(फोटो सौजन्य: Pinterest)
बहुचर्चित वट सावित्रीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या सणाला हिंदू धर्मात प्रचंड महत्त्व देण्यात आले आहे. याबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. या सणात वडाच्या झाडाला विशेष महत्त्व! असे मानले जाते की ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव वडाच्या झाडावर राहतात. म्हणून, त्याची पूजा केल्याने त्रिमूर्तीचे आशीर्वाद मिळतात.वट सावित्री व्रत हा हिंदू महिलांद्वारे साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करतात. या व्रतामध्ये सावित्रीने सत्यवानाला यमदेवाने परत आणल्याची कथा सांगितली जाते, ज्यामुळे वटवृक्षाची पूजा केली जाते. यावर्षी १० जून रोजी वटसावित्रीचा सण साजरा केला जाणार आहे. अशातच आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात प्राचीन आणि जुन्या वडाच्या झाडांची माहिती सांगणार आहोत. यातील काही झाड तर शेकडो वर्षे जुने आहेत आणि आजही जशाच्या तसे उभे आहेत. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
2000 वर्षे जुने पर्यटनस्थळ जिथे आहे अदृश्य शक्तींचा वास, विशालकाय दैत्य घेऊन आले होते पाषाण
नैनितालमधील २०० वर्ष जुना वडाचं झाड
उत्तराखंडमधील नैनितालजवळ सुमारे २०० वर्षे जुने एक वडाचे झाड आजही जशाच्या तसे वसले आहे. कोणत्याही हिल स्टेशनमध्ये इतके जुने वडाचे झाड सापडणे दुर्मिळ आहे. नैनितालमध्ये भेट देण्यासाठी येणारी लोक जेव्हा या वटवृक्षाला पाहतात तेव्हा याची भव्यता, मजबुती आणि लांब पारंब्या पाहून थक्क होता. यावरूनच झाडाचे महत्त्व स्पष्ट होते.
गुजरातमध्ये ३०० वर्ष जुना वटवृक्ष
गुजरातमधील आणंद जिल्ह्याजवळ वड तालुका नावाचं एक वटवृक्ष आहे. या वटवृक्षाचे वय सुमारे ३०० वर्षे असल्याचे सांगितले जाते. हे झाड इतके प्राचीन असल्याने, स्थानिक समुदायासाठी एक आध्यात्मिक केंद्र मानले जाते. वट सावित्री पूजेला येथे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.
प्रयागराज मधील अक्षयवट
उत्तर प्रदेशमधील प्रयागराजला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. इथे संगम नदीच्या काठावर एक प्राचीन वटवृक्ष आहे. येथील वडाच्या झाडाला अक्षयवट असे म्हटले जाते. हे झाड इथे अनादी काळापासून वसले असल्याचे सांगितले जाते. या झाडाचे दर्शन घेतल्यास आपले सर्व पाप नष्ट होतील अशी लोकांची धारणा आहे.
पश्चिम बंगालमधील ग्रेट बनयान ट्री
पश्चिम बंगालमधील आचार्य जगदीन चंद्र बोस बोटॅनिकल गार्डनमध्ये द ग्रेट वटवृक्ष आहे. हे वटवृक्ष सुमारे २५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. हे झाड त्याच्या पसरलेल्या मुळांमुळे जंगलासारखे दिसते. हे वडाचे झाड सुमारे ३.५ एकर जमिनीवर पसरलेले आहे. याच्या पारंब्या इतक्या पसरलेल्या आहेत की त्याच्या आत रस्ते आणि रस्त्याचे जाळे आहेत.
जगातील 7 देश जिथे एकही भारतीय नाही; क्वचितच यांचे नाव कुणी ऐकले असेल
आंध्र प्रदेशमधील थिमम्मा मरिमानु
आंध्र प्रदेश राज्यातही एक प्राचीन वडाचे झाड वसले आहे. हे झाड अनंतपूर जिल्ह्यातील गुटी मंडळात आहे. या झाडाचे वय ५५० वर्षांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. हे झाड जगातील सर्वात मोठ्या वडाच्या झाडांपैकी एक असल्याचे सांगितले जाते. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे झाड ५ एकर जमिनीवर पसरलेले आहे. सांगितले जाते की, हे झाड जिथे उगवले तिथे थिम्मा नावाच्या महिलेने सती जाऊन आपला जीव दिला होता.