संधिवात- हाडांच्या वेदनांपासून मिळेल कायमची सुटका! खोबरेल तेलात मिक्स करा 'हा' पदार्थ
प्रत्येकालाच कायमच निरोगी आणि फिट राहायचे असते. सुंदर लांबलचक केस, चमकदार मुलायम त्वचा आणि कायमच स्लिम राहण्यासाठी शरीराची खूप जास्त काळजी घेतली जाते. यासोबतच बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा सुद्धा वापर केला जातो. महागडे हेअर सीरम, स्किन केअर प्रॉडक्ट, लोशन वापरल्यामुळे काही काळापुरती त्वचा आणि केस सुंदर दिसतात. मात्र कालांतराने पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. चुकीच्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. त्यातील अतिशय प्रभावी पदार्थ म्हणजे खोबऱ्याचे तेल.(फोटो सौजन्य – istock)
मागील अनेक वर्षांपासून खोबऱ्याचा तेलाचा वापर त्वचा आणि केसांसाठी केला जात आहे. खोबऱ्याचे तेल केसांना लावल्यामुळे मुळांना पोषण मिळते आणि केस अतिशय सुंदर दिसतात. केसांची खुंटलेली वाढ पुन्हा नव्याने होण्यासाठी खोबरेल तेल केसांना लावावे. आज आम्ही तुम्हाला संधिवात आणि आरोग्यासंबंधित इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात कोणते पदार्थ मिक्स करून लावावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हा पदार्थ संपूर्ण आरोग्यासाठी प्रभावी ठरेल.
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे साथीचे आजार पसरतात. सर्दी, खोकला झाल्यानंतर खोबऱ्याच्या तेलात कापूर मिक्स करून डोक्यावर हलक्या हाताने मालिश केल्यास बंद झालेले नाक मोकळे होण्यास मदत होईल. याशिवाय शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होईल. शरीरात वाढलेल्या थकव्यामुळे श्वसनमार्गाचा त्रास होतो, या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाने केसांवर मसाज करावा. यामुळे थकवा कमी होईल.
शरीरात वाढलेला थकवा, मणक्यांमध्ये वाढलेल्या वेदना, संधिवात, कंबर दुखणे इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात कापूर मिक्स करून लावावे. हलक्या हाताने मालिश केल्यास शरीराचा रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होईल. व्यायाम केल्यानंतर शरीरात वाढलेला थकवा कमी करण्यासाठी खोबरेल तेलात कापूर मिक्स करून लावावे.
त्वचेमध्ये वाढलेली जळजळ, खाज, छोट्या मोठ्या जखमा बऱ्या करण्यासाठी कापूर तेलाचा वापर करावा. यामुळे त्वचा हायड्रेट राहते. याशिवाय चेहऱ्याच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात कापूर मिक्स करून लावावे. खोबऱ्याचे तेल हाताच्या बोटांवर घेऊन संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करावा.