Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

APL Blood Cancer: ताप गेला पण रक्तात गडबड कायम, तपासणी केली तर निघाला दुर्मिळ रक्ताचा कॅन्सर

APL Blood Cancer: मुंबईतील चाळीशीतील एका व्यक्तीला ताप आणि अशक्तपणा आला होता. औषधांनंतर ताप कमी झाला, मात्र त्याच्या रक्तातील पांढऱ्या पेशी सातत्याने कमी राहिल्या. हिमोग्लोबिन आणि प्लेटलेट्स सामान्य असूनही WBC काउंट २००० ते ३००० दरम्यानच होता.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 29, 2026 | 06:50 PM
APL Blood Cance (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

APL Blood Cance (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ताप बरा झाला, पण WBC काउंट २०००–३००० दरम्यानच राहिला.
  • बोन मॅरो तपासणीत APL या दुर्मिळ रक्ताच्या कॅन्सरचे निदान झाले.
  • वेळेत निदान झाल्याने ATRA आणि आर्सेनिकने उपचार करण्यात आले.
ताप येणं ही साधी गोष्ट आहे. ताप आला की औषध घेतो आणि बरा होतो. पण कधी कधी ताप गेल्यानंतर पण शरीरात काही तरी बिघाड राहतो आणि आपल्याला कळत नाही. मुंबईत असाच एक प्रकार घडला आहे.चाळीशीतला एक माणूस होता. त्याला ताप आला आणि खूप अशक्तपणा आला. डॉक्टरकडे गेला, औषध घेतलं आणि ताप उतरला पण. सगळं ठीक झालं असं वाटलं. पण जेव्हा त्याची रक्त तपासणी केली तेव्हा एक गोष्ट सारखीच खराब येत होती. APL Blood Cancer:

त्याच्या रक्तात पांढऱ्या पेशी खूप कमी होत्या. साधारण माणसात त्या ४००० ते ११००० असतात, पण त्याच्या फक्त २००० ते ३००० च होत्या. ताप बरा झाला तरी या पेशी वाढत नव्हत्या.

डॉक्टरांना शंका आली

सुरुवातीला डॉक्टरांना पण वाटलं की तापामुळे असं झालं असेल. कारण बऱ्याचदा तापानंतर पांढऱ्या पेशी कमी होतात. पण या माणसाचं वेगळं होतं. त्याचं हिमोग्लोबिन ठीक होतं, प्लेटलेट्स पण ठीक होत्या. फक्त पांढऱ्या पेशीच कमी होत्या. आणि त्या काही केल्या वाढत नव्हत्या.मग वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे कॅन्सर तज्ज्ञ डॉ. प्रीतम कुमार जैन यांनी विचार केला की हे नुसतं तापाचं कारण नाही. काही तरी वेगळं आहे. त्यांनी बोन मॅरो तपासणी करायला सांगितली. बोन मॅरो म्हणजे आपल्या हाडाच्या आतला भाग जिथे रक्त तयार होतं.

तपासणीत धक्कादायक रिपोर्ट

आलाबोन मॅरो तपासलं तेव्हा आतमध्ये खूप सारी खराब आणि कच्ची पेशी दिसली. त्यांना ब्लास्ट सेल्स म्हणतात. मग अजून खोलात तपासणी केली तेव्हा कळलं की त्या माणसाला Acute Promyelocytic Leukaemia म्हणजे APL नावाचा रक्ताचा कॅन्सर आहे. हा AML नावाच्या कॅन्सरचाच एक दुर्मिळ प्रकार आहे.डॉ. जैन म्हणाले, “सुरुवातीला काहीच वाटलं नाही. ताप गेला होता, बाकी रिपोर्ट नॉर्मल होते. पण फक्त पांढऱ्या पेशी कमीच राहत होत्या. तीच गोष्ट आम्हाला महत्वाची वाटली. आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं नाही आणि बोन मॅरो तपासलं, त्यामुळे आजार लवकर कळला.”

