अंघोळीआधी त्वचेवर लावा 'हे' घरगुती पदार्थ
धावपळीच्या आयुष्यात काहीवेळा त्वचेच्या आरोग्याकडे महिला दुर्लक्ष करतात. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, त्वचा काळवंडून जाणे, पिंपल्स फोड येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्यामुळे त्वचेच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. शरीरातील सगळ्यात नाजूक अवयव म्हणजे त्वचा. आहारात कोणत्याही तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यास लगेच त्वचेवर परिणाम दिसून येतात. चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येतात. त्वचेवर आलेले मुरूम किंवा पिंपल्स घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. मात्र केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी तुम्ही घरगुती उपाय करू शकता.(फोटो सौजन्य – iStock)
सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. मात्र तरीसुद्धा त्वचेवर हवा तसा ग्लो येत नाही. चेहऱ्यावर लावलेल्या क्रीम काहीकाळ त्वचेवर प्रभावी टिकवून ठेवतात. मात्र कालांतराने पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. अनेकदा झोपेतून उठल्यानंतर त्वचा काळवंडलेली आणि निस्तेज दिसू लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अंघोळीआधी त्वचेवर कोणते पदार्थ लावावे, ज्यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि उजळदार दिसेल, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
अंघोळ करण्याआधी वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात दूध मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणाची पेस्ट तयार करून संपूर्ण त्वचेवर लावा. १० मिनिटं ठेवून नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा. यामुळे चेहरा उजळदार आणि सुंदर दिसेल. याशिवाय त्वचेवर आलेले डाग, पिंपल्स कमी होण्यास मदत होईल. त्वचेवरील पिंपल्स घालवण्यासाठी बेसनाचा वापर करावा.
अंघोळीला जाण्याआधी ओट्स पावडर आणि दह्याचे मिश्रण तयार करून चेहरा आणि मानेवर लावा. काहीवेळ ठेवून नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. या उपाय नियमित केल्यास त्वचेवर साचून राहिलेली घाण स्वच्छ होईल आणि त्वचा उजळदार दिसेल. दही कोरड्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी मदत करते.
त्वचेवर आलेले पिंपल्स आणि मुरुमांचे डाग घालवण्यासाठी टोमॅटोचा वापर करावा. टोमॅटो वापरल्यामुळे त्वचेवर आलेले सर्व डाग निघून जातील आणि त्वचा स्वच्छ होईल. टोमॅटोमध्ये अँटी-ऑक्सि़डंट्स आणि जीवनसत्त्व आढळून येतात, ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी टोमॅटोचा वापर केल्यास त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होईल.
थंडीमुळे फाटलेल्या ओठांच्या साली निघतात? मग करून ‘हे’ सोपे घरगुती उपाय, ओठ कायम राहतील मुलायम
त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर केला जात आहे. गुलाब पाण्यात असलेले गुणधर्म त्वचा हायड्रेट ठेवून स्वच्छ ठेवतात, गुलाब पाणी ब्युटी प्रॉडक्ट बनवण्यासाठी वापरले जाते. महिला त्वचेसाठी योग्य स्किन केअर फॉलो करत नाहीत. अशावेळी अंघोळी जाण्याआधी चेहऱ्यावर गुलाब पाणी लावून ५ मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.