(फोटो सौजन्य: istock)
भारतात फिरण्यासाठी अनेक सुंदर आणि मनमोहक ठिकाणे आहेत. प्रत्येक ठिकाणाची आपली अशी वेगळी ओळख आणि काही खासियत असते. सध्या पावसाळा ऋतू सुरु झाला आहे, या ऋतूत अनेकजण कुठे ना कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. मान्सूनमध्ये अनेक ठिकाणांचे सौंदर्य आणखीनच बहारदार बनते ज्यामुळे हा काळ पर्यटनासाठीचा एक उत्तम काळ मानला जातो. आज आम्ही तुम्हाला भारतातील एका अशा ठिकाणाविषयी माहिती सांगत आहोत ज्याचा शोध खुद्द इंग्रजांनी केला. हे ठिकाण त्याकाळी इंग्रजांचे सर्वात आवडीचे ठिकाण होते. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Vat Savitri 2025: कुणी 500 तर कुणी 250 वर्षे जुना… हे आहेत भारतातील सर्वात प्राचीन वटवृक्ष
आम्ही ज्या ठिकाणाविषयी बोलत आहोत ते ठिकाण म्हणजे मसुरीमधील केम्प्टी फॉल्स! तुम्ही जर मसुरीला भेट देण्याचा विचार करत असाल तर हे ठिकाण तुमच्या विशलिस्टमध्ये असलंच पाहिजे. अनेक वर्षांपासून मसुरीमध्ये केम्प्टी फॉल्स हे एक आकर्षणाचे केंद्र बनले आहे. इथे तुम्हाला निसर्गसौंदर्याचा एक अद्भुत अनुभव घेता येईल. येथील सौंदर्य पाहण्यासारखे आहे. मसुरी हे भारतातील पहिले हिल स्टेशन आहे. ब्रिटिश उन्हाळ्यात येथे शांततेचे क्षण घालवण्यासाठी येत असत. जर तुम्ही मसुरीला जाण्याचा आणि केम्प्टी फॉल्सला भेट देण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणाविषयी काही खास गोष्टी तुम्ही जाणून घेतल्याचं पाहिजे.
केम्प्टी फॉल (Kempty Fall) पाहण्यास खूप सुंदर आहे. येथे तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळेल. या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे पाणी अनेक खडकांमधून येते आणि वेगवेगळ्या धबधब्यांमध्ये विभागले जाते. इथले मनमोहक दृश्ये मनाला सुखावून जाते आणि आयुष्यभर स्मरणात राहते.
ब्रिटिश ऑफिसरने शोधले होते ठिकाण
१८३५ मध्ये ब्रिटीश अधिकारी जॉन मॅकिनन यांनी या ठिकाणाचा शोध लावल्याचे सांगितले जाते. हळूहळू लोक या ठिकाणी आनंद घेण्यासाठी येऊ लागले आणि ते एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनले. इथे लोक कॅम्पचा आनंद घेऊ लागले. लोक इथे चहा पिण्यासाठीही येत असतात. आम्ही तुम्हाला सांगतो की पूर्वी ते कॅम्प टी फॉल म्हणून ओळखले जात होते, परंतु नंतर त्याचे नाव स्पेलिंग केम्प्टी फॉल असे बदलण्यात आले. दरवर्षी अनेक पर्यटक मसुरीला भेट देतात आणि घरी जाण्यापूर्वी या ठिकाणाला आवर्जून पाहतात आणि इथल्या निसर्गसौंदर्याची मजा लुटतात.
2000 वर्षे जुने पर्यटनस्थळ जिथे आहे अदृश्य शक्तींचा वास, विशालकाय दैत्य घेऊन आले होते पाषाण
फिरण्यासाठीचा उत्तम काळ
जर तुम्ही मसुरीला जाण्याचा विचार करत असाल तर मार्च ते जून हा काळ येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. यानंतर येथे पाऊस पडतो ज्यामुळे पर्वतांवर धोका वाढतो. जर तुम्ही साहसी प्रेमी असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. इथे तुम्ही रोपवे आणि स्विंग सारख्या खेळांचा आनंद घेऊ शकता. इथे तुम्ही सुंदर फोटोज आणि व्हिडिओज देखील क्लिक करू शकता. मसूरी ते केम्प्टी फॉल्स हे अंतर सुमारे १५ किलोमीटर आहे. हे धबधबा समुद्रसपाटीपासून ४४७५ फूट उंचीवर आहे. टॅक्सीने तुम्ही येथे सहज पोहोचू शकता.