्यात्मिक आहे.
  • आजूबाजूच्या हिरवळीचे आणि टेकड्यांचे दृश्य मानला शांती देऊन जाते
  • मंदिराचे पुजारी आणि स्थानिक लोक रामानुजाचार्यांशी संबंधित घटना आणि मंदिराचा इतिहास सांगतात, तुम्ही त्यांना मंदिराशी संबंधित गोष्टी विचारू शकता.
  • येथील भाविक आणि ग्रामस्थांशी बोलून तुम्ही मंदिराशी संबंधित अनेक मनोरंजक कथा जाणून घेऊ शकता.

कर्नाटकातील अमरगिरी श्री गुड्डाडा रंगनाथस्वामी मंदिरात जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च दरम्यान आहे. या काळात हवामान थंड आणि आल्हाददायक राहते. विशेषतः रामनवमीनिमित्त येथे भव्य रथोत्सव साजरा केला जातो, जो पाहण्यासाठी भाविक दूरवरून येतात. याशिवाय, दर शनिवारी एक विशेष पूजा आणि सामुदायिक जेवण (दसोहा) असते. त्याचबरोबर पावसाळ्यात मात्र (जुलै ते सप्टेंबर) रस्ते निसरडे झाल्यामुळे येथे पोहोचणे थोडे कठीण होऊ शकते.

Web Title: Amaragiri shri guddada ranganathaswamy temple karnataka is famous for its mysterious stone travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 08:36 AM

Topics:  

  • Karnataka
  • temple
  • travel news

संबंधित बातम्या

भारताचं ते रहस्यमयी मंदिर, जे दिवसातून दोनदा अचानक होतं गायब… सत्य वाचताच तुम्हालाही बसेल धक्का
1

भारताचं ते रहस्यमयी मंदिर, जे दिवसातून दोनदा अचानक होतं गायब… सत्य वाचताच तुम्हालाही बसेल धक्का

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ
2

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ

‘Sea View Room की Parking View…’ ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्सवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित?
3

‘Sea View Room की Parking View…’ ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्सवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित?

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides
4

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.