Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Blue Zone मधील लोक 4 पदार्थांना ताटात बघतही नाहीत, 100 वर्ष दीर्घायुष्याचं रहस्य

सध्या तरूण वयातही अनेकांना मृत्यू येत असल्याचं समोर येत आहे. मात्र ब्लू झोनमधील लोक 100 वर्षापेक्षाही अधिक कसे जगतात, 4 पदार्थ ताटात वाढूनही घेत नाहीत हे आपण या लेखातून जाणून घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 21, 2025 | 10:59 AM
दीर्घायुष्यासाठी काय खावे आणि काय टाळावे (फोटो सौजन्य - iStock)

दीर्घायुष्यासाठी काय खावे आणि काय टाळावे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

ब्लू झोन म्हणजे अशी ठिकाणे जिथे जवळजवळ सर्व लोक १०० वर्षांहून अधिक काळ राहतात. अशी काही मोजकीच ठिकाणे आहेत, जी अमेरिका, जपान आणि चीन सारख्या देशांमध्ये आहेत. अनेकदा तज्ज्ञ येथे संशोधन करतात आणि त्यांच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतात. यासाठी एक वेबसाइट तयार करण्यात आली आहे, जिथे ते काय खातात, काय खात नाहीत, ते कोणते काम करतात आणि त्यांची जीवनशैली कशी आहे याबद्दल माहिती गोळा केली जाते. 

या वेबसाईटच्या आधारे, आम्ही तुम्हाला सांगत आहोत की शंभर वर्षांहून अधिक काळ निरोगी आणि तंदुरुस्त आयुष्य जगण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारातून कोणत्या गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत (फोटो सौजन्य – iStock)

चांगला आहार महत्त्वाचा 

हेल्दी पदार्थांचा नियमित वापर करावा

चांगला आहार केवळ रोग टाळण्यास मदत करत नाही तर दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यास देखील मदत करतो. वैज्ञानिक संशोधन आणि ब्लू झोन अर्थात जगातील सर्वात जास्त काळ जगणाऱ्या लोकांचे क्षेत्र आहे आणि याच्या अभ्यासानुसार, काही आहार सवयी तुमचे आयुष्य वाढवू शकतात. यासाठी तुम्ही हा लेख नक्की वाचा

शुगर स्वीटन स्वीट्स 

कोल्ड्रिंक पिणे टाळा

या पेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि त्यात जीवनसत्त्वे, फायबर किंवा प्रथिने यांसारखे कोणतेही आवश्यक पोषक घटक नसतात. ते तुम्हाला त्वरीत ऊर्जा देतात पण पोट भरत नाहीत, ज्यामुळे जास्त खाण्याची शक्यता असते. दररोज या पेयांचे सेवन केल्याने लठ्ठपणा, मधुमेह आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.

129 वर्षांच्या स्वामी शिवानंद यांनी उघड केले दीर्घायुषी आणि हेल्दी आरोग्याचे रहस्य, 3 सोप्या टिप्सने बदलेल आयुष्य

मीठयुक्त पदार्थ 

अधिक मिठाचे पदार्थ खाणे टाळा

या गोष्टींमध्ये भरपूर मीठ आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज असतात. या स्नॅक्समध्ये सोडियम (मीठ) जास्त असते, ज्यामुळे रक्तदाब, हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यात कृत्रिम प्रिझर्व्हेटिव्ह्ज असतात, जे दीर्घकाळात शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. याशिवाय, या स्नॅक्समध्ये कॅलरीज आणि चरबी जास्त असतात आणि त्यात कोणतेही पोषण नसते. यामध्ये विविध फ्रोझन पदार्थ, फ्राईज, चिप्स आणि अन्य पदार्थांचा समावेश आहे. हे पदार्थ टाळणे तुमच्या आरोग्यासाठी अधिक योग्य ठरते 

पॅकेज्ड पदार्थ

पॅकेज्ड पदार्थांना चुकुनही जवळ करू नका

पॅकेज्ड पदार्थांमध्ये कॅलरीज, प्रिझर्वेटिव्ह्ज, अ‍ॅडिटिव्ह्ज असतात. त्यामध्ये रिफाइंड साखर, अस्वास्थ्यकर चरबी आणि रासायनिक अ‍ॅडिटिव्ह्जचे प्रमाण जास्त असते. ते फक्त भूक भागवतात पण या पदार्थांमध्ये अजिबात पोषण नसते. यामुळे वजन वाढणे, मधुमेह, दात किडणे आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. ब्लू झोनमधील लोक हे पदार्थ आपल्या आसपासही फिरकू देत नाहीत 

प्रोसेस्ड मीट 

लाल मांस खाणे टाळावे

या गोष्टींचे सेवन केल्याने कर्करोग आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये नायट्रेट्स, मीठ आणि प्रिझर्वेटिव्ह असतात, जे चव आणि शेल्फ लाइफ वाढवतात. WHO ने या पदार्थांना कर्करोग गटाच्या पहिल्या यादीत ठेवले आहे. ते कर्करोगाचे कारण बनतात, विशेषतः कोलन कर्करोग यामुळे होतो. त्यामध्ये जास्त प्रमाणात संतृप्त चरबी आणि सोडियम असते, ज्यामुळे हृदयरोग होऊ शकतात.

100 वर्षांपेक्षा जास्त जगतात अमेरिकेतील Blue Zone चे लोक, 100 वर्षांचे दीर्घायुष्य मिळण्यासाठी खातात 2 पदार्थ

दीर्घायुष्यासाठी काय खावे

दीर्घायुष्य मिळण्यासाठी कोणते पदार्थ खावेत

या लोकांच्या आहारात वनस्पती-आधारित अन्न हे सर्वात सामान्य अन्न आहे. डाळी आणि बीन्स, हिरव्या भाज्या, मूळ भाज्या (जसे की गाजर, गोड बटाटे), फळे, संपूर्ण धान्य, काजू आणि बिया. दैनंदिन आहारात या गोष्टींचा समावेश केल्याने दीर्घ आणि निरोगी आयुष्याची शक्यता वाढते.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Avoid 4 foods to live longer than 100 years blue zone people follow the rule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 10:59 AM

Topics:  

  • blue zone diet
  • Health News
  • Health Tips

संबंधित बातम्या

मासिक पाळीत Alcohol पिताय? होऊ शकतो महिलांच्या Fertility वर परिणाम, तज्ज्ञांनी दिला इशारा
1

मासिक पाळीत Alcohol पिताय? होऊ शकतो महिलांच्या Fertility वर परिणाम, तज्ज्ञांनी दिला इशारा

Health Tips: सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा? जाणून घ्या नाश्ता करण्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे
2

Health Tips: सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा? जाणून घ्या नाश्ता करण्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे

स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार
3

स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार

Mumbai Hospital News: ओपन हार्ट सर्जरीला पर्याय! HVS हॉस्पिटल्सची प्रगत क्लिप थेरपी ठरतेय वरदान
4

Mumbai Hospital News: ओपन हार्ट सर्जरीला पर्याय! HVS हॉस्पिटल्सची प्रगत क्लिप थेरपी ठरतेय वरदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.