अंघोळ करताना कोणत्या चुका करू नये
दैनंदिन जीवन जगताना शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित अंघोळ केली जाते. अंघोळ केल्यामुळे शरीरावरील घाण स्वच्छ होते. याशिवाय मनाला सुद्धा प्रसन्न वाटते. अंघोळ केल्यामुळे शारीरिक, मानसिक आरोग्यासोबत शरीराचे रक्तभिसरण सुधारते, त्वचेचे आरोग्य सुधारते इत्यादी अनेक फायदे होतात. शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित अंघोळ केली जाते.पण चुकीच्या पद्धतीने अंघोळ केल्यामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यसुद्धा बिघडण्याची शक्यता असते. अनेक लोक चुकीच्या पद्धतीने अंघोळ करतात, त्यामुळे शारीरिक आरोग्य बिघडते, जे त्वचा आणि शरीरासाठी अतिशय हानिकारक आहे. सर्वच ऋतूंमध्ये अनेकांना गरम पाण्याची अंघोळ करण्याची सवय असते. पण गरम पाण्याने अंघोळ केल्यास आरोग्यावर परिणाम होतात.(फोटो सौजन्य – iStock)
थंडीमुळे फाटलेल्या ओठांच्या साली निघतात? मग करून ‘हे’ सोपे घरगुती उपाय, ओठ कायम राहतील मुलायम
जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे, अंघोळीला एकच साबण वापरणे, ओले केस तसेच बांधून ठेवणे, जास्त जाड कपड्याने अंग पुसणे इत्यादी चुकीच्या सवयींमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. चुकीच्या पद्धतीने अंघोळ केल्यास त्वचा जास्त प्रमाणात कोरडी पडणे, त्वचेवर सुरकुत्या येणे इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अंघोळ करताना कोणत्या चुका करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या चुका टाळल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील.
गरम पाण्याची अंघोळ केल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. थंड पाण्याची अंघोळ केल्यानंतर शरीराला आराम मिळतो. पण नेहमी नेहमी गरम पाण्याची अंघोळ केल्यामुळे त्वचेमधील नैसर्गिक तेल कमी होऊन जाते आणि त्वचा अधिक कोरडी पडते. त्वचा कोरडी झाल्यानंतर त्वचेसंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी नेहमी अंघोळीला गरम पाणी घेऊ नये. गरम पाण्याचा जास्त वापर केल्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडतात.
अंघोळ करताना कोणत्या चुका करू नये
अंघोळ करताना अनेक घरांमध्ये अजूनही एकाच साबणाचा वापर केला जातो. घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच एकच साबण वापरतात. पण एकच साबण वापरल्यामुळे त्वचेचे नुकसान होते. साबणामध्ये असलेले हानिकारक रसायन त्वचा कोरडी करून टाकते, ज्यामुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या येणे, त्वचेची गुणवत्ता खराब होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात.
अंघोळ करताना केस धुतल्यानंतर काहींना केसांना टॉवेल लावण्याची सवय असते. पण जास्त वेळ केसांवर टॉवेल लावून ठेवल्यामुळे केस खराब होतात. याशिवाय केसांमधील पाणी टाळूमध्ये मुरते आणि सर्दी होण्याची शक्यता असते. याशिवाय ओले केस योग्य वेळी स्वच्छ न केल्यामुळे केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात.
दैनंदिन आयुष्यातील ‘या’ सवयी लिव्हरचे आरोग्य बिघडवण्यासाठी ठरतात कारणीभूत, लिव्हरचे होऊ शकते नुकसान
अंघोळ करताना किंवा अंघोळ करून आल्यानंतर अंग पुसताना टॉवेलने अंग जास्त घासू नये. यामुळे त्वचा खराब होते. याशिवाय त्वचा अधिक निर्जीव होऊन जाते. त्वचा निर्जीव आणि निस्तेज झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात.