Belly Cutter Drinks: ओटीपोटावर वाढलेला चरबीचा घेर होईल कमी! उपाशी पोटी करा 'या' पेयांचे सेवन
सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास ओटीपोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यास मदत होईल आणि तुम्ही स्लिम दिसाल. लिंबू पाण्यात असलेले गुणकारी घटक शरीर हायड्रेट ठेवतात.
साखरयुक्त पेयांचे किंवा महागड्या सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी वजन कमी करताना जिऱ्याचे पाणी प्यावे. गरम पाण्यात भाजलेल्याजिऱ्याची पावडर घालून उपाशी पोटी प्यायल्यास चरबीचा घेर कमी होण्यासोबतच पचनक्रिया सुद्धा चांगली राहील.
ग्रीन टीमध्ये कॅटेचिन्स आणि कॅफिन असते, ज्यामुळे शरीराच्या ऊर्जा खर्च करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. ग्रीन टी शरीरासाठी खूप जास्त गुणकारी ठरते. दुधाचा चहा पिण्याऐवजी नियमित ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी प्यावी.
ताक पचनासाठी अतिशय हलके असते. दुपारच्या जेवणानंतर नियमित एक ग्लास ताक प्यावे. ताक प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासोबतच आतड्यांमध्ये चांगली जिवाणू वाढण्यास मदत होते.
एक किंवा दीड लिटर पाण्यात काकडीचे तुकडे, पुदिन्याची पाने, लिंबाच्या चकत्या आणि सब्जा बिया घालून पाणी रात्रभर तसेच ठेवा. सकाळी उठल्यानंतर थोड्या थोड्या वेळाने काकडीचे पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यासोबतच शरीर हायड्रेट राहील.