वेळेत निदान झालं म्हणून जीव वाचला

या कॅन्सरमध्ये सगळ्यात धोका काय असतो तर रक्तस्राव होणे किंवा रक्ताच्या गाठी होणे. जर उपचार करायला उशीर झाला असता तर त्याच्या जीवाला धोका होता. पण सुदैवाने वेळेत निदान झालं.या कॅन्सरचा उपचार दुसऱ्या कॅन्सरपेक्षा वेगळा असतो. यात कच्च्या पेशींना पिकवण्यासाठी औषधं देतात. त्यामुळे त्या पेशी आपोआप मरतात. त्या माणसावर ATRA आणि आर्सेनिक नावाच्या औषधांनी उपचार सुरू केले.

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

तो जवळपास एक महिना हॉस्पिटलमध्ये होता. औषधांचा त्याला चांगला फायदा झाला. त्याच्या शरीरातल्या खराब पेशी पूर्णपणे गेल्या आणि आजार कंट्रोलमध्ये आला. चांगली गोष्ट म्हणजे या पूर्ण उपचारात त्याला रक्त पण द्यावं लागलं नाही.डॉ. जैन म्हणाले, “APL हा असा कॅन्सर आहे ज्यात लवकर निदान खूप महत्वाचं आहे. आम्ही मोठी गडबड होण्याआधीच आजार पकडला. उपचाराला चांगला प्रतिसाद मिळाला. आता तो घरी गेला आहे आणि रोजचं काम करतोय. फक्त फॉलोअपसाठी येतो.”

भारतीय पुरुषांमध्ये Oral Cancer चा अधिक धोका, 5 लक्षणांवरून ओळखा

सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट

या केस मधून एक गोष्ट शिकायला मिळते. रक्ताच्या रिपोर्टमध्ये काही जरी छोटा बदल दिसला तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. तापानंतर पांढऱ्या पेशी कमी होतात असं म्हणून सोडून देऊ नका. जर त्या सतत कमीच राहत असतील तर डॉक्टरला भेटा.कधी कधी रक्तातला साधा वाटणारा बदल हा मोठ्या आजाराची पहिली खूण असू शकतो. या माणसाच्या बाबतीत पण तेच झालं. पांढऱ्या पेशी कमी राहणं हीच खूण होती ज्यामुळे दुर्मिळ कॅन्सर लवकर सापडला आणि वेळेत उपचार होऊन त्याचा जीव वाचला.

Web Title: Apl blood cancer low white blood cells bone marrow diagnosis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • cancer
  • lifestlye tips

संबंधित बातम्या

Diabetic Retinopathy: दिसतंय म्हणून डोळे निरोगी आहेत असं समजू नका! रेटिनाच्या आजाराचा धोका ओळखा
1

Diabetic Retinopathy: दिसतंय म्हणून डोळे निरोगी आहेत असं समजू नका! रेटिनाच्या आजाराचा धोका ओळखा

Sumeet Raghavans Luxurious Home: अभिनयासोबत घराचीही भन्नाट पसंती! सुमीत राघवनच्या घरात संविधानासाठी खास जागा
2

Sumeet Raghavans Luxurious Home: अभिनयासोबत घराचीही भन्नाट पसंती! सुमीत राघवनच्या घरात संविधानासाठी खास जागा

Pregnancy Sleep Problems: गर्भावस्थेचा शेवटचा टप्पा खूप महत्त्वाचा! महिलांनो, ‘या’ चुका अजिबात करू नका
3

Pregnancy Sleep Problems: गर्भावस्थेचा शेवटचा टप्पा खूप महत्त्वाचा! महिलांनो, ‘या’ चुका अजिबात करू नका

PCOS and Diabetes Risk: PCOS मुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो का?
4

PCOS and Diabetes Risk: PCOS मुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.