महिलांनी अंघोळ करताना 'या' अवयवांना चुकूनही लावू नये साबण
शरीराचे सर्वच अवयव स्वच्छ करण्यासाठी अंघोळ करताना साबण किंवा बॉडी वॉशचा वापर केला जातो. अंघोळ केल्यामुळे शरीर स्वच्छ होण्यासोबतच मन सुद्धा स्वच्छ होते आणि मानसिक आरोग्य सुधारते. अंघोळ करताना साबण लावणे आवश्यक आहे. अंघोळीला गेल्यानंतर साबण शरीराला साबण लावला नाहीतर अंघोळ केल्यासारखे अजिबात वाटत नाही. पण हल्ली सर्वच महिला अंघोळ करताना बॉडी वॉशचा वापर करतात. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे सुगंधित बॉडी वॉश उपलब्ध आहेत. अंघोळ करताना सगळेच जण संपूर्ण शरीराला साबण लावतात. साबण लावल्यामुळे घामामुळे अंगांवर चिटकून राहिलेला मळ आणि चिकटपणा कमी होतो. पण महिलांनी संपूर्ण शरीरावर साबण लावू नये. यामुळे शरीरावरील नाजूक अवयवांना इजा पोहचण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला महिलांनी कोणत्या अवयवांना साबण लावू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
आळसामुळे तुम्ही बदलत नाही Panty? ही घाणेरडी सवय धोक्यात आणेल तुमची Vaginal Health
महिलांनी नाजूक अवयवांना अजिबात साबण लावू नये. कारण यामध्ये असलेले हानिकारक केमिकल नाजूक अवयवांना इजा पोहचवतात.याशिवाय योग्य काळजी न घेतल्यामुळे इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. महिलांमध्ये व्हजायना हा अतिशय नाजूक अवयव आहे. या अवयवाची स्वच्छता राखणे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे अंघोळ करताना व्हजायनाला साबण लावू नये.
अंघोळ करताना व्हजायनाला साबण लावल्यामुळे त्यामध्ये असलेले हानिकारक केमिकल शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. तसेच साबण लावून स्वच्छ केल्यामुळे हेल्दी इन्फेक्शन नष्ट होऊन जातात. साबणामध्ये असलेल्या हानिकारक घटकांमुळे व्हजायनामध्ये जळजळ, कोरडेपणा किंवा युरीन इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे तुम्ही साबणाचा अतिवापर करत असाल तर योग्य वेळी बंद साबण वापरणे बंद करावे.
शरीरातील नाजूक अवयव स्वच्छ करणे आवश्यक आहे. कारण नाजूक अवयवांना इजा पोहचल्यानंतर अतिशय तीव्र वेदना होतात. नाजूक अवयव स्वच्छ करण्यासाठी पाणी पुरेसे आहे. पाण्याचा वापर करून नाजूक अवयव स्वच्छ करून घ्यावे. याशिवाय बाजारात इंटिमेट वॉशसारखे अनेक प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. या प्रॉडक्टचा वापर तुम्ही बाहेरील अवयव स्वच्छ करण्यासाठी करू शकता. हे प्रॉडक्ट आतील अवयवांना अजिबात लावू नये.