
वय़ोगट 13 ते 19 मध्ये मुलं असो की मुली स्वत:च्या विश्वात रमतात आणि त्याला कारणं देखील अनेक आहेत. मात्र याचवेळी पालकांची भूमिका महत्वाची असते. अशावेळी पालकांनी मुलांवर चिडचिड न करता त्यांना समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. या वयात मुलं आणि मुली यांच्यात शारीरिक आणि मानसिक झपाट्याने बदल होतात. 13 वर्षापासून मुलांच्या आवाजात बदल व्हायला सुरुवात होते. त्य़ांचा आवाज फुटतो. नैराश्य आणि सतत चिंता वाटणं, या समस्या भेडसावतात. तसंच शैक्षणिक दबाब आणि मित्र मैत्रीणींशी होणारी तुलना यामुळे शारीरीक आणि मानसिक जडण घडण होताना त्रास होतो. करियरबद्दल वाटणाऱ्या चिंता आणि यामुळे मुृलं खचतात. यामुळे त्यांचा आत्मविश्वास देखील कमी होतो. या काळात पालकांचा पाहिजे तसा आधार मुलांना मिळाला नाही ते वाईट संगतीला लागतात.
हार्मोनल बदल
चेहऱ्यावर येणारे पिंपल्स
आवाजात आणि दिसण्यातील बदल
अचानक घाम येणं
वेगाने वाढणारी शारीरिक वाढ अशा शारीरिक बदलांबरोबरच मानसिक बदल देखील होतात.
शारीरिक बदलाचा परिणाम मानसिकतेवर देखील होतो. मुलांना मिशी फुटणं असो किंवा मुली देखील मासिकपाळी आणि त्यामुळे होणारे बदल या सगळ्यात पौगंडावस्थेतील मुलांना सतत हा प्रश्न पडतो की, मी चांगला दिसतो का, मला मिशी फुटते ती चांगली दिसेल का ? तर मुली देखील वजन वाढणं किंवा कमी होणं यात मी कशी दिसतेय .या सगळ्याचा प्रभाव त्यांच्या मनावर होत असतो. त्यामुळे सतत मनात चलबिचल होणं सतत कोणत्यातरी प्रश्नांनी मन ग्रासलेलं असणं या गोष्टी होतात.
याचवेळी मुलांवर न ओरडता समजून घेणं, नात्यात विश्वास देणं, मुलांना न ओरडता त्यांना आई बाबा मित्र वाटायला पाहिजेत अशी संयमाची भुमिका पालकांची असायला पाहजेत, असं तज्ज्ञ कायम सांगतात. या वयातील मुलांना चांगल्या प्रकारे समजून घेतल्याल पालक आणि मुलं यांच्यात गप्पा गोष्टी होतात आणि नातं घट्ट होतं. मुलांवर चिडचिड न करता ती जास्तवेळ का झोपतायत, मुलांच्या मोबाईलचा स्क्रीन टायमिंग किती आहे याकडे लक्ष देणं पालकांची भूमिका आहे.