(फोटो सौजन्य: istock)
अनेकांना ठाऊक नाही पण आपल्या स्वयंपाकघरात असणारे बहुतेक घटक हे आपल्या त्वचेवर वापरले जाऊ शकतात. हे घटक पूर्णपण नैसर्गिक असल्याने चेहऱ्यावर याचा कोणताही परिणाम होत नाही. आज आम्ही तुम्हाला घरगुती पदार्थांपासून घरी नॅचरल सिरम कसा तयार करायचा याची एक सोपी पद्धत सांगणार आहोत. हे घरगुती सिरम नैसर्गिकरित्या तुमच्या चेहऱ्याला चमकदार बनवेल आणि यामुळे सुरकुत्या देखील काढून टाकणे सोपे हाईल.
मध आणि लिंबाचा वापर
मध त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि लिंबू त्वचेचा रंग उजळण्यास मदत करते. या दोन्ही घटकांचा एकत्रित वापर करुन तुम्ही एक नॅचरल सिरम तयार करु शकता. यासाठी एका भांड्यात सर्वप्रथम २ चमचे मध आणि १ चमचा ताजा लिंबाचा रस घाला. दोन्ही घटक चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर याचा पातळ थर लावा. २० मिनिटे याला चेहऱ्यावर तसेच राहू द्या आणि मग फेसवाॅश आणि पाण्याने चेहरा स्वच्छ करा. आठवड्यातून दोनदा तुम्ही हे तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे हळूहळू चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या दूर होण्यास मदत होईल.
हळद आणि नारळ तेल
हळदीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो आणि नारळ तेल खोलवर ओलावा प्रदान करते. यासाठी एका भांड्यात तुम्हाला १ चमचे हळद आणि दोन चमच नारळ तेल घ्यायचे आहे. दोघांना मिसळून याची एक पेस्ट तयार करा आणि नंतर ती चेहऱ्याला लावा. २० मिनिटांनी चेहरा धुवून चांगला स्वच्छ करा. यामुळे निस्तेज चेहऱ्यावरील चमक वाढण्यास मदत होते.
कोरफड आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल
कोरफड त्वचेला थंडावा आणि आराम मिळवून देते. हा सिरम तयार करण्यासाठी एक भांड्यात १ चमचा कोरफड जेल, १ व्हिटॅमिन ई कॅप्सूल, १ चमचा गुलाबजल आणि १/२ चमचा ग्लिसरीन घाला. सर्व साहित्य मिसळून याची पेस्ट तयार करा आणि नंतर ती चेहऱ्यावर लावा. यामुळे कोरडेपणा दूर होऊन चेहऱ्यावरील बारीक रेषा नाहीशा होण्यास मदत होईल.
लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी:
प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. कोणताही नवीन सीरम लावण्यापूर्वी नेहमीच पॅच टेस्ट करा. जर चिडचिड किंवा ऍलर्जीक प्रतिक्रिया उद्भवल्या तर वापर बंद करा. तसेच, जास्त प्रमाणात लावणे टाळा.






