Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bloating Home Remedy:वारंवार अपचन-पोट फुगण्याच्या त्रासाने वैतागला आहात? मग ताज्या पुदिन्याच्या पानांचे ‘या’ पद्धतीने करा सेवन

पोटात वाढलेली जळजळ आणि ऍसिडिटी, गॅस कमी करण्यासाठी पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. ही पाने शरीरात थंडावा टिकवून ठेवतात आणि आरोग्य सुधारतात. चला तर जाणून घेऊया पुदिन्याच्या पानांचे सेवन करण्याची योग्य पद्धत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 19, 2026 | 05:30 AM
वारंवार अपचन आणि पोट फुगण्याच्या त्रासाने वैतागला आहात? मग ताज्या पुदिन्याच्या पानांचे 'या' पद्धतीने करा सेवन

वारंवार अपचन आणि पोट फुगण्याच्या त्रासाने वैतागला आहात? मग ताज्या पुदिन्याच्या पानांचे 'या' पद्धतीने करा सेवन

Follow Us
Follow Us:

वारंवार अपचन आणि पोट फुगण्याची कारणे?
पुदिन्याच्या पानांचे फायदे?
अपचनाच्या समस्या कशामुळे वाढतात?

दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं जंक फूड किंवा पॅक बंद पदार्थ खाण्याची खूप जास्त सवय असते. पॅक बंद पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात सोडियम आणि इतर हानिकारक घटकांची पातळी वाढते. ज्याचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात ऍसिडिटीचे प्रमाण वाढून आंबट ढेकर येणे, उलट्या, मळमळ तर काहीवेळा खूप जास्त डोकेदुखी होऊन आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. ऍसिडिटी किंवा पोटात गॅस झाल्यानंतर बऱ्याचदा मेडिकलमधील गोळ्या किंवा सिरप आणून प्यायले जाते. पण वारंवार गोळ्या खाल्ल्यामुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वाढत्या ऍसिडिटी आणि अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी पुदिन्याच्या पानांचे कशा पद्धतीने सेवन करावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)

केवळ तेल तूप नाहीतर, दैनंदिन आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास वाढतो हृदयाच्या आजारांचा धोका! चुकीच्या सवयी वाढवतील गंभीर आजार

वारंवार अपचन आणि पोट फुगण्याची कारणे:

  • खूप घाईघाईने जेवणे, एकाच वेळी जास्त खाणे.
  • तेलकट, मसालेदार, जड किंवा जास्त फॅट्स असलेले अन्नपदार्थ
  • अपुरी झोप आणि सततचा मानसिक ताण
  • ॲसिडिटी, पेप्टिक अल्सर, किंवा ‘एच. पायलोरी’
  • लॅक्टोज इनटॉलेरन्स

पुदिन्याच्या पानांचे कशा पद्धतीने सेवन करावे:

वर्षाच्या बाराही महिने बाजारात पुदिन्याची पाने उपलब्ध असतात. पुदिन्याच्या पानांचे सेवन केल्यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होण्यासोबतच शरीरसंबंधित समस्यांपासून सुटका मिळते. पचनासंबंधी, पोटासंबंधी समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये दुर्लक्ष केले जाते. पण असे केल्यामुळे आजार वाढू लागतो. त्यामुळे नियमित पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. पुदिन्याची पाने पोटात नैसर्गिक थंडावा कायम टिकवून ठेवतात. रोजच्या जेवणात नियमित पुदिन्याच्या पानांचा समावेश केल्यास पोट कायमच स्वच्छ राहील. पुदिन्यामध्ये मेंथॉल, रोझमेरीनिक ॲसिड आणि फ्लेव्होनॉइड्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. या घटकांमुळे पोटात थंडावा कायम टिकून राहतो.

Blurred Vision: अचानक अंधुक दिसू लागलंय? दुर्लक्ष करू नका; गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

पुदिन्यामधील मेंथॉल पोटातील स्नायूंना आराम देण्यासोबतच गॅस, पोट फुगणे आणि सौम्य पोटदुखी किंवा आकडी यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यास मदत करतो. त्यामुळे पुदिन्याची पाने नियमित खावी. यामध्ये असलेली अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म पोटातील जळजळ कमी करतात. जेवणासोबत तुम्ही पुदिन्याच्या पानांची चटणी खाऊ शकता. तसेच सकाळी उठल्यानंतर पुदिन्याची पाने आणि सब्जापासून बनवलेले डिटॉक्स पेय प्यायल्यास आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल. जेवणानंतर २ ते ३ पुदिन्याची पाने चघळल्यास तोंडातील दुर्गंधी कमी होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोट फुगणे आणि अपचनासाठी पुदिना फायदेशीर आहे का?

    Ans: होय. पुदिन्यामध्ये पचनास मदत करणारे नैसर्गिक घटक असतात, जे काही लोकांमध्ये गॅस, अपचन आणि पोट फुगण्याचा त्रास कमी करण्यास मदत करू शकतात.

  • Que: पुदिन्याचे सेवन कशा पद्धतीने करता येते?

    Ans: पुदिन्याची पाने चटणी, पुदिना चहा, पुदिना पाणी, ताकामध्ये किंवा सलाडमध्ये मिसळून सेवन करता येते.

  • Que: पुदिन्याचा चहा पचनासाठी उपयुक्त आहे का?

    Ans: होय. कोमट पुदिन्याचा चहा काही लोकांमध्ये पचन सुधारण्यास आणि पोटातील अस्वस्थता कमी करण्यास मदत करू शकतो.

Web Title: Are you fed up with frequent indigestion and bloating then consume fresh mint leaves in this way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • acidity
  • constipation home remedies
  • mint

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.